असे अंजीर खाल्ल्याने नेमके काय होते.? अंजीर कसे,कुणी,किती खावे यासाठी एकदा नक्की वाचा.!

आरोग्य

सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये प्रत्येक जण व्यस्त झालेला आहे आणि या सर्व गोष्टींमुळे आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले जाते यामुळेच आपल्याला अशक्तपणा थकवा जाणवतो यामागे कारण सुद्धा वेगवेगळे असतात परंतु अनेकदा आपल्या शरीरामध्ये योग्य ते पोषक तत्व उपलब्ध नसल्याने सुद्धा आपल्याला थकवा अशक्तपणा जाणवत असतो. आपण अनेकांच्या सांगण्यावरून वेगवेगळे पदार्थ सेवन करत असतो.

ड्रायफ्रूट खात असतो परंतु नेमके कोणते पदार्थ खाल्ल्याने आपल्या शरीराला फायदे होतात हे काही आपल्याला कळत नाही म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन आलेलो आहोत. त्या माहितीच्या आधारे तुमच्या शरीराला उत्तम पोषक द्रव्य प्राप्त होणार आहेत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

या फळाचे नाव आहे अंजीर. अंजीर आहे उंबरसारखे दिसायला फळ आहे. हे फळ बाराही महिने उपलब्ध राहत नाही, जरी हे फळ फ्रेश प्रमाणामध्ये उपलब्ध राहत नसले तरी अनेकदा ड्रायफूटच्या दुकानांमध्ये आपल्याला सुकविलेले अंजीर फळ सहज उपलब्ध होऊन जाते.या फळाच्या अंगी असे अनेक औषधी गुणधर्म आहेत जे आपल्या शरीराला अत्यंत महत्त्वाचे असतात. आपण अनेकदा बाजारामध्ये अंजीर पासून बनवलेले वेगवेगळे पदार्थ खात असतो.

हॉटेलमध्ये सुद्धा आपल्याला अंजीर मिल्क शेक, अंजीर बर्फी, अंजीर जाम असे पदार्थ आपल्याला पाहायला मिळतात.या फळांमध्ये कॅल्शियम आणि पोटॅशियम, लोह भरपूर प्रमाणामध्ये असते म्हणूनच आपल्या शरीराला ऊर्जा प्रदान करण्याचे कार्य हे फळ मोठ्या प्रमाणावर करते. मधुमेही रुग्ण असणाऱ्या व्यक्तींनी सुद्धा हे फळ नक्की खायला हवे.

हे वाचा:   सकाळी रिकाम्यापोटी घ्या फक्त 1 चमचा; 5 मिनिटांत पित्त होईल पूर्णपणे गायब.!

जेव्हा आपल्याला बाजारामध्ये सुकलेल्या स्वरूपामध्ये हे फळ प्राप्त होत असते तेव्हा सर्वप्रथम आपल्याला रात्रभर हे फळ सुकवायचे आहे आणि त्यानंतर सकाळी उठल्यावर याचे सेवन करायचा आहे कारण की या फळांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये उष्णता असते आणि म्हणूनच अनेकदा डॉक्टर सुद्धा आपल्याला हे फळ रात्रभर भिजवून सकाळी खाण्याचे सल्ला देतात.

अंजीर हे रक्त शुद्ध करण्याचे कार्य करते. बहुतेक वेळा आपल्या शरीरामध्ये जे रक्त उपलब्ध असते त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन झाले तर अनेकदा आपल्याला पित्त, चेहऱ्यावर काळे डाग, पिंपल्स वेगवेगळ्या समस्या उद्भवतात. अशावेळी अंजीर हे फळ ब्लड पुरिफिकेशन म्हणजे रक्त शुद्धीकरण करण्याचे कार्य करते. महिलांच्या मासिक पाळीच्या दरम्यान तसेच श्वे”त”प्र”दर यासारख्या समस्येवर अंजीर फळ उत्तम ठरते.

ज्या व्यक्तींना द”म्या”चा त्रास आहे अशा व्यक्तीने दिवसभरातून दोन अंजीर जरूर खायला हवे कारण की अंजीर हे कफनाशक आहे आणि म्हणूनच दम्याच्या व्यक्तींनी हे खायला हवे. तुम्ही दिसायला अत्यंत बारीक असाल,काही खाल्ले तरी अंगाला लागत नाही तर अशावेळी आपले शरीर धष्टपुष्ट बनवण्यासाठी सुद्धा अंजीर मदत करते म्हणून आपल्याला दिवसभरातून दोन तरी अंजीर खायचे आहे.

हे वाचा:   नायटा, गचकरण आयुष्यात पुन्हा कधी होणार नाही; वापरा घरातील फक्त हा १ पदार्थ.!

जर तुमचे पोट साफ होत नसेल तुम्हाला ब”द्ध”को”ष्ठतेचा त्रास असेल तर अशा वेळी रोज झोपताना दुधासोबत अंजीर चाऊन खायचे आहे असे केल्याने आपल्या पोटातील जीवजंतू सुद्धा नष्ट करण्याची शक्ती अंजीर मध्ये आहे आणि त्याचबरोबर आपले पोट सुद्धा स्वच्छ राहते त्याचबरोबर अंजीर मध्ये अनेक असे काही पौष्टिक घटक उपलब्ध असल्याने आपल्या शरीरामध्ये नेहमी शक्ती संचार करण्याचे कार्य अंजीर करत असते यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा उत्तम बनते म्हणूनच अंजीर चा समावेश आपल्या पौष्टिक आहारामध्ये अवश्य करायला हवा.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.