मधुर गोड असलेली पपई तुम्ही नक्की खाल्लेली असेल. पपई मध्ये अनेक औषधी गुण असतात त्याच प्रमाणे आज आपण पपईच्या पानाचे औषधी गुणधर्म पाहणार आहोत. पपईची पाने जडीबुटी प्रमाणे असतात, यामध्ये अनेक मोठे औषधी गुणधर्म आढळून येतात तसेच आजारपणा मध्ये खंगलेल्या माणूस देखील बरा होतो. डेंगू, मलेरिया, कॅन्सर यासारखे आजारा मधून सुद्धा पपईची पाने उपयोगी ठरतात.
पपईच्या पानाचे नियमितपणे सेवन केल्याने मलेरिया ,डेंग्यू ,कॅन्सर, हृदयविकार रक्तातील जास्त झालेली साखर यासारख्या अनेक आजारांपासून मुक्ती मिळते. नियमितपणे पपईचा रस पिल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते. सर्वात प्रथम पपईच्या पानाचा रस कसा तयार करायचा ते आपण जाणणार आहोत. पपई चे दोन ते तीन मध्यम वाढ झालेली पाने घ्यावी .पाने फार पिकलेली किंवा कोवळी नसावी.
हे ताजी पाने स्वच्छ धुऊन बारीक कापुन घ्यावी व व स्वच्छ कापड घेऊन वस्त्रगाळ करून चोथा वेगळा होऊन खाली शिल्लक फक्त पानांचा रस राहतो. हा रस एका प्लास्टिकच्या बॉटल मध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवावा. एक गोष्ट लक्षात असू द्या की या रसाचा वापर तीन ते चार दिवसच करावा. तीन चार दिवसानंतर गरज पडल्यास नवीन रस तयार करावा.
पानांचा रस तयार करण्याची दुसरी पद्धत देखील अशी आहे की पाणी स्वच्छ धुवून घेऊन ती बारीक कापून गरम पाण्यामध्ये उकळून ते पाणी हिरवा झाल्यानंतर गॅस बंद करावा तसेच थंड झाल्यानंतर वस्त्रगाळ करून चोथा वेगळा करून शिल्लक राहिलेला रस दोन ते तीन दिवस वापरू शकता.
या पपईच्या पानाचा रस मलेरिया कमी करण्यासाठीही रोज सकाळ संध्याकाळ कपभर प्यावा. मलेरिया बरा होतो. डेंगूच्या तापासाठी देखील याचा वापर केल्यास गुण मिळतो तसेच नियमितपणे सेवन केल्याने रोग प्रतिकार शक्ती वाढते व अनेक आजार होण्यापासून आपला बच्चाव होतो.
शरीरातील पांढऱ्या पेशी कमी झाल्या असल्यास पपईच्या पानांचा रस 1 ग्लास पिल्यास प्लेटलेट्सची संख्या झपाट्याने वाढते त्याच प्रमाणे पपईची पाने केसांसाठी व त्वचेसाठी अतिशय लाभदायक आहे ती पाने पाण्या सोबत वाटून त्याची पेस्ट तयार करा व ती पेस्ट चेहऱ्याला पंधरा मिनिटे लावून ठेवा नंतर चेहरा धुऊन टाका.
त्यानंतर तुमचा चेहरा स्वच्छ गोरा व तजेलदार दिसू लागतो तसेच ही पेस्ट तुम्ही एक नॅचरल फेशवास म्हणून वापरू शकता, ज्या लोकांना भूक लागत नाही त्या लोकांना पिण्याचे पाणी चहा मध्ये टाकून दिल्यास भूक वाढते व पचनशक्ती वाढते होते हा घरघुती उपाय तुम्ही नक्की करून पहा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.