बऱ्याच व्यक्तींना वजन वाढणे ,पित्त , ऍसिडिटी खाल्लेल्या अन्नाचे पचन न होणे,रोजच्या रोज पोट साफ न होणे या सारख्या समस्या उद्भवत असतात आणि सध्या तर आपण पाहतो की सर्वत्र लॉक डाऊन सुरू आहे आणि यामुळे आपली शारीरिक हालचाल, व्यायाम आणि बरेचसे काम देखील कमी झालेले आहे आणि म्हणूनच बऱ्याच व्यक्तींना या वरील समस्यांना सामोरे जावे लागत आहे पण जर तुम्ही हा घरगुती उपाय केला तर तुमच्या सर्व समस्या दूर होण्यास नक्कीच मदत होणार आहे, चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..
हा उपाय करण्यासाठी आपल्याला सर्वप्रथम एक ग्लास पाणी गरम करायला ठेवायचे आहे त्यानंतर आपल्याला कढीपत्त्याची पाने घ्यायची आहेत. या पानांना आयुर्वेदिक शास्त्रामध्ये अत्यंत महत्त्वाचे मानले गेलेले आहे. कढीपत्त्याच्या पानांमध्ये असे काही औषधी गुणधर्म असतात ते आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात.
हा उपाय करण्यासाठी आपल्याला सात ते आठ कढीपत्त्याची पाने घ्यायची आहेत. ही पाने आपण दोन ते तीन वेळा स्वच्छ धुऊन घ्यायची आहे.पाणी गरम झालेला आहे, त्यामध्ये ही पाने आपल्याला ऍड करायचे आहेत. कढीपत्त्याची पाने आपल्याला उपायासाठी हिरवी पाने घ्यायची आहे तसेच ही पाने स्वच्छ धुऊन देखील घ्यायची आहे जेणेकरून यावरील धूळ माती नाहीशी होईल.
ही साधारणपणे एक ग्लासभर पाण्यामध्ये आपल्याला मिक्स करायचे आहेत आणि ही पाने चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचे आहेत. यामुळे आपल्या पाण्याचा रंग देखील बदललेला असेल .कढीपत्त्याच्या पानाचा उपयोग पांढरे केस काळे होण्यासाठी तसेच पित्त, ऍसिडिटी आणि अपचन यावर गुणकारी आहेत.
यामध्ये दोन पदार्थ आपल्याला ऍड करायचे आहे ते म्हणजे अर्धा लिंबू रस व काळे मीठ. त्यानंतर हे मिश्रणामध्ये आपल्याला काळे मीठ आणि लिंबाचा रस मिसळायचा आहे आणि हे मिश्रण गरम असतानाच आपल्याला प्यायचे आहे आणि हे पेय आपण दिवसभरात कधीही एक वेळेस सकाळी दुपारी किंवा संध्याकाळी एक वेळेस नियमितपणे पिऊ शकतो.
अशा प्रकारे काहीही खर्च न करता अगदी घरच्या घरी एका उपायाने तीन समस्या म्हणजेच पांढरे झालेले केस काळे करण्यासाठी, पित्त ,ऍसिडिटी दूर करण्यासाठी आणि महत्त्वाचे म्हणजे कितीही भयंकर वाढलेले वजन देखील कमी करण्यासाठी याचा उपयोग खूप चांगल्या प्रकारे होतो म्हणून हा उपाय अवश्य करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.