भारतामध्ये ज्योतिष शास्त्राचे महत्त्व अनेक काळापासून चालत आलेले आहे. या ज्योतिष शास्त्रामध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. या गोष्टींच्या माध्यमातून आपले जीवन सुकर बनवण्याचा प्रयत्न आपण करत असतो, अशा अनेक काही गोष्टी सांगितलेल्या आहेत. त्या गोष्टींच्या माध्यमातून आपण आपले जीवन जगताना त्यांचा आधार घेत असतो. एखाद्या व्यक्तीच्या कुंडली मध्ये असणारे ग्रहांचे स्थान व त्याचा क्रम व्यक्तीचा जीवनामध्ये घडणाऱ्या चांगल्या गोष्टी व वाईट गोष्टी यांच्यासाठी कारणीभूत असते.
ग्रह चांगले असतील तर त्या व्यक्तीला त्या काळामध्ये त्याचे चांगले शुभ फळ प्राप्त होत असतात परंतु जर ग्रह चांगले नसतील तर अशा वेळी त्याला अनेक समस्या अडचणी व संकटांना सामोरे जावे लागते. या अशुभ ग्रहांची शांती करताना ज्योतिष शास्त्रामध्ये वेगवेगळे उपाय सांगण्यात आले आहेत. त्या ग्रहांशी संबंधित असलेली रत्ने परिधान करणे या समस्या वर उपाय म्हणून पाहिले जाते म्हणूनच ज्योतिष शास्त्रामध्ये वेगवेगळ्या रत्नांचा उल्लेख व त्याचे फायदे सांगण्यात आलेले आहे.
अनेकदा ग्रहशांती व पूजा अर्चना सुद्धा सांगितले गेलेले आहे जेणेकरून आपल्या ग्रहांचा जो काही वाईट प्रभाव आहे तो प्रभाव कमी करता येऊ शकेल. रत्न घालण्याशिवाय काही जणांना कासवाची अंगठी घालण्याचा सल्ला सुद्धा दिला जातो. नेमकी कासवाची अंगठी घालण्याचे प्रयोजन काय असते? हे आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
कासवाची अंगठी परिधान करणे ज्योतिष शास्त्रामध्ये अत्यंत शुभ मानले गेले आहे. ही अंगठी परिधान केल्याने अशुभ ग्रहांच्या सावली पासून आपली सुटका होते आणि व्यक्तीचा आत्मविश्वास बळावतो. अनेक शास्त्रामध्ये कासवाला प्रगती आणि उन्नतीचे प्रतीक मानण्यात आलेले आहेत. कासवाला धनाचे म्हणजेच धन वैभव यांचे प्रतिक मानले गेले आहेत तसेच माता महालक्ष्मी चे स्वरूप सुद्धा कासवाला मानण्यात आलेले आहे त्यामुळे अशा प्रकारची अंगठी परिधान केल्याने आपल्या जीवनामध्ये आर्थिक संपन्नता येते. कासवाच्या आकाराची अंगठी चांदीच्या स्वरूपामध्ये बनवणे अत्यंत शुभ मानले जाते.
ही अंगठी उजव्या हाताच्या पहिल्या किंवा मधल्या बोटामध्ये घालण्याचे सल्ला दिला जातो. ही अंगठी आपल्याला अशा पद्धतीने परिधान करायची आहे की जेणेकरून कासवाची तोंड हे अंगठी परिधान करणाऱ्या व्यक्तीच्या तोंडाकडे असायला हवे. कासव हे माता महालक्ष्मी चे प्रतीक असल्याने ही अंगठी आपल्याला शुक्रवारच्या दिवशी परिधान करायचे आहे. अनेक व्यक्तींना आपल्या हातातील अंगठी बोटाने फिरवायची सवय असते. या अंगठी च्या बाबतीत असे करणे मात्र अपायकारक ठरू शकते.
ही अंगठी परिधान केल्याने तुमच्या जीवनामध्ये सुख शांती वैभव तर नांदतेच पण त्याचबरोबर माता महालक्ष्मीची कृपा दृष्टी सुद्धा तुमच्या जीवनावर होऊ लागते म्हणूनच जर तुमच्याकडे चांदीची कासवाची अंगठी असेल तर ती आम्ही शुक्रवारच्या दिवशी अवश्य परिधान करा आणि शक्य झाल्या शुक्रवारच्या दिवशी माता महालक्ष्मीची आराधना सुद्धा करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.