कच्चा लसूण खाणे आपल्या शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला गेलेला आहे. आयुर्वेदिक शास्त्रामध्ये लसूणाचे अनेक उपचार सांगण्यात आलेले आहे त्याचबरोबर आपण दैनंदिन जीवनामध्ये स्वयंपाक घरामध्ये लसूणाचा भरपूर प्रमाणामध्ये वापर करत असतो. लसूणाचा वापर अनेकदा मसालेदार पदार्थ बनविण्यासाठी केला जातो त्याचबरोबर एखादी अन्न बेचव असेल तर त्यांना चव देण्याचे कार्य सुद्धा लसूण करत असते.
लसूणाचा उपयोग आपल्या शरीरातील अनेक आजार दूर करण्यासाठी केला जातो परंतु या लसणाचा उपयोग आपल्या शरीराला फक्त उपाशीपोटी खाल्ल्यामुळे जास्त प्रमाणावर होत असतो. जर आपल्याला हृदयरोगाचा धोका असेल किंवा अन्य काही समस्या असेल तर अशा वेळी लसूण खाणे अतिशय उपयुक्त मानले जाते. लसुण निमित्ताने खाल्ल्याने आपल्या हृदयरोगाचा धोका होत नाही त्याच बरोबर आपल्या शरीरातील रक्ताच्या गाठी सुद्धा निर्माण होत नाही.
अनेकदा आपले पोट साफ होत नाही, पोटामध्ये गॅस निर्माण होतो अशा वेळी जर आपण लसूण खाल्ला तर आपले पोट साफ होण्यास मदत होते त्याचबरोबर जर आपल्याला बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तो सुद्धा दूर होतो. आपल्याला पोटाचा त्रास जास्त होत असेल तर अशा वेळी चार-पाच लसणाच्या पाकळ्या एक ग्लासभर पाण्यामध्ये टाकून चांगल्या पद्धतीने उकळल्याने मग ते थंड झाल्यावर प्यायल्याने आपल्या शरीरातील अनेक विषारी घटक बाहेर पडण्यास मदत होते.
अशा पद्धतीने आपले पोट सुद्धा स्वच्छ राहते. नियमितपणे लसुन खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्ताभिसरण सुद्धा चांगले राहते आणि त्याचबरोबर रक्तातील ऑक्सिजन सुद्धा चांगला राहतो. ज्या लोकांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे अशा लोकांनी लसूण नेहमी खाल्ले पाहिजे यामुळे आपला रक्तदाब नियंत्रणात येतो.
ज्या व्यक्तींना पोटाचा त्रास आहे अपचनाचा त्रास आहे ज्यांना कमी भूक लागते अशा व्यक्तींनी उपाशीपोटी लसुन नेहमी खाल्ले पाहिजे. लसुणमध्ये भरपूर प्रमाणामध्ये एंटीऑक्सीडेंट गुणधर्म उपलब्ध असतात आणि यामुळे आपल्या शरीरातील विषारी घटक बाहेर निघण्यासाठी मदत होते त्याच बरोबर जर आपल्याला सर्दी, खोकला, ताप, छातीमध्ये कफ असलेला असेल अशा वेळी जर आपण नियमितपणे लसूण चावून-चावून खाल्ल्या तर आपल्या छातीतील कफ पडण्यासाठी मदत होतो.
ज्या लोकांना रक्त पातळ करण्याच्या गोळ्या चालू आहेत अशा व्यक्तीने लसूण जास्त प्रमाणामध्ये खाऊ नये कारण की जास्त लसूण खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्त पातळ होते अशाप्रकारे लसणाचे अनेक औषधी गुणधर्म आहेत म्हणून या गुणांचा नेहमी सेवन करा आणि आपले आरोग्य चांगले बनवा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.