जर मांजर आडवी गेली तर काय होते.? खरंच मांजर आडवे जाणे अशुभ असते का.? जाणून घ्या यामागील सत्य.!

अध्यात्म

आपल्या समाजात श्रद्धा-अंधश्रद्धा खूप मानले जातात. ही पद्धत आपल्याकडे शेकडो वर्षांपासून चालत आलेली आहे. काही व्यक्ती या कृतीकडे श्रद्धा म्हणून पाहतात तर काही व्यक्ती या प्रक्रियेकडे अंधश्रद्धा म्हणून पाहत असतात परंतु पूर्वी पासून काही गोष्टी आपल्याकडे चालत आलेल्या आहेत यामुळे या गोष्टी परंपरागत असल्याने आपल्या मनामध्ये सुद्धा याबद्दल काही भीती व काही वेळा उत्सुकता निर्माण होत असते.

अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करत असतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण अशाच काही एका गोष्टीबद्दल जाणून घेणार आहोत ती म्हणजे मांजरी बद्दल महत्त्वाची गोष्ट. मांजर आपल्या आजूबाजूला अनेकदा पाहायला मिळते. मांजरी बद्दल समाजामध्ये काही श्रद्धा व अंधश्रद्धा सुद्धा पाहायला मिळतात म्हणूनच या लेखामध्ये आपण अशी एक महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया या बद्दल..

अनेकदा आपण ऐकले असेलच की जर आपण एखादे कार्य करताना घराबाहेर पडलो आणि अशावेळी मांजर आडवी गेली तर तो खूप मोठा अपशकून असतो. आपण ज्या कार्यासाठी बाहेर जातो आहोत ते कार्य पूर्ण होत नाही आणि एखादी अशी घटना सोबत आपल्या सोबत घडू शकते परंतु खरेच असे काही होते का ? असे सुद्धा म्हटले जाते की जेव्हा आपण बाहेर जाताना मांजर आडवी जाते तेव्हा पाच पावले मागे जायला हवे मगच पुढचा प्रवास करायला हवा.

जर आपले कामच महत्त्वाचे असेल तर अशावेळी झाडाखाली थांबून किंवा एखाद्या हॉटेलमध्ये जाऊन पाणी प्यायला हवे. तरच पुढे जावे असे केल्यास ते कार्य खूप आपले पूर्ण होते अन्यथा त्या कार्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होतात. असे मानले जाते की जर एखाद्या वेळी आपण बाहेर प्रवास करताना मांजराने आपल्या रस्ता ओलांडला तर प्रवास करताना आपल्या सोबत एखादी दुर्घटना सुद्धा घडू शकते किंवा आपले नुकसान सुद्धा होऊ शकते अशी शक्यता वर्तवली जाते. याचा अर्थ असा नव्हे की मांजर आडवे जाणे म्हणजे अपशकुन असतो.

हे वाचा:   मंगळसूत्रातील दोन वाट्या आणि काळे मणी घालण्यामागे काय आहे शास्त्र.? हे आहे त्यामागील महत्वाचे कारण.!

खरेतर पाहायला गेले तर जेव्हा मांजर एखादी आपल्या कामाच्या वेळी आडवी जाते त्याचा अर्थ की भविष्यात होणारे जे काही वाईट घटना आहे त्याचे पूर्वसंकेत आपल्याला मांजर देत असते आणि अशावेळी भविष्यात ज्या काही घटना घडणार आहे त्याबद्दल आपण सुद्धा सावध होऊन जातो म्हणून त्या संकटाची कल्पना आपल्याला देण्याकरता मांजर आपला रस्ता ओलांडत असते म्हणूनच पुढच्या वेळी जर तुम्ही बाहेर जाताना तुमच्या वाटेमध्ये जर मांजर आडवी गेली तर याचा अर्थ असा की तुमच्या वर भविष्यात काहीतरी संकट येणार आहे आणि तुम्हाला पुढचे पाऊल अगदी सावधतेने टाकायचे आहे.

परंतु मांजर रस्त्याने आडवे जाणे हे नेहमीच अशुभ नसते. मांजर आपल्या डाव्या बाजूने गेली आहे किंवा उजव्या बाजूने गेलेली आहे यावरून त्याचे शुभ-अशुभ परिणाम पाहायला मिळतात. शगुन शास्त्रानुसार मांजरी डाव्या बाजूने रस्ता कापणे अशुभ मानले जात नाही. परंतु मांजर जर आपल्या उजव्या बाजूने गेली तर ते अशुभ मानले जाते म्हणूनच मांजरी जर उजव्या बाजूने आपला रस्ता ओलांडायला असेल तर थोड्यावेळ थांबावे मगच पुढचा प्रवास करा.

मांजरी विषयी अनेक शुभ-अशुभ परिणाम शगुन शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे. असे मानले जाते की, जर मांजरीने आपल्या घरातील दूध पिऊन पळून गेली तर याचा अर्थ की आपल्या घरातील संपत्तीचा भविष्यात नाश होणार आहे. मांजरीने घरातील दूध पिणे हे खूपच अशुभ मानले गेले आहे असे केल्याने आपल्या घरातील संपत्ती नष्ट होते कारण की दूध हे वैभव आणि संपत्तीचे समृद्धीचे प्रतीक मानले आहे.

हे वाचा:   जर तुमच्याही नखांवर पांढरे ठिपके असतील तर समजून जा लवकरच तुमच्या नशिबाची तिजोरी उघडणार आहे.!

जर आपल्या घरामध्ये दोन मांजरी येऊन भांडण करत असेल किंवा घरामध्ये येऊन रडत असतील तर असे कृत्य सुद्धा अशुभ मानले जाते. जर मांजर आपल्या घरामध्ये येऊन भांडण करत असतील तर भविष्यात आपल्या घरामध्ये वाद होण्याची शक्यता असते. मांजर घरामध्ये येऊन रडणे हे एखाद्या वाईट कृत्याची सूचक आहे. एखाद्या व्यक्ती झोपली असल्याने अशावेळी त्याच्या अंगावर मांजर पडली तर याचा अर्थ त्या व्यक्तीला भविष्यात एखाद्या आजारपणाला सामोरे जाण्याची शक्यता असते.

हे सारे सांगून शास्त्रामध्ये मांजरी बद्दल सांगितलेली आहे परंतु हे सगळे मानणे किंवा न मानणे ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. जर तुमची श्रद्धा असेल तर तुम्ही हे सगळ्या गोष्टी वर विश्वास ठेवू शकता तर तुम्हाला विश्वास ठेवायचे नसेल तर तुम्ही नका ठेवू. शेवटी प्रत्येकाच्या श्रद्धेचा हा विषय आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.