रात्रीच्या वेळी कुत्रा रडण्याच्या मागे हे आहे खरे कारण; स्त्रियांच्या या कारणामुळे रडतो कुत्रा….

अध्यात्म

अनेकदा रात्रीच्या वेळी आपल्या आजूबाजूला जे कुत्रे असतात त्यांचा रडण्याचा आवाज आपल्याला ऐकू येतो अशा वेळी आपल्या मनामध्ये भीती सुद्धा निर्माण होते आणि म्हणूनच जर आपल्याला रडताना कुत्रा दिसला तर आपण त्याला हाकलून देतो. रात्रीच्या वेळी कुत्र्याचे रडणे हे अशुभ संकेत मानले जाते यामुळे भविष्यात काहीतरी वाईट घडणार आहे याची संभाव्यता सुद्धा वर्तवण्यात येते.

अशावेळी आपल्या मनामध्ये अनेक प्रश्न निर्माण होतत्त. त्यामागे नेमके असे काय कारण असते ज्याने रात्री कुत्रा रडत असतो तसेच रात्रीची वेळ असल्याने त्याचे रडणे अशुभ मानले जाते त्यामागे काही विशिष्ट कारण आहे का? जर काही कारण असेल तर ते नेमके काय आहे याबद्दलची उत्तरे आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

ज्योतिष शास्त्रानुसार असे मानले गेले की जर कुत्रा रात्रीच्या वेळी रडत असतील तर त्यांना त्यांच्या आजूबाजूला आत्मा भटकताना दिसतात. आणि यामुळेच कुत्रे रात्री रडतात आणि आत्म्यांना पाहून भुंकत असतात. या मधील दुसरे कारण असे सुद्धा आहे की जेव्हा कुत्रे रात्री रडतात तेव्हा आपल्या सहकाऱ्यांना आपल्या उपस्थितीची कारण सुद्धा दर्शवित असतात आणि यामुळे एका विशिष्ट लयमध्ये कुत्रा आपली उपस्थिती लावत असतो.

हे वाचा:   या कारणामुळे मांसाहार करणाऱ्यांची पूजा व्यर्थ जाते; ९९% लोकांना माहित नसलेली माहिती.!

काही वैज्ञानिकांच्या मते असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे की जेव्हा एखाद्या कुत्राला एखादी वेदना होत असते तेव्हा त्या वेदनेपासून मुक्तता मिळवण्यासाठी किंवा ती वेदना दुसऱ्यांना सांगण्यासाठी सुद्धा विशिष्ट लयमध्ये रडत असतो. कुत्रा हा समाजातील असा एकमेव प्राणी आहे ज्याला माणसासोबत राहायला आवडत असते.

कुत्रा हा कधीच एकटा राहत नाही आणि म्हणूनच आपल्या शरीरामध्ये ज्या काही वेदना होत आहेत त्या वेदना इतरांना सांगण्यासाठी कुत्रा विशिष्ट लय मध्ये आपले दुःख व भावना व्यक्त करत असतो. कुत्र्याचे रडणे याबद्दल आपल्या शास्त्रांमध्ये सुद्धा एक कारण सांगण्यात आलेले आहे, जेव्हा कुत्रा अवेळी रात्री रडत असतो तेव्हा याचा अर्थ पृथ्वीतलावर यमदेव आलेले असतात आणि कोणाचातरी मृ’त्यू होणार आहे किंवा कुणाच्या तरी मृ’त्यूची बातमी आपल्याला कळणार आहे असा याचा संकेत होत असतो.

हे वाचा:   या 3 राशींच्या जीवनात सतत संकटे येतात...बघा असे असते यांचे आयुष्य, अशा गोष्टी घडतात

त्याच बरोबर जेव्हा एखादा कुत्रा जमिनीवर लोळत असतो याचा अर्थ सुद्धा शुभ मानला जात नाही. अनेक वैज्ञानिकांचे असे सुद्धा म्हणणे आहे की जेव्हा कुत्र्याला भूक लागलेली असते तेव्हा त्या भुकेच्या व्याकूळ भावनेने कुत्रा रडत असतो आणि म्हणूनच आपल्याला त्याच्या भुकेबद्दल कळायला हवे म्हणून सुद्धा कुत्रा वेगवेगळ्या लयमध्ये रडत असतो.

आता आपल्यावर आहे की आपण कुत्र्याला किती समजून घेतो व कुत्र्याच्या रडण्याकडे कोणत्या दृष्टीकोनातून पाहतो. जर तुमच्या आजूबाजूला सुद्धा कुत्रा अवेळी रडत असेल किंवा काही कारणामुळे रडत असेल तर त्याच्याकडे नकारात्मक भावनेने न पाहता सकारात्मक भावनेने आपल्याला पाहायला हवे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.