झोप येत नसेल तर करा हा चत्मकारी उपाय; झोपेच्या गोळ्या घ्यायची गरजच पडणार नाही.!

आरोग्य

बऱ्याच लोकांना झोप लागत नाही.अनेकांना कामामुळे रात्र-रात्र जागे राहावे लागते, झोपायला गेले तरी झोप लागत नाही. अनेकांना निद्रानाशाची समस्या सतावत असते आणि अनेक जण वेगवेगळे उपाय सुद्धा करत असतात परंतु या सर्व उपायांचा आपल्याला हवा तसा काही परिणाम जाणवत नाही आणि अनेक औषधे करून सुद्धा आपल्या शरीराला त्याचा विपरीत परिणाम भोगावा लागतो म्हणूनच आजच्या लेखामध्ये आम्ही तुमच्यासाठी काही असे घरगुती व आयुर्वेदामध्ये महत्त्वाचे मानले गेलेले उपाय सांगणार आहोत.

हे उपाय अतिशय साधे सोपे पण तेवढेच प्रभावी आहेत. जर आपल्याला पुरेशा प्रमाणामध्ये झोप मिळाली तर आपले शरीर मजबूत राहते. आपल्या शरीरातील रक्त पेशी व मांस पेशी चांगल्या पद्धतीने कार्य करू लागतात व आपल्या शरीराला नेहमी तरतरी प्राप्त होते.आपण जे कार्य करतो ते कार्य पूर्णपणे शंभर टक्के यशस्वी करण्याचा प्रयत्न करत असतो जर आपली झोप पुर्ण झाली नसेल तर आपले शरीराला नेहमी अशक्तपणा जाणवत असतो आणि आपण जे काम हाती घेत होते काम पूर्णपणे व्यवस्थित होत नाही त्यामध्ये अनेक अडथळे निर्माण होत असतात.

हे वाचा:   जपानी लोक इतके दीर्घायुषी कसे जगतात..यामागील रहस्य जाणून आश्चर्य वाटेल...तुम्ही देखील या गोष्टी करून १०० वर्षापर्यंत निरोगी आयुष्य जगू शकता..

अनेकदा आपल्याला झोप येत नसेल तर त्यासाठी पित्त, वात, संधिवात सुद्धा कारणीभूत ठरतो.अनेकदा आपण धावपळीच्या जीवनामध्ये जगत असताना अनेक जण आपल्या जेवणाची वेळ व आहाराकडे दुर्लक्ष करत असतात आणि कधीही जेवण करत असल्यामुळे आपल्या शरीरात ऍसिडिटी पित्त यासारख्या समस्या उद्भवू लागतात त्याचबरोबर अनेक जण दुपारी एक ते दोन तास झोपतात सहजपणे असे केल्याने रात्री झोप येणार नाही म्हणूनच आपल्याला दुपारी झोपायचे नाही.

त्याचबरोबर अनेक लोक आहेत त्यांना काही केल्या रात्री झोप लागत नाही अशा वेळी जर आपण एक ग्लासभर म्हशीचे दूध झोपण्याआधी प्यायले तर आपल्याला झोप शांत लागते कारण की म्हशीच्या दुधामध्ये असे अनेक पोषक घटक असतात जे आपल्याला शरीराला पौष्टिक घटक प्राप्त करून देण्यास मदत करत असतात आणि यामुळे दिवसभर जे आपण कष्ट केलेले असते त्यामुळे आपल्या शरीराला थकवा येतो आणि रात्री शांतपणे झोप लागते त्याचबरोबर रात्री झोपताना आपण आपल्या तळहातांना थोडेसे तूप लावले व तळ पायांना थोडेसे तूप लावले तर रात्री झोप सुद्धा आपल्याला शांत लागते.

हे वाचा:   हा १ घरगुती रामबाण उपाय केल्याने उवा कायमच्या निघून जातील; केस पण होतील लांब व काळेभोर.!

त्याच बरोबर रात्री झोपताना आपल्या दोन्ही नाकपुड्या मध्ये साजूक तुपाचे दोन दोन थेंब टाकून झोपल्याने आपली झोप पूर्णपणे चांगली होती त्याचबरोबर आयुर्वेदिक शास्त्रामध्ये झोप लागण्यासाठी एक महत्त्वाचा उपाय सांगण्यात आलेला आहे, तो म्हणजे अश्वगंधा चूर्ण ,ब्राह्मणी चूर्ण आणि शतावरी चूर्ण हे तिन्ही चूर्ण एकत्र करून एक ग्लासभर दूध मध्ये हे मिश्रण आपल्याला टाकायचे आहे आणि रात्री झोपताना प्यायचे आहे, अशा पद्धतीने जर आपण आठ दिवस हा उपाय केला तर आपल्या झोपेच्या संदर्भात ज्या काही समस्या असेल त्या पूर्णपणे दूर होणार आहे आणि तुम्हाला हा उपाय केल्याने शांत झोप सुद्धा लागणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.

टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.