मित्रांनो आज आपण एक असा आरोग्यदायी पदार्थ तयार करणार आहोत जो लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वजण खाऊ शकतात. हा पदार्थ अत्यंत चविष्ट आहे. कुणालाही आवडण्या सारखा आहे आणि याचे फा’यदे अगणित आहेत. हा स्वास्थ्यासाठी असा खजाना आहे, जो शरीरात होणार्या न्यूट्रिशिएंटची कमतरता पूर्ण करेल व तुमची ऊर्जा हे खाल्ल्यामुळे दुप्पट वाढेल,
तसेच हे रोगप्रतिकारशक्ति वाढविण्यासाठी उपयोगी आहे. खाण्यासाठी हे इतके स्वादिष्ट आहे की १०१ फायद्यांनी भरलेला आहे. सगळ्यात प्रथम आपल्याला एका पातेल्यात २ कप दूध म्हणजेच अर्धा लिटर दूध गरम करत ठेवूया. जर तुम्ही लो फैट असलेले दूध वापरले तर उत्तम. मलाई काढलेले दूध घ्यायचे आहे. गॅसची फ्लेम स्लो ठेवा. आता दूध उकळू लागले की आपण त्यात केसराच्या काही काड्या टाकणार आहोत.
केसर हे प्रकृतीने गरम आहे व एंटी-ओकसिडेंटने परिपूर्ण आहे व शरीराची रोगप्रतिकारशक्ति वाढविण्यासाठी फायदेशीर आहे. तुम्ही केसर नसेल तर हळद घालू शकता. आता आपण घेणार आहोत स्वास्थ्याचा स्वस्त खजाना ज्याचे फायदे इतके आहेत जे महाग वस्तु खाऊन पण मिळत नाहीत. असे असू शकते की तुम्ही हे प्रथम पाहात आहात.
हे जेल सारखे आहे. उन्हाळ्यात जसा सब्जा पाण्यात भिजवितो तसेच हे भिजवायचे आहे ते म्हणजेच अळीव. तुम्हाला अळीव वाण्याच्या दुकानात मिळू शकते. हे प्रकृतिने गरम असते म्हणून थंडीत हे खाणे उत्तम आहे. हे न्यूट्रिशिएंटचे ऊर्जा स्त्रोत आहे. कारण यामध्ये प्रोटीन, फायबर,फोलेट, आयर्न, विटामीन ए, सी, ई असते.
आपल्याला फक्त ह्या २ टेबलस्पून बिया १ तास पाण्यात भिजवून ठेवायच्या आहेत. १ चमचा बियांमध्ये १२ एमजी आयर्न असते. हे इम्युनिटी बूस्ट करते व पचन सुधारते. हे हिमोग्लोबिन लेव्हल वाढविते व अनिमिया दूर करते.
अळीव भिजले की ते फुलून येते. आता उकळत्या दुधात हे अळीव घालायचे आहेत व शिजवायचे आहे. आता आपण घेत आहोत विटामीन ई, फायबर,हेल्दि असे २ टेबलस्पून सुके खोबरे. तुम्ही तुकडे किंवा कीस घेऊ शकता. त्याबरोबर आपण मल्टि-विटामीन म्हणून काम करणारे १० ते १२ बदाम घेणार आहोत.
त्याचबरोबर ७ ते ८ काजू घेणार आहोत. काजुमध्ये भरपूर प्रमाणात न्यूट्रिशिएंट असतात जेड्स आपली एनर्जि लेव्हल वाढवितात. त्यानंतर आपण यामध्ये पाव कप मखाणे घालणार आहोत. मखाण्यांमध्ये झिंक असते व हे एंटी-एजिंग सारखे काम करतात. मखाणे थोडे भाजून घ्यायचे आहेत. आता हे सगळे मिक्सरवर पाऊडर करायची आहे. आता ही पाऊडर उकळत्या दुधात टाका. आता त्यामध्ये छोटा दालचिनीचा तुकडा टाका. याचे फायदे खूप आहेत. १ टीस्पून हिरवी वेलची पाऊडर घालूया ज्यामुळे स्वाद वाढेल.
याला गोड करण्यासाठी आपण साखर घालणार नाही आहोत आपल्याला नैसर्गिक रित्या गोड करायचा आहे त्यासाठी आपण सात ते आठ खजूर घेऊन त्याचे तुकडे करून उकळत्या दुधात आपल्याला टाकायचे आहेत.सकाळी नाश्त्याच्या वेळी हे दूध तुम्ही गरम पिऊ शकता. पूर्ण दिवस ऊर्जा राहील. अत्यंत सोपा असा उपाय तुम्ही नक्की करून पाहा.
मित्रांनो आमचा लेख तुम्हाला कसा वाटला हे जरुर कळवा लाईक करा कमेंट करा आणि हा लेख आपल्या मित्र-मैत्रिणींना शेअर करा.