आपल्या सभोवताली अनेक औ’षधी वनस्पती आहेत ज्यांचा वापर आयुर्वेदामध्ये दिवसेंदिवस केला जात आहे. अनेक औ’षधी वनस्पती आपल्या घराजवळ, आपल्या शेतामध्ये देखील असतात ज्यांच्या वापराने आपण आपल्या शारीरिक व्याधी दूर करू शकतो. परंतु आपल्याला त्याबद्दल एवढे ज्ञान नसते त्यामुळे आपण त्यांचा फायदा घेऊ शकत नाही.
आज आपण अशाच एका आयुर्वेदिक औषधी झाडाबद्दल माहिती पाहणार आहोत की ज्यामुळे आपल्या वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या व आजारांपासून आपली सुटका होईल. मित्रांनो आज आपण ज्या वनस्पती बद्दल माहिती पाहणार आहोत ती वनस्पती आहे कुर्डू ची.
आपल्यातील अनेक जणांना पित्ताचा त्रास सं’भवत असतो. त्याचप्रमाणे पोट गॅस धरणे सकाळी पोट साफ न झाल्यामुळे चिडचिड होणे. पोटात जंत होणे, ल’घवी सं-बंधीचे त्रास, शा’रीरिक सं-बंधित त्रास यासारख्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असते परंतु मित्रांनो या वनस्पतीमुळे यांसारख्या समस्या पूर्णपणे कमी होतात.
म्हणून ग्रामीण भागात या वनस्पतीची भाजीही करून खातात आणि त्याच बरोबर ही वनस्पती आपल्या आसपासच्या परिसरात नक्की पाहायला मिळते. या वनस्पतीची फुले पाने व मुळे अत्यंत चमत्कारीक असतात. ज्या लोकांचे पोट साफ होत नाही, पोटात दुखणे, पोट गॅस धरणे या संबंधीचा त्रास असेल तर या वनस्पतीची चार पाने दोन दिवस सकाळी उठल्यानंतर किंवा संध्याकाळी चार पाने नक्की खा. खरंतर याचा कोणताही साईड इफेक्ट होत नाही.
परंतु मित्रांनो जनावरांना ही वनस्पती जास्त प्रमाणात खाऊ घातली तर त्यांना संडास लागते. म्हणून योग्य प्रमाणातच जनावरांना आपण या वनस्पती खाऊ घातल्या पाहिजे. पोटासंबंधीच्या विकारात जसे पोटात दुखणे, पोट गडगडणे अशा समस्या ज्यांना होतात त्या व्यक्तींनी या वनस्पतीची मुळे चावून-चावून तो रस गिळून टाकावा.
असे तीन ते सात दिवस केले तर पोटासं’बंधी कोणत्याही तक्रारी निर्माण होणार नाहीत. या वनस्पतीच्या बिया नियमित खाल्ल्यामुळे मुतखडा, किडनी साफ होते. त्याच बरोबर ज्या व्यक्तींना मुतखड्याचा त्रास आहे अशा व्यक्तींसाठी ही ही वनस्पती अगदी फायदेशीर आहे म्हणूनच ज्या व्यक्तींना मूतखडा झाला आहे त्यांनी या वनस्पती संबंधित एक छोटासा उपाय नक्की करून पाहावा.
हा उपाय करत असताना आपल्याला गोखुळ नावाच्या वनस्पतीच्या तीन ते चार बिया घ्या. कुर्डू वनस्पती ची मुळे तेवढ्या आकाराची घ्या. हे दोन्ही एकत्र बारीक करून घ्या. त्यामध्ये थोडेसे पाणी घाला. गोखुळं वनस्पती चे छोटे छोटे खडे लहानसे घ्या. सकाळ होईल तेव्हा खडे विरघळलेले दिसल्या नंतरच आपल्याला त्याचा वापर करायचा आहे.
या वनस्पतीच्या फुलांची भाजी करून त्याचे सेवन दोन-तीन दिवस केले तर तुमची रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होईल आणि त्याचबरोबर पचन क्रिया ही सुधारेल. जर तुमच्या छातीमध्ये कप झाला असेल तर अशावेळी या फुलांच्या बिया आपल्याला ताकामध्ये टाकायचे आहेत आणि त्या ताकाचे सेवन आपल्याला करायचे आहे त्यामुळे तुमचा जुना छातीत तयार झालेला कप लगेच निघून जाईल.
बऱ्याच जणांच्या दात किड निर्माण होते. दात किडून खूप दुखतात अशावेळी या वनस्पतीच्या पानांचा काढा तयार करायचा आणि त्यामध्ये तुरटीची पावडर टाकायची आहे. या मिश्रणाने तुम्हाला गुळण्या करायच्या आहेत मित्रांनो हा उपाय जर तुम्ही दोन ते तीन दिवसांपर्यंत केला तर यामुळे तुमच्या दाता संबंधित सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या दातांचे आरोग्य सुधारेल.
मित्रांनो आमचा लेख कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. लाईक करा आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना हा लेख शेअर करा जेणेकरून याचा फायदा त्यांनाही होईल.
मित्रांनो आम्ही दिलेली माहिती ही आयुर्वेदाच्या सामान्य सिद्धांतावर आधारित असते. तरी याचा वापर करण्यापूर्वी कृपया एकदा तज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा. धन्यवाद.