रक्त शुद्ध होऊन सगळ्या प्रकारच्या त्वचा विकारापासून तुमची सुटका होईल त्यासाठी करा हा एक घरगुती उपाय. अनेकदा महागड्या ट्रीटमेंट मुळे खरूज नायटा यासारखे अनेक समस्या तुम्हाला पुन्हा पुन्हा होत असतील तर अशा वेळी आज आम्ही तुम्हाला लेखा मध्ये एक महत्त्वाचा घरगुती उपाय सांगणार आहोत.
हा उपाय केल्याने तुम्हाला लवकरच फरक पडणार आहे आणि त्वचा विकाराचा समस्येपासून लवकरच सुटका मिळणार आहे. अनेक जणांना चेहऱ्यावर काळे डाग व एखादी जखम झाल्यावर त्यामध्ये पू साचतो अशी जर समस्या तुम्हाला सुद्धा असेल तर ती समस्या सुद्धा लवकर दूर होणार आहे. अनेकदा महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान भरपूर प्रमाणामध्ये रक्त बाहेर पडत असल्यामुळे ॲनिमियाचा त्रास होत असतो. हा त्रास सुद्धा हा उपाय केल्यामुळे दूर होणार आहे. चला तर मग जाणून घेऊया हा उपाय कसा बनवायचा त्याबद्दल..
त्वचा विकार दूर करण्यासाठी आपल्याला सान लागणार आहे. जर तुमच्याकडे सांन नसेल तर अशावेळी तुम्ही एक सपाट दगड सुद्धा घेतला तरी चालेल आणि त्यानंतर तुम्हाला कात लागणार आहे हाच जो पदार्थ आपण पान खाण्यासाठी सुद्धा वापरत असतो. हा कात आपल्याला थोडासा उगाळून त्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि हे पेस्ट आपल्याला ज्या ठिकाणी खाज खरुज आहे अशा प्रभावित जागेवर लावायची आहे.
अनेकदा आपल्या शरीरामध्ये रक्ताची कमतरता निर्माण होत असते अशा वेळी सुद्धा आपल्याला हा कात उपयोगी ठरत असतो. आपल्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे त्या साहित्याच्या आधारे आपण त्याची बारीक पावडर करून घ्यायची आहे आणि त्यानंतर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये ही पावडर टाकून जेवण झाल्यानंतर अर्ध्या तासानंतर हे पाणी आपल्याला द्यायचे आहे.
हा उपाय आपण पंधरा दिवस सातत्याने केली तर आपल्या शरीरातील रक्ताचे समस्या लवकर दूर होते आणि त्याच बरोबर त्वचाविकार सुद्धा नष्ट होण्यास मदत होते. जेव्हा आपण प्रभावित जागेवर ही पेस्ट लावण्याचा प्रयत्न करणार आहोत अशा वेळी त्वचा स्वच्छ धुऊन त्यावर थोडीशी खोबरेल तेल लावून हलकीशी मसाज करा आणि त्यानंतरच ही पेस्ट लावा असे केल्याने तुमचे त्वचाविकार लवकरच दुर होणार आहे म्हणून हा उपाय अवश्य करा.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.