सुनेने पाहुण्यांना सासूची ओळख “सं’डा’स साफ करणारी बाई” अशी करून दिली; पुढे सासूने जे केले ते पाहून तुम्ही….

ट्रेंडिंग

अनेकदा आपल्या आजूबाजूला अशा काही गोष्टी घडतात, त्या गोष्टी आपल्या मनाला चटका लावून जातात. आईवडील आपल्या मुलांना शिकवण्यासाठी जिवाचे रान करत असतात परंतु जेव्हा आई वडिलांवरच वाईट वेळ असते तेव्हा मुलं मात्र त्यांचा अंत पाहत असतात. ही परिस्थिती सध्याच्या काळामध्ये अनेक घरामध्ये पाहायला मिळते. काही ठिकाणी परिस्थिती चांगली असते तर काही ठिकाणी आपल्या घरातील वृद्ध व्यक्तींकडे पाहण्याचा दृष्टिकोन अत्यंत घा’णेर’डा असतो.

अशीच एक माहिती आणि तुमच्यासाठी आज या लेखाच्या माध्यमातून सांगणार आहोत.ही माहिती वाचल्याने तुमच्या डोळ्यांमध्ये नक्की पाणी येईल, यात शंका नाही त्याचबरोबर तुमच्या आजूबाजूला जर कोणी अशा प्रकारची व्यक्ती असेल तर भविष्यात तुम्ही त्यांच्याशी वागताना शंभर वेळा विचार कराल, चला तर मग जाणून घेऊया त्या बद्दल..

ही आहे एका गावातील गोष्ट त्या गावांमध्ये सदा नावाचा व्यक्ती राहत असे. सदा फक्त चौथी पास होता परंतु पावकी,दिडकी उलटी बोलायचा त्याची बुद्धी अतिशय तीक्ष्ण होती अगदी जणू प्राध्यापकांना सारखीच. त्याच्या अंगी हुशारी एवढी होती की तो जणू मोठ्या मोठ्या लोकांना पाणी पाजत असे.चौथी पास झाल्यानंतर त्याने अनेकदा नोकरी केली परंतु गाव काही सुटत नव्हते. काही केल्या गावाला तो सोडू शकत नव्हता. शेतीमध्ये जीव रमलेला होता. वडिलांची कोरडवाहू पंचवीस एकर जमीन जेवढे पिकवणार तेवढेच मिळवणार अशी परिस्थिती. सदा बुद्धीने जरी हुशार असेल परंतु मनाने अतिशय साधा भोळा होता.

आपल्या घरच्यांबरोबर त्याला आपल्या गावांमध्ये आयुष्य जगायचे होते त्याच बरोबर घरात सर्वात मोठा असल्याने संपूर्ण घराची जबाबदारी त्यांच्यावर होती.नोकरी करायची पण गाव काही सुटे ना म्हणून सकाळी लवकर उठून रस्त्यावरची कामे करायचा. सकाळी लवकर उठल्यावर रस्त्यावरचे खड्डे बुजवण्याचे काम तो करू लागला. अडचण नको म्हणून शरीरथके पर्यंत राबायचा. गावातला तो एकदा एकटाच नोकरदार परंतु आता तो थकू लागला होता, शरीरानं जड काम होत नसे..

डोळ्यांना लांबचे दिसत नव्हते. सदाला गावाबाहेर जाऊन जरी नोकरी करायची इच्छा असली तरी तो गावांमध्ये राहूनच काम करत असे परंतु त्याचे स्वप्न असे होते की आपल्या मुलाने खूप मोठे व्हावे आणि शहरांमध्ये जाऊन मोठी शिक्षण घ्यावी आणि त्याच्या पंखांना बळ द्यावे. पोराला मोठं शिकवायचे स्वप्न उराशी बांधलेला सदा तसाच काम करत राहायचा. मुलाला डॉक्टर बनवायचे स्वप्न मनाशी बांधून तो जसे शक्य होईल तसे काम करत असे. सदा आपल्या मुलाला शिकवण्यासाठी प्रचंड मेहनत करत असेल आता तर मुलगा मोठा झाला.

सदाने आपल्या मेहनतीच्या जोरावर आपल्या मुलाला मोठ्या डॉक्टर बनवला आणि मुलगा सुद्धा शहरातील चांगला मोठा डॉक्टर झाला आणि मुंबईला राहू लागला. सणवार आला की सदा व त्याची बायको मीनाक्का मुलाची वाट पाहत असे. कोणी शहराकडून गावाला आले तर त्याची विचारपूस करत असे. गावात एसटी आली तर आई मोठ्या नजरने इकडे तिकडे पाहत असे. दरवाज्यावर आवाज आला तर हातामध्ये माती घेऊन नजर काढण्यासाठी धावत पळत येत असे परंतु मुलगा काही शहराकडून येत नसे लवकर नंतर वाट पाहून पाहून नजर थकु लागली.

हे वाचा:   नवऱ्याचा संशयी स्वभावाने त्याने बायकोसोबत जे केले ते पाहून तुम्हीसुद्धा हादरून जाल.!

मुलगा शहरात राहत असल्याने काही दिवसानंतर त्याचे पावले गावाकडे येणार पूर्णपणे बंद झाली यासाठी सदाने व मीना आक्का यांनी शहरातील मुलगी पाहून कालांतराने त्यांनी आपल्या मुलाचे लग्न मोठ्या थाटामाटामध्ये लावून दिले. या लग्नाच्या धावपळीमध्येच सदा आजारी पडला आणि चार महिने अंथरूणाला खिळून बसला. सदाला मोक्ष गती प्राप्त झाली परंतु मीना आक्का ओक्साबोक्शी रडू लागली. वडिलांचे दहावेचे कार्य झाल्यानंतर मुलगा शहराकडे निघून गेला. मुलगा मधून मधून आईला भेटायला येत असे त्यानंतर त्याला मूलबाळ झाली हळूहळू गावाकडे याचा प्रवास कमी होऊ लागला.

आता मुलगा शेठ झाला होता आईला भेटायला कमी येऊ लागला त्यानंतर भेट सुद्धा हळूहळू कमी होऊ लागली पण मिनाक्का नेहमी त्याची वाट पाहत असे.गावाकडे एसटी आली तर एसटी तून मुलगा मुलगा येईल या आशेने वाट पाहत असे.. मुलगा शहरात जाऊन श्रीमंत होऊ लागला. गावाकडची झोपडीतल्या भिंती त्याला टोचू लागल्या परंतु मुलगा गावी आल्या नंतर आई धावत धावत यायची. अंगावरून भाकरीचा तुकडा ओवाळायची. मुलासाठी काय बनवू? काय नाही असे होत असे.

जाताना मुलाला खायला बांधून सुद्धा देत असे परंतु मुलगा शहरात गेल्यावर मुलाची बायको ते सगळे पदार्थ कचऱ्याच्या डब्यात टाकून देत असे. तिला वाटायचे की आपली नातवंडे यांनी आपण दिलेले पदार्थ खाल्ले असतील. कालांतराने मुलगा गावाकडे कमी होऊ लागला, हळूहळू बंद झाला… एकेदिवशी मुलगा अचानक गावात आला आणि येताना मोठी गाडी घेऊन आला कदाचित त्याला आपली श्रीमंती दाखवायची असेल, की आता त्याचा मुलगा श्रीमंत झालेला आहे आणि तसेच त्यांनी आपल्या आईला गाडीमध्ये बसवले व शहराकडे घेऊन आला.

शहरात कडे येताना मीना आक्का पहिल्यांदाच गाडीमध्ये बसलेली होती आणि गाडीच्या काचा वरून हळू हळू हात फिरवत होती, अचानक तिला सदाची आठवण आली. आज सदा असता तर तो सुद्धा खूप खुश झाला असता. तेथील लोक मीनाआक्का कडे बघून खुश होती. तिच्याकडे पाहत होती. शहरात आल्यानंतर काजवा सारखी लाईट पाहून मीनाक्का गोंधळून गेली. शहरात आल्यावर बंगल्यामध्ये शिरल्यावर जशी अवदसा समोर यावी तशी गाऊन घालून सुनबाई समोर आली.मीनाक्का ला कळले नाही की सुनबाई ने नेमके काय घातलेले आहे.

इशारा करुन सूनबाईने तिथेच थांबायला सांगितले तिथेच पाणी दिले तिथेच जेवायला वाढले आणि तिकडेच मीना आक्का घराच्या बाहेर झोपून गेली. रात्रभर डास चावत होते सकाळी उठल्यावर कसलीतरी कार्यक्रम आहे याची चाहुल मीना आक्का ला जाणवली होती. घरामध्ये पाहुणे आले होते परंतु मीना आक्काला चहाशिवाय कोणीच काही विचारले नव्हते परंतु पाहुण्यांना चांदीच्या ग्लासमध्ये दूध शिरा सर्व पदार्थ मिळत होते नंतर कळाले की नातिला पाहायला मुलगा आलेली आहेत हे पाहून मीनाआक्का ला आनंद झाला आज सदा असता तर नक्की खुश झाला असता ,त्याची तिला आठवण येऊ लागली.

हे वाचा:   नारळाची साल फेकून देत असाल तर आताच थांबा; नारळाच्या सालीचे हे फायदे ऐकून व्हाल हैराण.!

थोड्या वेळा नंतर घरातील पाहुण्यांची नजर मीना आक्कावर पडली व पाहुण्यांनी विचारपूस केली तेव्हा सुने ने सांगितले की ,ही कामवाली बाई आहे. संडास साफ करण्यासाठी थांबली आहे. हे ऐकताच तिच्या डोळ्यात पाणी आले आणि तिची शरमेने मान खाली गेली. मुलगा होता परंतु तो एक शब्द बोलला नाही कारण की त्याला आपली इज्जत महत्वाची होती. थोड्या वेळानंतर मीना आक्का तशीच उठून रुमाल गाठोडे घेऊन शहरातून गावाकडे परतली.अनेक दिवस गावांमध्ये राहू लागली ,ज्या सदाने रस्त्यावर राब राब राबून मुलाला मोठे केले त्यानेच आपल्याला असे बोलावल्याचा तिला पस्तावा होत होता.

तिला दोन दिवस अन्नपाणी गोड लागले नव्हते. शहरामध्ये सुनेने केलेला अपमान तिला वारंवार आठवू लागला. ती स्वतःला व आपल्या नशिबाला बोल लावू लागली परंतु आता करायचे तरी काय ? असा प्रश्न तिच्या मनामध्ये निर्माण होऊ लागला जुन्या आठवणी आठवून ते रडू लागत होती आणि स्वतःच्या भाग्याला बोलावत होती आणि ती तशीच उठून शेतामध्ये कारल्याच्या वेलाखाली बसली.

कारल्याचे वेलीकडे एकटक बघत विचार करू लागली आणि स्वतःशी बडबड करू लागली आणि “कारले पेक्षा कडू अवलाद आपल्या पोटी जन्माला कशी काय आली? ” याचे तिला दुःख व नवल वाटत होते आणि बघता बघता तिने शेतामध्ये पेरणी करण्यासाठी आणलेली बी बियाणे लावण्याची बाटली तोंडाला लावली आणि या स्वार्थी जगातून निरोप घेतला. मीना आक्का तडफडून शेतात तशीच मरण पावली.

मीना आक्काचे सर्व कार्य गावातील लोकांनी केले परंतु मुलगा काही आला नाही. खुप दिवसानंतर मुलगा गावी परतला परंतु मुलगा जेव्हा गावी आला तेव्हा शेतासाठी गिऱ्हाईक घेऊन आला, त्याला त्या शेताच्या जमिनीवर बंगला बांधून त्याचे भाडे खायचे होते. जेव्हा मुलगा शेतामध्ये आला होता तेव्हा मीना आक्काचा एक नातेवाईक जवळ आला आणि लाल भडक होऊन मुलाच्या चेहऱ्याकडे पाहून म्हणाला आलास का भा’डखा’ऊ.?

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.