फक्त या मिश्रणाचा वापर करा आणि सर्दी, खोकला, ताप या समस्या पासून सुटका मिळवा. सर्दी ,खोकला ,ताप जर तुम्हाला आलेला असेल तर अशा वेळी घरगुती उपचाराने आज आपण आपल्या उपायाद्वारे सर्दी खोकला ताप दूर करणार आहोत त्याच बरोबर जर तुमची रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा कमी झालेली असेल तर ती शक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळी माहिती जाणून घेणार आहोत.
या मिश्रणाचा काही दिवस तुम्ही जर उपयोग केला तर तुमच्या छातीमध्ये कफ झाला असेल,सर्दी ,खोकला असेल तर या सर्व समस्या लवकरच दूर होऊन जाणार आहेत.
हा उपाय करण्यासाठी आले लागणार आहे. या आलेचे साल काढून घ्यायचे आहे आणि बारीक किसून त्याची पेस्ट बनवून द्यायची आहे त्यानंतर गॅस मंद आचेवर ठेवून त्यामध्ये एक चमचा साजूक तूप टाकायचे आहे त्यानंतर आपल्याला हा उपाय करण्यासाठी एक वाटी गूळ वापरायचा आहे त्याच बरोबर काळीमिरी घेऊन त्याची पावडर टाकायची आहेत आता हे मिश्रण आपल्याला व्यवस्थित मिक्स करून त्याची पेस्ट बनवून घ्यायचे आहे.
पेस्ट व्यवस्थित बनवून झाल्यानंतर एका वाटीमध्ये हे मिश्रण टाकायचे आहे. लहान मुलांना सर्दी ,खोकला किंवा छातीमध्ये कफ झालेला असेल तर अशावेळी हे पाव चमचा मिश्रण त्या मुलाला द्यायचे आहेत जर मोठ्या व्यक्तींना सर्दी, खोकला, ताप व छातीत कफ झालेला असेल तर अशा वेळी अर्धा चमचा आपल्याला हे मिश्रण द्यायचे आहे.
हे मिश्रण तुम्ही दिवसभरातून दोन वेळा सुद्धा घेऊ शकता. जेवण झाल्यानंतर किंवा नाश्ता झाल्यानंतर हे मिश्रण तुम्ही घेऊ शकता, असे एक महिना हा उपाय केल्याने तुम्हाला सर्दी खोकला व छातीमध्ये कफ श्वसनाची समस्या निर्माण झालेली होती ती पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे आणि हा उपाय अतिशय आयुर्वेदिक असल्याने या उपायाचा कोणत्याच प्रकारचा दुष्परिणाम सुद्धा होत नाही म्हणून हा उपाय अवश्य करा आणि आपले आरोग्य जपा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.