लग्नाला ३ वर्ष होऊन गेले तरी मूल होत नव्हते.. शेवटी या स्त्रीने वैतागून उचलले हे पाऊल.. आज तिच्यासोबत..

ट्रेंडिंग

नमस्कार मित्रांनो,

काय झालं गं केलीस का टेस्ट ? सकाळी-सकाळी पुजा स्वयंपाक घरात आल्या-आल्या मालती बाईनी प्रश्न विचारला. त्यावर ती म्हणाली नाही ओ आई.. निगेटिव्ह आहे रिझल्ट. हा ते काय दरवेळी ठरलेलेच आहे. उगच आशा लावतेस त्यापेक्षा जाना निघून इथून. म्हणजे आमच्या मागची पिडा जाईल कायमची. तुझ्यामध्ये प्रसादला एवढे काय आवडले काय माहिती देव जाणे,

किती सुंदर, शिकलेल्या स्त्रीमंताच्या मुली सांगून येत होत्या. मालती बाईंचा एक-एक शब्द पूजाचे काळीज चि’रून टाकत होते. खर तर हे सगळ तीला नवीन नव्हतच, गेले २ वर्षे ती दर महिन्याला हेच ऐकत होती. ती खूप वैतागून गेली होती दवा’खने, डॉ’क्टर, वैद्य एवढेच काय तर बाबा, महाराजांचे सुद्धा पाय धरून झाले होते. पण काहीच फरक पडत नव्हता येता-जाता मालती बाई टोमणे मारत असे.

सुरुवातीला नातेवाईक देखील आडून-आडून तर आता अगदी उघडपणे विचारू लागले होते, ३ वर्षे झालीच होती ना. पुजा आणी प्रसादचे लव्ह मैरीज पण अगदी साखरासंगीत मुहूर्त वगैरे पाहून लग्न केले होते. कॉलेजच्या पहिल्याच वर्षापासून अगदी एकत्र, एकाच ठिकानी नोकरी करणारे. दोघांनी अगदी रीतसर घरातल्यांची परवानगी काढून लग्न करून घेतल.

तसे म्हणायचे झाले तर पुजा मालतीबाईना कुठे मनापासून आवडत होती. पण मधुरा वहिनीनी समजवल आणी प्रसाद च्या हट्टामुळे त्यांच काही चालल नाही. त्या पूजाचा राग-राग करायचे. हे येत नाही, ते येत नाही सतत चुका काढायच्या, पुजाला त्यांचा राग माहित होता. तरीही ती त्यांच्या चिडण्याकडे दुर्लक्ष करीत असे. माधवराव तीला खूप संभाळून घेत असत, प्रसाद तर कायम तीला आधार देत असत.

हे वाचा:   पत्नीला लग्नानंतर कळतो पतीचा बे'ड'रू'म प्रॉब्लेम, मग ती उचलते हे पाऊल..."रात्री पत्नी त्याच्याशी ल'ग'ट करत असताना तिचे लक्ष त्याच्या पायजमाकडे"

पण तो सुद्धा वैतागला होता. आईची चीड-चीड पूजाच हळवेपण त्याला समतोल साधता येत नव्हता. त्याच्या शब्दाखातीर पुजा नोकरी न करता घराला पूर्ण वेळ देत होती. आईकडून एक प्रेमाचा शब्द मिळावा यासाठी जीवाचा आटा-पिटा करते हे त्याला दिसत होतं. पण आईपुढे तो जास्त काही बोलू सुद्धा शकत नव्हता. मात्र अलीकडे मालती बाईच्या रागाच, चिडचिडीच प्रमाण खूप वाढले होते.

लग्नाला ३ वर्षे होऊन गेली तरी पुजाला मुल होत नाही. घराण्याचा वंश वाढणार कसा. पुजा आणी प्रसादने सगळे द’वाखने करून झाले दोष कोणातच नव्हता. मालती बाईनी आज ठरवलेच होते काहीतरी सोक्ष मोक्ष लावायचाच.. संध्याकाळी सगळे जेवायला एकत्र जमले. प्रसाद माझ आता वय झाल. तु लग्न तुझ्या इच्छेने केलेस आम्ही त्याला विरोध केला नाही.

मात्र डोळे मिटण्या अगोदर एखाद्या नातवंडाला खेळवावे असे मला वाटत असेल तर ते चुक आहे का ? बर आपण काय द’वाखने कमी केलेत का ? कोणता पर्याय ठेवला का ? म्हणून मला अस वाटत टू पुजाला घ ट स्फो ट द्यावा. कमीत कमी नातवंडाचे सुख तरी मला मिळू दे. प्रसाद माधवराव अगदी स्तब्ध झाले. कोणालाच काय बोलावे हे कळेना.. पुजा मुसमुसत आत निघून गेली.

कसाबसा जेवण उरकून प्रसाद रूममध्ये गेला. पूजा शांतपणे बसली होती. प्रसाद आत जाताच पुजा म्हणाली, प्रसाद मी खूप विचार केला आणी मला आईचा निर्णय योग्य वाटतोय. त्यांना नातवंड बघावं वाटण हे साहजिकच आहे. आणी तो त्यांचा अधिकार आहे. तो हिरावून घेणारे आपण कोण, मी तुला घ ट स्फो ट द्यायला तयार आहे. आपण लगेचच सगळ्या फो र्म लि टी करायला सुरुवात करू आणी जर असेच वय वाढले तर परत अवघड होऊन बसेल. वेड लागले का तुला, काय बोलतेस हे तुझ तुला तर कळते का ?

हे वाचा:   धान्यातील कीड 1 मिनिटात पळून जाईल; फक्त वापरा घरातील हे दोन पदार्थ.!

हेच करायचं होत तर कशाला घरातल्यांची परवानगी मिळवलेस लग्नाला. का माझ्या एका शब्दावर तुझ्या करीयरची वाट लावलीस ? का एवढ्या दिवस आईचा राग सहन करत राहिलीस. सोडूनच जायचं होत तर आधीच जायचं ना. प्रसाद मी हौसेनं घेतला काय हा निर्णय. नाही मला होत मुल मी काय करू.. माझ्या हट्टासाठी त्यांचा आनंद का हिरावून घेऊ मी. यात आनंद हिरावून घेण्याचा प्रश्नच नाहीय.

आणी दोष आपल्या दोघात सुद्धा नाही. टू स्वतःला का दोषी समजतेस. तस असेल तर तुझ्याएवढाच माझा सुद्धा दोष आहेच की. पुजा नको ना असला विचार करू. मी आईला समजावतो. नक्की यावर काहीतरी मार्ग निघेल, आपल्या नशिबात असेल तर नक्कीच आपल्या घरात बाळ येईल. मात्र त्यावेळी माझ्यासोबत तु असली पाहिजेस. चारच दिवसात प्रसाद बालिका आश्रमातून फॉर्म घेऊन आला.

सगळ्या फोर्मेलीटी पूर्ण झाल्या आणी अवघ्या तीन महिन्याची सिद्धी पुजा आणी प्रसादच्या आयुष्यात आली. माधवरावांच्या या निर्णयात सिंहाचा वाटा होता. मालतीबाई थोड्या नाराज आहेत पण सिद्धीच्या बाललीलामध्ये रमवून जातात. पूजा मात्र खुश आहे तिच्या आयुष्यात सिद्धिंच्या येण्याने आणी प्रसादने खंबीर सात दिल्याने.