नमस्कार मित्रांनो,
केस आणि नखे यांचा वापर वशीकरण करण्यासाठी तंत्र मंत्र आणि बाधा उत्पन्न करण्यासाठी केला जातो. जर तुम्हाला वारंवार नजर लागत असेल किंवा तुमच्या पतीला किंवा पत्नीला कुणी वश करण्याचा प्रयत्न करत असेल. तर या सर्व नकारात्मक गोष्टींना दूर ठेवण्यासाठी आणि सोबतच आपल्या घरात गरिबी असेल दरिद्रता असेल किंवा काही नकारात्मक गोष्टी आहेत.
तर सर्वांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आपली नखे आपण या एक वृक्षाच्या खोडाजवळ आवश्य टाका. आपण आपली नखे कापल्यानंतर कचऱ्यामध्ये टाकून देण्याची चूक करू नका. जी व्यक्ती वारंवार आपली नखे कापून ती कचऱ्यामध्ये टाकते. त्या व्यक्तीच्या आयुष्यात दुर्भाग्य वारंवार येत त्या व्यक्तीवर नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव होतो.
आशा व्यक्तींना तंत्र मंत्र बाधा लवकर अधीन करतात आणि म्हणून कचऱ्यात नखे फेकण्याची चूक आपण करू नका. जर तुमच्या घरामध्ये पैसा टिकत नाही पैसा येत नाही. या धन समस्या दूर करण्यासोबतच शत्रू बाधा सुद्धा आजच्या उपायाने दूर होणार आहे. आजच्या उपायासाठी वार आणि तिथी फार महत्वाच्या आहेत. नखे कापताना मंगळवार, गुरुवार, शनिवारच्या दिवशी चुकूनही नखे कापू नयेत.
या 3 दिवशी जी व्यक्ती नखे कापते त्या व्यक्तीला गरिबीचा दरिद्रताचा सामना करावा लागतो. लक्ष्मी आशा घरात कधीच प्रवेश करत नाही. आपल्या नखामध्ये शक्ती प्रवाहित असते आणि म्हणून जर तुम्ही एखाद व्रत करता उपवास करता तर त्या दिवशी सुद्धा केस व नखे कापणे हे धर्म शास्त्राने वर्ज मानले आहे.
तर नखे कापण्यासाठी जे सर्वोत्तम दिवस मानले जातात ते म्हणजे बुधवार आणि शुक्रवार इतर वार तर आहेतच रविवार सुद्धा अति उत्तम दिवस मानला जातो. मात्र या उपायासाठी बुधवार किंवा शुक्रवारच्या दिवशी नखे कापायची आहेत. नखे कापल्यानंतर तुमच्या जवळपास जर वडाचे झाड असेल तर त्या वडाच्या झाडाच्या खोडाजवळ आपण कापलेली नखे टाकायची आहेत.
मात्र नखे टाकण्यासाठी बुधवार किंवा शुक्रवारचा दिवस न निवडता आपल्याला शनिवारच्या दिवशी वडाच्या झाडाच्या खोडाजवळ ही नखे टाकायची आहेत. जर तुमच्या घरात कोणी बाधा केलेली आहे नकारात्मक शक्ती आहेत खूप शत्रू निर्माण झाले आहेत मनात सारखी भीती असते. तर यासाठी एक उपाय आहे जो आपण या नखांसोबत करायचा आहे.
आपण बुधवारी किंवा शुक्रवारी नखे कापा आणि शनिवारच्या दिवशी सायंकाळ होण्यापूर्वी ही नखे साबुत लवंगेसोबत जा-ळायची आहेत जा-ळण्यासाठी तुम्ही कापूरचा वापर करू शकता. जाळल्यानंतर त्याची जे राख राहणार आहे शिल्लक ही राख कोणत्याही झाड्याच्या खोडाजवळ टाकून द्या. हे सर्व करताना कोणी आपल्याला रोखणार नाही टोकणार नाही याची काळजी आपण घ्यायची आहे.
हा उपाय आपण आढवड्याला किंवा 15 दिवसाला केलात तर अति उत्तम होईल. या उपायांमुळे कितीही मोठी बाधा असेल त्या टळतात नक्की हा उपाय करून पहा.