जर कोणतेही कार्य पूर्ण होत असेल, एखाद्या कार्यामध्ये वारंवार अडथळे येतात तर हे कार्य पुर्ण होण्यासाठी ,हे महत्त्वाचे कार्य पूर्णत्वास जाण्यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये काही छोटे-छोटे उपाय सांगण्यात आलेले आहेत त्यापैकी तीन महत्त्वाचे उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. या उपायांपैकी कोणताही एक उपाय किंवा तीनच्या तिन्ही उपाय तुम्ही करू शकता.
आपल्या कामातील अडचणी बाजार लवकर दूर होतील आणि आपले काम लवकरच पूर्ण होईल. घरातून बाहेर पडताना सोबत एक नाणे घ्या व घराबाहेर पडताना जर तुम्हाला वाटेमध्ये एखादा गरजू व्यक्ती व भिकारी दिसल्यास त्या व्यक्तीला हे नाणे उजव्या हाताने निस्वार्थी भावनेने द्या.
हा छोटासा उपाय आपल्या कामातील अडथळा लवकरच दूर करतो जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीला नाणी देत असतो तेव्हा ती व्यक्ती आपल्याला आशीर्वाद प्रदान करत असते आणि याच आशीर्वादामुळे आपले आडलेले कार्य पूर्ण होते. दुसरा उपाय म्हणजे अनेक जण घराबाहेर पडतांना कोणता पाय आधी टाकावा याबद्दलचा प्रश्न विचारत असतात.
अतिशय प्रचलित नियम हिंदू शास्त्रांमध्ये सांगितले गेलेला आहे. जर तुम्हाला तुमच्या कार्यांमध्ये यश प्राप्त करायचे असेल तर ते काम यशस्वी करून परत यायचे असेल तर तुमच्या नाकाची जी नाकपुडी चालू असेल तोच पाय सर्वात अधी घरा बाहेर टाकताना बाहेर काढावा. असे केल्याने आपल्याला निश्चित यश मिळते. उजव्या नाकपुडीतून श्वाछोश्वास चालू असेल तर उजवा पाय बाहेर काढा डाव्या नाकपुडीतून श्वाछोश्वास चालू असेल तर डावा पाय बाहेर काढा.
एक अत्यंत प्रभावशाली मंत्र आहे तो मंत्र म्हणजे गायत्री मंत्र होय. या गायत्रीमंत्राचा आपण दररोज सकाळी अकरा वेळा मंत्र जप केला तर या मंत्राच्या प्रभावाने आपल्या कार्यामधून सर्व अडथळे बाधा लवकर नष्ट होतात. त्याचबरोबर एक सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे ज्या दिवशी तुम्ही महत्त्वाचे काम करणार आहात, त्या दिवशी घराबाहेर पडताना गणपतीबाप्पांना एकवीस दूर्वा अवश्य वाहा . असे केल्याने तुमचे महत्त्वाचे कार्य लवकरच पूर्ण होईल आणि त्या कार्यामध्ये यश प्राप्त होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.