नमस्कार मित्रांनो,
आपण पितृदोष घालवण्यासाठी पितृदोष करतो व त्या द्वारे आपल्या पितृची शांती होते असे मानतो. माणसाची मृत्यू झाली की त्याचे अंतिमसंस्कार, दहावा, तेरावा व वर्ष श्राद्ध असे आपण करतो. आणि आता संपले सर्व असे आपल्याला वाटते पण हे खरे आहे का आपण सर्व गोष्टी विधिपूर्वक केल्या तरी ही काही ना काही त्रास आपल्याला होतच राहतो.
मग आपण जोतिषाकडे जाऊन त्याचे समाधान विचारतो. तर या समस्यांच्या मुळाशी दुसऱ्याच काही अडचणी असतात त्यांचा आपण विचारच करत नाही. बऱ्याच जणांना श्राद्ध विधी आणि तर्पण यावर विश्वास नसतो. जर श्रद्धा भावनेने आपण पितृ केले तर आपले पितृ ते ग्रहण करतात आणि तृप्त होतात.
पितृ तिथीला तसेच सर्व पितृ आमावस्याला आपल्या पितृना शास्त्रोक्त आवाहन करून भोजनाला बोलावले असता. ते पितर श्राद्धाच्या ब्राह्मणांच्या माध्यमातून भोजन स्वीकारतात ही नुसती समजूत नाही तर अनेकांना याचा अनुभव आलेला आहे. मनुष्याचा मृत्यु झाला की आपले घर सोडून परलोकी जाताना. पण आ-त्माची ओढ घराकडे असते आणि अतृप्त वा-सना मनात असेच असतात.
म्हणून मृत्यू तिथीला आणि सर्व पितृ आमावस्याला आपल्या घरात पितृचे आगमन होते. भाद्रपद महिण्यात तर प्रतिपदा पासून ते अमावस्या पर्यंत 15 दिवस त्यांना पृथ्वीवर येण्याची परवांगी असते. पुत्र या शब्दाचा अर्थ आहे कु नावाच्या नरकापासून आपल्या पूर्वजांना जो तारतो तो पुत्र असतो. म्हणून श्राद्ध करताना पुत्राला सांगतात की तुमच्या पूर्वजांना जो पदार्थ आवडायचा तो पदार्थ श्राद्धात नक्की बनवा.
सर्व पितृ आमावस्याला तर सगळ्या पितृची यादी करून घ्यावी व सर्वांची नावे घेऊन तर्पण करून पिंडदान करावे. यामुळे आपली सर्व पितृ संतुष्ट होतात आणि त्यांची संतुष्टतता आपल्याला समाधान मिळवून देते. व आपल्या सर्व अडचणी दूर होतात. म्हणून कुळाचार देवांची पूजा दर्शन तसेच पितृ श्राद्ध यांचा कधीही कंटाळा करू नये. अगदी तुमचा विश्वास जरी नसला तर विधी म्हणून का होईना वर्षातून एकवेळस तर पितृची सेवा करावी.
त्या दिवशी आपल्या पितृची फोटो बाहेर काढून स्वच्छ करून त्यांच्या कपाळी गंध लावावे आणि तुळशीचे पान लावावेत जमल्यास तुळशीचा हार ही घालावा. एरवी मृत व्यक्तींचा फोटो कायमचा भिंतीला लावून ठेऊ नये. त्याचबरोबर आपल्या कुलदेवताचे दर्शन वर्षातून एकदा तरी करावे. यामुळे तुमच्या कितीतरी समस्या व अडचणी दूर होतात.
फक्त शांती करून कालसर्प करून काहीही होत नाही. हे वर वरचे उपाय झाले हे फक्त तात्पुरते परिणाम देतात. नुसती कुंडली दाखवून काही होणार नाही खरा दोष तर हा असतो. जर आपण पितृचे श्राद्ध केले नाही त्यांची सेवा केली नाही तर लग्न न होणे, घरात संतती न होणे, नाश होणे आशा समस्या निर्माण होतात.
आणि आपण यानंतर कितीही उपाय करायचा प्रयत्न केलात तरीही आपले पितृ आपल्यावर नाराज असल्याने ते कोणताही उपाय करू देत नाहीत. त्यात अडथळे निर्माण करतात. म्हणून आपल्या पितृना नाराज न करता आधीपासूनच त्यांना प्रसन्न व तृप्त ठेवले तर आपल्याला काहीही अडचणी येणार नाहीत व पितृ ही शांत राहतील.