कोणत्याही मंगळवारी गुपचूप इथे लावा तेलाचा एक दिवा; सर्व इच्छा होतील ताबडतोब पूर्ण, पैसा इतका येईल की..

अध्यात्म

मंगळवारचा दिवस हा मारुतीरायाचा दिवस मानला जातो. मंगळवारी केलेली हनुमंताची पूजा आपल्या जीवनातील सर्वात मोठ्या समस्या दूर करते. आपल्या मनातील इच्छा पूर्ण करते. चला तर मग जाणून घेऊया मंगळवारच्या दिवशी हनुमंताची पूजा नक्की कशी करावी आणि हनुमंत राया च्या चरणी नेमक्या कोणत्या वस्तू वाहाव्यात जेणेकरून आपल्या जीवनातील धन समस्या व उपाय अशा संदर्भातल्या ज्या काही समस्या असतील त्या लवकरच दूर होतील. मंगळवारचा दिवस हा हनुमंत यांना अर्पण केलेला दिवस असा मानला जातो.

मंगळवार प्रमाणेच तुम्ही शनिवारी सुद्धा हा उपाय करू शकता. यासाठी तुम्ही मंगळवारी रात्री हनुमंत राया च्या मंदिरात जावे सोबत जाताना आपल्याला काही सामग्री घेऊन जायचे आहे.  जी हनुमंत राया च्या उपायामध्ये खूप महत्त्वाचे आहे. हनुमंतांना गूळ-फुटाणे अत्यंत प्रिय आहेत म्हणून त्यांना प्रसाद म्हणून गूळ-फुटाणे नक्कीच अर्पण करा.

जर तुमच्याकडे फुटाणे नसतील तर भाजलेले हरभरे किंवा भाजलेले चणे सुद्धा तुम्ही वापरू शकता तसेच आपण हनुमंत चरणी जो दिवा लावणार आहोत, प्रज्वलित करणार आहोत आहोत, दिवा मोहरीच्या तेलाचा असेल. तर हा उपाय आपण करणार असेल तो उपाय शतपटीने महत्त्वाचा ठरेल आणि हा दिवा तुम्ही हनुमंत चरणी लावावा आणि त्यामध्ये दोन लवंग सुद्धा टाका आणि या दोन लवंग साबूत असायला हवेत आणि हा दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि याच प्रज्वलित केलेल्या दिवाने आपल्याला हनुमंताची आरती सुद्धा ओवाळायची आहे.

ही गोष्ट सुद्धा खूप महत्वाची आहेे अनेक जण अर्धवट उपाय करतात आणि त्यांना या उपायाचे हवे तसे फळ मिळत नाही. ज्या देवी देवता आपल्यावर लवकर प्रसन्न होतात त्यापैकी एक महान असे हनुमंत आहेत त्याचबरोबर या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला महत्त्वाची अशी गोष्ट सुद्धा सांगणार आहोत त्या गोष्टी शिवाय तुम्हाला या उपायाचे हवे तसे फळ मिळणार नाही. त्यापूर्वी आपण आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी आपल्याला नेमक्या कोणत्या वस्तू वापरायच्या आहेत त्याबद्दल जाणून घेऊया..

हे वाचा:   वास्तुशास्त्रातील या शुल्लक चुकीमुळे घरातील स्त्री सारखी आ'जारी पडते...घरातील या 5 गोष्टी त्वरित बदला..नाहीतर परिणाम वाईट होतात..

सुरुवात करूया धनाच्या समस्येपासून. ज्या व्यक्तींच्या घरामध्ये धन समस्या आहे ,घरामध्ये अठराविश्व दारिद्र्य आहेत. कितीही प्रयत्न करा परंतु घरातील गरिबी जात नाही ,अशा व्यक्तींनी हा उपाय करताना मंगळवारच्या दिवशी रात्री हनुमानाच्या मंदिरात जात असताना आपल्यासोबत एक नारळ घेऊन जा आणि या मध्ये पाणी सुद्धा असावे. या नारळावर कुंकू आणि पाणी मिक्स करून पाच ठिपके आपल्याला काढायचे आहेत किंवा आपण स्वस्तिक सुद्धा काढू शकतात आणि त्यानंतर या नारळाला लाल धागा बांधा.

जर तुमच्याकडे लाल रंगाचा धागा नसेल तर अशा वेळी कुंकुवामध्ये किंवा केशर मध्ये कोणताही धागा मिसळून तो आपल्याला लाल करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला हा लाल धागा नारळाला बांधायचा आहे. असा हा नारळ जर तुम्ही मंगळवारी रात्री भगवान हनुमंत यांच्या चरणी अर्पण केल्यास तुमच्या जीवनातील ज्या काही आर्थिक समस्या आहेत पैसा संबंधित अडचणी आहेत त्या लवकर दूर होतील आणि पैसा येण्याचे नवनवीन मार्ग खुले होतील.

जी गरिबी तुमच्या आयुष्यामध्ये आहे,ती दूर होऊ लागते मात्र हा उपाय दर मंगळवारी नित्यनेमाने आपल्याला करावा लागेल. केवळ हा छोटासा उपाय करून आपल्याला भागणार नाही म्हणून सोबत आपल्याला एक अत्यंत महत्वाची गोष्ट करावी लागते म्हणजेच त्याआधी आपण अन्य समस्यांबद्दल जाणून घेऊया. अनेकदा असे आपल्याला वाटत असते की आपल्या घराला कुणाची तरी वाईट नजर लागलेली आहे. परिणामी घरातील सदस्य एकमेकांसोबत भांडत राहतात, घरामध्ये नेहमी अशांती आहे ,कोणी ना कोणी नेहमी सतत आजारी राहते, घरात आलेला पैसा टिकत नाहीत अशा वेळी आपण एका लाल रंगाच्या कपड्यात नारळ ठेवावा.

हे वाचा:   मासिक पाळीत उपवास करणे चांगले की वाईट.? सत्य जाणून तुम्हीही हैराण व्हाल.!

हा नारळ शेंडी सकट असावा म्हणजे त्या नारळाला शेंडी असावी. शेंडी आपल्याला काढायची नाही आहे. वरचे आवरण तसेच्या तसे ठेवायचे आहे. सोबतच आपल्याला थोडीशी मोहरी सुद्धा जवळ ठेवायची आहे आणि ही मोहरी आपल्याला हनुमंत चरणी ठेवून आपल्याला प्रार्थना करायची आहे. पूजा संपन्न झाल्यानंतर हा नारळ व मोहरी आपल्या घरी आणायचे आहे. या दोघांची पुरचुंडी बांधून तुम्ही आपल्या घरातील मुख्य प्रवेशद्वार म्हणजेच ज्या घरातून तुम्ही घरामध्ये प्रवेश करतात अशा ठिकाणी लटकून ठेवायचे आहे,असे केल्यामुळे ज्या कुणाची नजर आपल्या घराला लागलेली असेल किंवा दोष नजर असेल यासारख्या समस्या लवकरच दूर होतील.

जोपर्यंत हा नारळ आपल्याला ठेवायचा आहे तोपर्यंत आपले समाधान होत नाही सोबतच जर कोणाच्या कुंडलीमध्ये राहु दोष आहे, केतु दोष आहे ,शनीची साडेसाती चालू आहे. अशा लोकांनी या दोषातून मुक्ती मिळवण्यासाठी भगवान हनुमंत यांच्या चरणी प्रसाद म्हणून भोग म्हणून किंवा नेवैद्य म्हणून थोडेसे लाडू अवश्य अर्पण करा. हे लाडू बुंदीचे असतील तर अतिउत्तम जर नसतील तर कोणतेही लाडू या उपायासाठी चालतील.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.