दैनंदिन जीवनात आपण अनेक धावपळ करत असतो ,बदलेली जीवनशैली यामुळे याचा आपल्या आरोग्यवर विपरीत परिणाम होत असतो. त्यामुळे अनेक समस्या सुद्धा आपल्याला झेलावे लागतात. बऱ्याच जणांना अपचनाचा त्रास होत असतो. खाल्लेले पचत नाही ,खाल्लेले अंगी लागत नाही त्यामुळे शरीरात गॅस वाढत जाते. छातीमध्ये जळजळ निर्माण होऊ लागते, आंबट पाणी तोंडामध्ये येऊ लागते गॅस तयार होतो यामध्ये सर्वात महत्त्वाची समस्या म्हणजे सकाळी पोट साफ होत नाही.
या समस्येवर आजचा उपाय रामबाण औषध ठरणार आहे. फक्त आपल्याला हा उपाय करण्यासाठी या वनस्पतीची पाने वापरायची आहेत. या पानांचा उपयोग मुळव्याधीवर मोठ्या प्रमाणावर केला जातो. मुळव्याधाच या कोणत्याही प्रकारावर हे रामबाण औषध ठरते. हि पाने कोणती आहे? पानांचा उपयोग कशा पद्धतीने करायचं आहे.? हे सर्व आज आपण आपल्या ह्या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत.
ही पाने रक्तस्त्राव, जंतू स्त्राव थांबवणारे आहेत, अँटी बॅक्टेरियल ही पाने आहेत .स्तंभक पाने आहेत. स्तंभक म्हणजे आकुंचन पावणारी आहेत. या पाण्यात मध्ये ऍस्टरीजन प्रॉपर्टी असते. या पानाचे नाव आहे पानफुटी. हे पानफुटीचे पाने मुतखड्यावर अतिशय रामबाण असे ठरतात हे सर्वांना माहितीच आहे परंतु मुळव्याधी पोटाच्या समस्येवर सुद्धा हे पान अतिशय उपयुक्त आहे.
पित्ताचा संचय खूप मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे मूळव्याधीचा त्रास होतो तसेच पोट साफ न होणे ,अपचन या सारख्या समस्येमुळे सुद्धा मूळव्याधीचा विकार खूप मोठ्या प्रमाणावर होण्याची शक्यता असते. हा उपाय करण्यासाठी आपल्याला दोन पाने स्वच्छ करून घ्यायचे आहे. ह्या तूटलेल्या पानासोबत आपल्याला एक गुळाचा खडा घ्यायचा आहे आणि त्यानंतर चावून-चावून बारीक करून खायचे आहे असे सकाळी सात दिवस उपाशीपोटी आपल्याला करायचे आहे.
असे केल्यामुळे मूळव्याधीचा त्रास आहे तो कायमचा निघून जाणार आहे शिवाय या समस्यांमुळे पोट फुगणे, अपचन गॅस होणे यासारख्या समस्या सुद्धा लवकरच नष्ट होतात. अतिशय सोपा आणि उपयुक्तता असा हा उपाय आहे अवश्य करून पाहा. यांचा नक्कीच तुम्हाला लाभ मिळेल.तसेच हा आयुर्वेदिक उपाय असल्याने त्याचा दुष्परिणाम सुद्धा नाही.बाजारात या पानांची झाडे सुद्धा सहज उपलब्ध होत असल्याने तुम्ही नर्सरी मधून हे झाड हमखास विकत आणू शकतात.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.