कॅलेंडर या दिशेला लावा पैसा तुमच्याकडे नेहमी आकर्षित होत राहील. वर्ष सुरू झाले झाले तर आपण या दोन गोष्टी नक्कीच विकत आणत असतो त्यातील पहिली वस्तू म्हणजे कॅलेंडर आणि दुसरी गोष्ट म्हणजे डायरी. आपल्या घरात लावलेले कॅलेंडर हे आपल्याला सर्वात जास्त प्रभावी करत असते.
जर हे कॅलेंडर आपण चुकीच्या दिशेला लावले तर त्यामुळे आर्थिक समस्या निर्माण होतात म्हणूनच कॅलेंडर घरामध्ये योग्य दिशेला लावणे गरजेचे आहे. वास्तुशास्त्रानुसार आपण कॅलेंडर चुकीच्या दिशेला लावले तर आपल्या जीवनाचा प्रवास चुकीचा ठरू शकतो म्हणूनच आजच्या या लेखामध्ये आपण कॅलेंडरच्या संदर्भात महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊयात या विषयी..
जर आपण कॅलेंडर लावण्याच्या दिशा बद्दल योग्य योग्य ती काळजी घेतली तर सगळ्या गोष्टी तुमच्या मनाप्रमाणे घडू शकतील. तुमच्या जीवनात खूप सारा पैसा धन मिळेल. कॅलेंडर हे कधीही दक्षिण दिशेला लावू नये. घरातील दक्षिण भिंतीवर कधीच कॅलेंडर लावू नका कारण जेव्हा आपण कधी कॅलेंडरवर तारीख , वार, पाहत असतो अशा वेळी आपले तोंड दक्षिण दिशेला जाते आणि दक्षिण दिशा ही नकारात्मक दिशा मानली जाते.
अनेक जण आपल्या घराच्या मागे असणाऱ्या खीळाला कॅलेंडर लावत असतात हे सुद्धा काही बरे नाही तसेच खिडकीच्या समोर सुद्धा कॅलेंडर लावणे योग्य नाही याचे कारण असे की खिडकीमधून सतत येणाऱ्या वाऱ्यांमुळे कॅलेंडरची पाने नेहमी उडत राहतात आणि याच्या आवाजामुळे आपल्या घरामध्ये नकारात्मक उर्जा प्रवेश करत असते त्यामुळे आपल्या घरात येणारा सकारात्मक ऊर्जेला अडथळा निर्माण होतो.
जर तुम्हाला व्यवसायामध्ये प्रमोशन मिळवायचे असेल तर अशावेळी ते कॅलेंडर हे उत्तर दिशेला लावावे. उत्तर दिशा ही धनाची दिशा म्हणजेच कुबेराची दिशा मानली जाते. कॅलेंडर हे पूर्व दिशेला लावले तरी चालेल पण दक्षिण सोडून कोणत्याही दिशेला लावू शकतो त्याचबरोबर एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा आपण नवीन कॅलेंडर विकत घेतो तेव्हा जुने कॅलेंडर हे काढून टाकावे.
जुन्या कॅलेंडर वर काही नोंदी असतील तर त्या कुठेतरी लिहून ठेवाव्यात परंतु जुने कॅलेंडर घरात ठेवू नये यामुळे वास्तुदोष निर्माण होतो त्याचबरोबर नवीन कॅलेंडर विकत घेत असताना त्यावर कोणत्याही प्रकारची हिंसक चित्र असावे याची सुद्धा काळजी घ्या.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.