पोट साफ करण्याचा व बद्धकोष्टता मूळापासून समाप्त करण्याचा घरगुती व अचूक उपाय…एकदा करून पहाच !

आरोग्य

आपली पचनसंस्था व्यवस्थित राहणे, पोट वेळच्यावेळी साफ होणे हे आ’रोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. पचन संस्था ही वाहून जाणार्‍या पाहण्यासारखी असली पाहिजे. जर त्याचे डबके झाले तर अनेक रोगांचे ते मूळ होऊन बसते.

सकाळी जर आपले पोट साफ होत नसेल, तर पूर्ण दिवस आपण बैचैन राहतो. कामात आपले मन लागत नाही व त्याचा आपल्या त्वचेवर पण परिणाम होतो, फोड, पुरळ ही समस्या होते. केस गळू लागतात पोट साफ करणे व बद्धकोष्टतेसारखी समस्या मूळापासून समाप्त करण्याचा खूपच जबरदस्त असा उपाय आज आम्ही तुमच्याबरोबर शेअर करणार आहोत.

यासाठी आपणाला एक चूर्ण तयार करायचे आहे. साहित्य: २ चमचे ओवा,२ चमचे जिरे, १ चमचा बडीशेप, चिमुटभर काळे मीठ.
जिऱ्यात भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते, तसेच ते पोषक तत्वांचे भांडार आहे. रक्ताची कमतरता पूर्ण करते जिरे. आपल्या शरीरातील चरबी जाळून टाकण्याचे काम जिरे करते. पचन सुधारते. आपली रोगप्रतिकारशक्ति वाढविते. कोलेस्ट्रॉल व शुगर नियंत्रित करण्यास मदत करते.

हे वाचा:   एक्सपायर झालेली औषध खाल्ल्यावर काय होते.? जाणून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.!

ओवा आपले पचन वाढवितो. ओव्याचे दाणे गॅस, अपचन, एसिडिटी दूर करतात . त्याचबरोबर ओवा आपल्या शरीरातून जास्तीची चरबी बर्न करण्यास उपयोगी आहे. ओवा हा वातरोग ठीक करण्यासाठी तसेच संधिवातात उपयोगी आहे. कफ शरीरातून बाहेर काढण्यास मदत करतो.

बडीशेप आपली पचनशक्ति मजबूत करते. आपणास माहीतच असेल लहान मुलांना दिले जाणारे ग्राईप वॉटर हे बडीशेप अर्क असते. डोळ्यांसाठी बडीशेप उपयोगी आहे. बडीशेपेच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित राहतो.

काळे मीठ, याला रॉक सौल्ट असेही म्हणतात. याची पाऊडर करून घेऊ शकता. काळे मीठ हे आपल्या शरीरात गॅस, अपचन या समस्या दूर करायला मदत करते. आपले पचन तंदुरुस्त ठेवते. बद्धकोष्टता मूळापासून समाप्त करण्यासाठी काळे मीठ खूपच फायदेशीर आहे .

हे वाचा:   याचा फक्त १ चमचा दिव्यात टाका; नुसत्या वासाने शरीरातील ७२ नसा पूर्णपणे मोकळ्या होतील.!

आता पाहूया हे चूर्ण कसे तयार करायचे. प्रथम गॅसवर एक फ्राईंग पेन ठेवा यामध्ये आपल्याला ओवा आणि जिरे हे भाजून घ्यायचे आहेत त्यामध्ये बडीशेप न भाजता टाकायची आहे. याची मिक्सर वर बारीक पूड करून घ्या. यामध्ये चिमूटभर काळया मिठाची पावडर टाकली की चूर्ण तयार झाले.

वापर कसा कराल- रोज हे चूर्ण रात्री झोपताना जेवण झाल्यानंतर १ तासाने गरम पाण्यासोबत घ्या. कोणताही उपाय हा गरम पाण्याबरोबरच करायचा आहे. गरम पाण्यात १ चमचा ही पाऊडर टाकून प्यायचे आहे. तुम्ही हे चूर्ण सकाळी पण घेऊ शकता. तुम्हाला स्फूर्तिदायक वाटेल. आमची माहिती आवडली असेल तर जरूर लाइक व शेअर जरूर करा. धन्यवाद.

मित्रानो आमचा लेख कसा वाटला आहे आम्हाला जरूर कळवा. लाईक करा कमेंट करा. आणि आपल्या मित्र-मैत्रिणींना हा लेख शेअर करा.