निसर्गा मध्ये असे अनेक वनस्पती आहेत जे आपल्याला खूप मदत करत असतात पण त्याचे महत्वाचे असे फायदे आपल्याला माहिती नसतात. म्हणून आज आपण अश्याच एका महत्वाच्या वनस्पती बद्दल जाणून घेणार आहोत.त्या वनस्पतीचे नाव आहे गुलबक्षी.गुलबक्षीला संस्कृत भाषेत कृष्ण केलिंग असे ओळखले जाते.
तर इंग्लिश मध्ये मार्बल ऑफ पेरू फोर अक्लॉक ब्युटी नाईट या नावाने ओळखले जाते. अतिशय उपयुक्त आणि जबरदस्ती अशी ही वनस्पती आहे. गुलबक्षी हिला फोर अक्लॉक म्हणायचे असे कारण आहे की हे सायंकाळी चार ते सहा या मध्येच फुल उमलते. आयुर्वेदामधे अतिशय चांगले उपयुक्त गुलबक्षी झाडाबद्दल सांगण्यात आलेले आहे.
त्याच प्रमाणे ज्या लोकांना लघवीचा त्रास आहे त्यांच्यासाठी गुलबक्षी चे पान आहे उपयुक्त असा ठरतो. किडनीला सूज असते किंवा लघवीला सतत त्रास होत असतो. या गुलबक्षी च्या पानाचा रस पिल्याने खूप चांगला रिझल्ट येतो. ज्यांना स्किन प्रॉब्लेम आहे त्यांना रॅशेश आहे ,जळजळ होते, त्वचेला खाज सुटते, जे काही प्रॉब्लेम आहे अशावेळेस जरी त्याच्या पानांचा रस काढून ठेवला तरी आरामदायक वाटते.
त्याचप्रमाणे जर साप चावला किंवा विंचू चावला असेल तर त्या ठिकाणी जखमा झालेल्या असतील तर त्याच्या पाण्याचा रस चोळून लावला तर ती जखम लवकर बरी होते. कारण या गुलबक्षी मध्ये ऑंटी पॉइजन चे इफेक्ट आहेत . त्याचप्रमाणे प्राण्यांच्या चावण्याने पण आपल्याला ही वनस्पती वाचवते. डोकेदुखी वर सुद्धा या पानांचा रस लावून ठेवला तर डोकेदुखी सुद्धा थांबते. अतिशय उपयुक्त हे गुलबक्षी आहे.
टीप:- वरील लेख हा सर्वसामान्य माहितीच्या आधारे दिलेला आहे. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे काहीही करण्याआधी एकदा डॉक्टरांचा किंवा तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.