सध्याच्या काळामध्ये आपण अनेक नैसर्गिक गोष्टी चा उपयोग न करता मानवनिर्मित गोष्टी यांचा उपयोग भरपूर प्रमाणामध्ये करत आहोत आणि यामुळेच अतिवापरामुळे कॅन्सर सारख्या अनेक गंभीर समस्या सुद्धा आपल्याला सामोरे जावे लागत आहे. अनेकदा मानवाने बनवलेल्या या गोष्टींचा आपण वापर करत आहे आणि कालांतराने या गोष्टींची आपल्याला सवय होऊन जाते आणि हेच भविष्यामध्ये कुठेतरी संकटाला आमंत्रण देणारी ठरत आहे. अशा अनेक गोष्टी आहेत त्यांचा आपण दैनंदिन जीवनामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वापर करत आहे.
आजच्या लेखामध्ये आणि तुम्हाला अशा तीन गोष्टी सांगणार आहोत, त्या गोष्टींचा वापर आपण नेहमी करत असतो. या गोष्टींच्या अतिवापरामुळे तुमच्या जीवनामध्ये अनेक संकटे येऊ शकतात आणि तुमच्या आरोग्य वर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो आणि ह्या तीन वस्तू आपल्या घरामध्ये सहज मोठ्या प्रमाणावर उपलब्ध होतात आणि त्यांचा वापर सुद्धा अनेकदा होत असतो.
त्यातील पहिली वस्तू आहे ती म्हणजे प्लास्टिक चे ग्लास.सध्याच्या काळामध्ये आपल्यापैकी अनेक जण प्लास्टिक चे ग्लास वापरतात त्याचबरोबर चहा पिण्यासाठी, दूध पिण्यासाठी व बाहेर कुठे बाहेर जाताना सरासर आपण सॉफ्ट असलेले प्लास्टिक ग्लास वापरत असतो परंतु हे ग्लास सॉफ्ट प्लास्टिक ने बनलेले असतात आणि त्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये रासायनिक पदार्थ सुद्धा समाविष्ट असतात.
हे ग्लास पॉलिस्टर ने बनलेली असतात आणि यावेळी जेव्हा आपण त्यामध्ये गरम पदार्थ टाकतो तेव्हा रासायनिक प्रक्रिया घडून त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होतो आणि या वस्तूंचा जर आपण जास्त प्रमाणात वापर केला तर कॅन्सरसारख्या रोगाने आमंत्रण ठरू शकतो म्हणून प्लास्टिक सॉफ्ट ग्लास यांचा जास्त प्रमाणामध्ये वापर करू नये त्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे डास मारण्यासाठी वापरण्यात येणारी अगरबत्ती किंवा कॉईल.
अनेकदा आपल्या घरामध्ये डास, माशा झाले असतील तर आपन कॉईल चा वापर करत असतो आणि हे कॉइल बहुतेक वेळा रासायनिक पदार्थ पासून बनलेले असतात आणि त्याच वेळी जेव्हा आपण हे कॉईल जाळतो तेव्हा त्या धुरामध्ये सुद्धा रासायनिक घटक हवेमध्ये मिसळत असतात आणि यामुळे आपल्याला अनेक आजार सुद्धा होण्याची शक्यता असते म्हणून शक्यतो डास पळवण्यासाठी घरगुती उपाय करण्यावर जास्त भर द्या त्यानंतर तिसरी गोष्ट आहे अगरबत्ती.बहुतेक वेळा आपल्या घरांमध्ये देव पूजा करताना आपण अगरबत्ती चा वापर करत असतो.
अगरबत्ती ही वेगवेगळ्या सुवासिक पदार्थांनी बनवलेली असते आणि हे सुवासिक पदार्थ वेगवेगळ्या रासायनिक घटना पासून तयार केलेले असतात आणि ज्यावेळी आपण अगरबत्ती जाळतो तेव्हा हे रासायनिक घटक सुद्धा हवेमध्ये मिसळत असतात आणि यामुळे अनेकदा आपल्याला एलर्जी इन्फेक्शन सुद्धा होऊ शकतो व त्याचबरोबर कॅन्सर सारख्या रोगाची लक्षणे सुद्धा अनेकदा उद्भवू शकतात याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून जास्त प्रमाणामध्ये देवपूजा करत असताना अगरबत्तीचा वापर करू नये तसे तर मानवाने सध्या अनेक नैसर्गिक गोष्टींचा वापर करण्यास कमी केलेला आहे.
सध्याच्या काळामध्ये मनुष्य जास्तीत जास्ती मानवनिर्मित वस्तूंचा वापर करू लागलेला आहे आणि यामुळे त्याला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे म्हणून तुम्ही तुमच्या आहारामध्ये तसेच जीवनामध्ये जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टींचा उपयोग करा, जेणेकरून तुमचे आरोग्य तर चांगले राहील त्याचबरोबर कोणत्याही प्रकारची शारीरिक अडचणी तुम्हाला भविष्यात येणार नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.