हिंदू धर्म शास्त्रामध्ये अशा काही विधी असतात या विधीना अत्यंत महत्त्व मानले जाते, त्यापैकी एक विधी म्हणजे कपाळावर कुंकू लावणे ही होय. अनेकदा विवाह झाल्यानंतर पत्नी आपल्या नवर्याच्या नावाने कपाळावर कुंकू लावत असते परंतु आजच्या लेखामध्ये आज आम्ही तुम्हाला कुंकू कशा पद्धतीने लावायचे आहे? कुंकू लावण्याची योग्य पद्धत कोणती आहे? कोणत्या बोटाने कुंकू लावायला हवा.?
त्याचबरोबर चुकीच्या पद्धतीने कुंकू लावण्याची कोणते परिणाम तुम्हाला भोगावे लागू शकतील व तसेच कुंकू लावण्याचे नेमके काय फायदे आहेत? याबद्दल सविस्तर माहिती आजच्या लेखामध्ये सांगणार आहोत. सवाशन स्त्रिया कपाळी कुंकू लावत असतात. कपाळी कुंकु लावत असताना कधीही चारचौघांमध्ये लावू नये त्याचबरोबर कपाळी कुंकू लावताना नेहमी आपल्या बेडरूममध्ये जाऊन एकांतात कपाळाला कुंकू लावायला पाहिजे त्याचबरोबर आपल्या कुंकवाचा डब्बा सुद्धा वेगळा असायला हवा. इतरांस सोबतच तो कुंकवाचा डब्बा ठेवू नये.
आपण आपल्या मेकअप चा सामान इतरांसोबत शेअर करत असतो परंतु कूंकुवाचा डब्बा कधीही चुकून एकमेकांसोबत शेअर करू नका. कपाळी कुंकू लावण्याचे वेगळे प्रकार आपल्याला बाजारामध्ये सहज उपलब्ध होताना पाहायला मिळतात त्याच बरोबर कोरडा कुंकू, शेंदूर व त्याचे वेगळे प्रकार सुद्धा बाजारामध्ये उपलब्ध असतात.कपाळाला कोरडा कुंकू लावणे अत्यंत शुभ मानले जाते.
जेव्हा आपण कपाळावर कोरडा कुंकू भरत असतो तेव्हा जर कुंकू तुमच्या नाकावर पडत असेल तर हे लक्षण अत्यंत शुभ मानले जाते याचा अर्थ असा होतो की तुमच्या पतीचे तुमच्यावर खूप प्रेम आहे. कुंकवाची डबी ठेवताना शक्यतो लहान मुलांचा हात पोहोचणार नाही अशा पद्धतीने ठेवा. अन्यथा कुंकू जमिनीवर पडून त्याची अवहेलना सुद्धा होऊ शकते.
जर आपल्या हातून व इतरांच्या हातच्या कुंकू जमिनीवर चुकून पडला तर आणि त्या कुंकवाला नमस्कार करावा व थोडासा कुंकू घेऊन कपाळाला लावावा व त्यानंतर उरलेला कुंकू डब्यात भरून ठेवावा व जमिनीवर जो कुंकू पडलेला आहे. तो कुंकू एखाद्या झाडा मध्ये टाकून द्यावा. कुंकू पायाखाली येणार नाही याची शक्यतो काळजी घ्या. सकाळी आंघोळ केल्यानंतर सकाळी भांग भरा.आंघोळ करण्याआधी भांग भरू नका. तुम्ही दिवसभरातून कित्येकदा ही कपाळी कुंकू लावू शकता परंतु दिवसभरातून दोन वेळा तरी कपाळी कुंकू आवश्य लावा.
जी स्त्री एका बाजूला तिरकस भांग भरते अशा व्यक्तीचा पती सुद्धा तिच्या पासून दूर होऊन जातो पण त्याचबरोबर समाजामध्ये अशा सुद्धा काही स्त्रिया आहेत तुझ्या कपाळी भांग भरतांना तो झाकून देतात अशा व्यक्तींचा अति सुद्धा समाजामध्ये सगळ्यांपासून अलिप्त राहतो म्हणून कुंकू लावताना नाकाच्या शेंडे पासून सरळ मधोमध एका टोकाला लावा. जर तुम्ही कुंकू कपाळी लावत असेल तर तुमच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाने कपाळी कुंकू लावा.
सवाशन स्त्रीच्या जीवनामध्ये कुंकवाला अतिशय महत्त्व प्राप्त झालेले आहे. लग्नाच्या आधी मुलगी टिकली लावते, लिपस्टिक लावते परंतु कुंकू कपाळी लावत नाही म्हणून लग्न झाल्यानंतर पती च्या हाताने कपाळावर कुंकू लावला जातो आणि भांग सुद्धा भरला जातो. जेव्हा एखाद्या मुलीचे लग्न होते तेव्हा सर्वप्रथम तिच्या पतीच्या हाताने तिच्या कपाळावर भांग भरला जातो आणि याच वेळेला कुमारी पासून तर सवाशन चा प्रवास तिचा सुरू होतो.
कपाळी कुंकू लावताना तो चांगल्या दर्जाच्या लावायला हवा जेणेकरून कोणत्याही प्रकारची तुम्हाला रिएक्शन होणार नाही. कपाळी कुंकू लावल्याने स्त्रियांच्या सौंदर्यामध्ये सुद्धा भर पडत असते आणि त्याच बरोबर त्यांच्या वैवाहिक जीवनामध्ये सुद्धा अनेक फायदे होत असतात म्हणून स्त्रियांनी कपाळामध्ये भांग अवश्य भरला पाहिजे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.