दैनंदिन जीवनात आपल्या आसपास अनेक घटना घडत असतात. कधी कधी आपल्या हातून आरसा पडतो, कधी कधी घरातल्या महिलेकडून गॅस वर किंवा चुलीवर ठेवलेलं दूध ऊतू सुद्धा जाते आणि मग अशा घटना घडल्यानंतर आपल्या मनामध्ये कुठेतरी अशी शंका येते की या गोष्टी शुभ आहे की अशुभ आहेत. बऱ्याचदा रस्त्यावर चालताना मांजर आडवे जाते त्यावेळी लोक मनामध्ये अनेक शंका घेऊन थोडेसे काम करतात.
या ज्या घटना घडत असतात यांच्या पाठीमागे काहीतरी कारण असते. या घटना भविष्यामध्ये घडणार्या घटनांची आपल्याला पूर्वसूचना देत असतात. भविष्यामध्ये काही संकट येणार आहे का ? आपले काम अडणार आहे का? एखादा अपघात तर होणार नाही ना? अपशकुन तर झालेला नाही ना? अशा अनेक प्रकारच्या पूर्वसूचना या घटना देत असतात. आज आपण गॅसवर किंवा चुलीवर तापायला ठेवलेले दूध उतू गेले तर हे शुभ असते की अशुभ असते हे जाणून घेणार आहोत.
खरे तर आपण गॅस वर किंवा चुलीवर ठेवलेल्या दूध उतू गेले तर हे अत्यंत शुभ लक्षण आहे म्हणजे नजीकच्या भविष्यात तुमच्या बाबतीत अनेक शुभ घटना घडणार आहे याची खात्री ही घटना दर्शवत असते. तुम्हाला अचानक धनलाभ होऊ शकतो किंवा तुमचे अनेक दिवसांपासून आखडलेला एखादे काम पूर्ण होऊ शकते किंवा तुम्हाला एखादी गोड बातमी येऊ शकते.
थोडक्यात काय तर काहीतरी शुभ संकेत ह्या घटना देत असतात म्हणून दूध उतू गेल्याने ते चांगला आहे.अनेकदा दूध वाया गेल्याने घरातले मंडळींची नको नको त्या गोष्टी ऐकाव्या लागतात. घरातील पुरुष मंडळी टोमणे मारतात. तुझं लक्ष नसतं म्हणून हे घडले. असे केल्याने दूध उतू गेल्याने शुभ परिणाम घडणार आहेत व हे चांगले परिणाम घडत नाहीत कारण घरातली स्त्री म्हणजे माता लक्ष्मी चे स्वरूप असते.
लक्ष्मी स्वरूप स्त्री ला ज्यावेळी आपण नको ते बोल बोलतो त्यावेळी येणारे नशीब हे कुठेतरी पडले जाते आणि म्हणून जर अशी घटना घडत असेल जर चुकून दूध ऊतू जात असेल दुर्लक्षामुळे किंवा लक्ष नसल्याने किंवा लक्ष देऊन सुद्धा जर दूध उतू जात असेल तर ही अत्यंत शुभ घटना आहे. दुसरी गोष्ट अशी की बरेच जण या गोष्टीचा फायदा उठवण्यासाठी ती जाणून बुजून दूध उतू घालतात.
असे केल्याने कोणतीही गोष्ट सफल होत नसते. तुम्ही जेव्हा जाणून बुजून एखादा शकुन घडवून आणता या वेळी तरी कोणताही फायदा होत नसतो आणि म्हणून ज्योतिषशास्त्र वास्तूशास्त्र आणि आपली धार्मिक पुराने यावर त्यांचा विश्वास आहे त्यांनीच या गोष्टीचे पालन करायला हवे. स्त्री ला वाईट गोष्टी बोलू नये आणि तसेच मुद्दाम हून हा उपाय करू नये अजून एक गोष्ट बऱ्याचदा आपल्या हातून घडतात.
दूध उतू जाणे आणि दूध सांडणे यामुळे फरक आहे. तुमच्या हातून दूध सांडत असेल,पाय लागून हात लावून किंवा कोणत्याही गोष्टीवर जर दूध सांडत असेल तर हा काही शुभशकुन नव्हे. यामुळे नजीकच्या भविष्यात तुमच्या बाबतीत किंवा तुमच्या कुटुंबीयांच्या बाबतीत एखादी अपघाताची घटना होण्याची शक्यता आहे म्हणजेच एखादा अपघात होऊ शकतो.
हा अपघात रस्त्यावर होईल असेही नाही, कदाचित तुम्ही एखादे काम करत असाल ते काम अचानक बंद पडू शकते त्या कामांमध्ये तुम्हाला खूप नुकसान होऊ शकते. दुसऱ्याला ते काम मिळू शकते म्हणजे तुमचा तोटा ठरलेला आहे आणि म्हणून ही गोष्ट आपल्याला असा संकेत येते की तुम्ही खबरदारी घ्या. तुम्ही जरा जपून पुढची पावले उचला या गोष्टी आहेत ज्या आपल्याला भविष्यात कसे वागायला हवे याचे संकेत देत असतात आणि त्यानुसार आपले जीवन सुखी करण्यासाठी आपण या गोष्टींपासून मिळालेल्या संकेतांचा योग्य उपयोग करून घ्यायचा हवा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.