कोणत्याही कामामध्ये यश प्राप्त करण्यासाठी ते काम सफल करण्यासाठी एका उपाय आज आपण जाणून घेणार आहोत. ज्या दिवशी आपण एक विशिष्ट महत्वाचे काम करण्यासाठी बाहेर पडाल. कामासाठी बाहेर पडण्याआधी आपण सकाळी आपल्या आई वडिलांचे पाय जरूर पडावे.
जर तुमच्या आई वडील हयात नसतील किंवा तुमच्याजवळ नसतील तर अशा वेळी त्यांचे नामस्मरण करून व फोटोला नमस्कार करून आशीर्वाद जरूर घ्या आणि आपल्या या कार्यामध्ये यश मिळण्यासाठी प्रार्थना अवश्य करा. दुसरी गोष्ट म्हणजे आपण ज्या घरात राहतो त्या घरातील प्रवेशद्वार त्याच्या उंबरठ्यावर उजव्या हाताने मीठ जरूर टाका आणि त्यानंतर कामासाठी बाहेर पडा.
एकदा कामासाठी बाहेर पडल्यानंतर पुन्हा आपल्या घरात वळून यायचे नाही आहे. कार्यसिद्धी होण्याचा हा प्रभावी असा टोटका आहे सोबतच तुम्ही आपल्याजवळ एक साबुत नारळ त्याची शेंडी काढली गेली नाही आहे असे नारळ सुद्धा आपल्या सोबत घेऊन जा आणि या नारळा वर आपल्या देवघरातील थोडेसे कुंकू लावायचे आहे.
जे लोक बाहेरगावी राहतात त्या लोकांनी कोणत्याही प्रकारचे कुंकू नारळाला लावू शकतात आणि हा नारळ आपल्याला आपल्या सोबत घेऊन जायचे आहे. ते संपूर्ण काम होईपर्यंत आपल्याला हा नारळ सोबत ठेवायचा आहे. मग त्या कामाला कितीही दिवस लागू द्या. एकदा का ते कार्य पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ते नारळ गणपती बाप्पाच्या मंदिरात नेऊन दक्षिने सह अर्पण करायचा आहे. जे यश आपल्याला मिळालेला आहे त्या यशासाठी गणपती बाप्पाला मनोभावे आभार प्रार्थना करायची आहे त्यामुळे आपले कार्य सिद्धीस जाऊन आपले जीवन सुखी होईल.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.