देवघर कोणत्या दिशेस असावे? वास्तूशास्त्रानुसार योग्य दिशा जाणून घ्या..घर छोटे असुदे वा मोठे फक्त ही दिशा असते योग्य..

अध्यात्म

देवघर म्हणजे घरातील पॉझिटिव्ह एनर्जीचा सर्वात मोठा केंद्र होय. भारतीय सनातन संस्कृती नुसार आपल्या देवघरातून प्रचंड प्रमाणात सकारात्मक ऊर्जा निघत असते आणि या सकारात्मक ऊर्जेवरच आपल्या घराची बरकत म्हणजेच प्रगती होत असते. आपल देवघर हे अत्यंत महत्त्वाच आहे आणि म्हणूनच हे देवघर कुठे असावे व ते कोणत्या दिशेला असावं या गोष्टी जाणून घेणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं.

देवघर योग्य ठिकाणी असेल तर सकारात्मक उर्जेचा प्रवाह सातत्याने वाढत राहतो, देवघर जर चुकीच्या दिशेला असेल चुकीच्या ठिकाणी असेल तर मात्र या देवघरातून सकारात्मक ऊर्जा ऐवजी नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाहू लागतो. परिणामी घरामध्ये अशांती वाद निर्माण होतो, मतभेद उत्पन्न होतात, कामांमध्ये सातत्याने अडथळे येतात आणि त्या घराची, घरातील लोकांची बरकत थांबते, प्रगती थांबते, त्यासाठी देवघर नक्की कुठे असाव व कोणत्या ठिकाणी असा व कोणत्या दिशेला असावं,

देवी-देवतांची दिशा कोणकोणत्या असायला हव्यात, पूजा करताना आपलं आपलं तोंड नक्की कोणत्या दिशेला हवं, अगदी संपूर्ण माहिती जाणून घ्या. काहीजण आपल्या किचनमध्ये म्हणजेच स्वयंपाक घरामध्ये देवघराची स्थापना करतात, हे चुकीच नाहीये, मात्र तुम्ही तुमच्या किचन मध्ये जर मांसाहारी पदार्थ शिजवत असाल तर मात्र देवघर हे तुमच्या किचनमध्ये कदापिही असू नये. दुसरी गोष्ट तुमच्या किचनमध्ये तुम्ही साफसफाई अवश्य ठेवायला हवी.

साफसफाई नसेल तर , खरकटी भांडी खूप दीर्घकाळ पडत असतील विशेष करून रात्रीच्या वेळी रात्री जेवण झाल्यानंतर आपण खरकटी भांडी शक्यतो ठेवतो, परिणामी तो दोष हा स्वयंपाक घराचा तोच आपल्या देवघरासाठी लागतो आणि मग नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन प्रगती थांबते. स्वयंपाक घराचे दोष देवघराला लागतात. त्या घरांमध्ये सातत्याने वाद, अशांतीच वातावरण दिसून येतं.

दुसरी गोष्ट अनेकजण जिन्याखाली देवघर तयार करतात, जिन्यावरून आपली ये-जा चालू असते आणि जणू काही आपले पाय देवी देवतांवर पडत आहेत असा याचा अर्थ होतो, ज्या घरातल देवघर जिन्या खाली असत त्या ठिकाणी पैशांची बचत होत नाही, पैसा टिकत नाही , त्या ठिकाणच्या लोकांवरती कर्ज वाढू लागतं, कर्जाचा डोंगर निर्माण होतो तसेच अशा ठिकाणी आपण कितीही देव पूजा करा, ही देव पूजा मान्य न होता देवी-देवता आपल्यावरती रुष्ट होतात.

हे वाचा:   अष्टकोनी आरसा तिजोरीत ठेवल्याने काय होते.? खूपच कमी लोकांना आहे हि माहिती.!

म्हणून जिन्याखाली आपण चुकूनही देव घराची निर्मिती, देवघराची स्थापना करू नका. तिसरी गोष्ट बाथरूम च्या जवळपास , बाथरूम असू द्या किंवा टॉयलेट असू द्या ही दोन ठिकाणं मोठ्या प्रमाणात निगेटिव्ह एनर्जी निर्माण करणारी स्थाने आहेत आणि म्हणून या दोन्ही ठिकाणाच्या जवळपास आपल्या देवघराची स्थापना करू नका. जर आपण असं केलं तर आपल्या घरातील आनंद निघून जातो आणि प्रत्येक शुभकार्यात प्रत्येक मंगल कार्यात विचित्र अडथळे, बाधा येऊ लागतात. शुभ कार्य करणे बंद होते.

पुढची गोष्ट बेसमेंटमध्ये, बेसमेंट देवघराच्या स्थापनेसाठी उत्तम नाहीये, जर आपलं देवघर बेसमेंटमध्ये असेल तर ते ताबडतोब हटवा कारण बेसमेंट मध्ये असलेले देवघर ते प्रत्येक कार्यामध्ये अडथळा निर्माण करते, तसेच मोठ्या दुर्घटना घडून येतात, अपशकुन होतो, प्रत्येक कामामध्ये अपशकुन होतो, अकाली मृत्यूचं सुद्धा होतात, सतत घरामध्ये क्लेश निर्माण होतात, घरातील लोक एकमेकांशी भांडू लागतात.

बेडरूममध्ये चुकूनही देवघर करू नये, त्यामुळे कुटुंबीयांमध्ये वादविवाद होतात, पती-पत्नीमध्ये वाद विवाद निर्माण होतात, भावाभावांमध्ये किंवा पिता-पुत्रांमध्ये वाद विवाद निर्माण होऊ शकतात, परिणामी द्वेषाच वातावरण निर्माण होतं. कुटुंबातील लोक एकमेकांशी वैर भावाने वागू लागतात. ह्या सर्वांवरती एक असा उपाय आहे तो म्हणजे जर आपल्याला एकाच रुममध्ये रहावं लागत असेल, आपलं घर खूप मोठा नाही किंवा एक किंवा दोन रूम आहेत आणि तुम्हाला तर त्या ठिकाणी देवघर स्थापित करायचा आहे,

अशा वेळी आपण देवघरामध्ये आणि त्या रूम मध्ये एक छोटासा पडदा अवश्य लावा. छोटासा पडदा लावू शकता जेणेकरून देवघर वेगळं होईल आणि इतर कार्य वेगळे राहतील म्हणजे जे दोष लागणार आहेत ते देवघराला लागणार नाहीत. देवघरासाठी सर्वोत्तम दिशा आहे ईशान्य दिशा. ईशान्य दिशा म्हणजे पूर्व दिशा आणि उत्तर दिशा यांच्यामधील दिशा.

या दिशेच्या नावातच आहे ईश म्हणजे भगवान ईश्वर म्हणजे ईश्वर आणि बुध ग्रहाचे प्रतिनिधित्व करत. वास्तू पुरूष जेव्हा प्रथम पृथ्वी लोकावर आले तेव्हा त्यांचं शीर्ष म्हणजे त्यांचं डोकं हे ईशान्य दिशेला होत, त्यांच तोंड ईशान्य दिशेला होत आणि म्हणून ईशान्य हे सर्व देवी-देवतांची दिशा मानली जाते आणि म्हणून आपण आपल्या देवघराची स्थापना आपलं ते एकंदरीत संपूर्ण घर आहे त्याचा ईशान्य कोपरा कुठे येतोय हे आपण बघा

हे वाचा:   जसा रंग तसे चरित्र – निवडा या पैकी एक रंग आणि जाणून घ्या तुमचा किंवा तुमच्या जवळच्या व्यक्तीचा स्वभाव व सवयी…

किंवा आपल्या घराच मध्यबिंदू आहे तुम्ही तुमच्या घराचा नकाशा कागदावरती रेखाटा त्याचा जो मध्यबिंदू आहे तो पहा आणि या बिंदूपासून तुम्ही पूर्व दिशा लक्षात घ्या, उत्तर दिशा लक्षात घ्या, यांच्यामधली दिशा आहे ईशान्य कोपरा. ईशान्य कोपर्‍याला काही अशुभ स्थानात बाथरूम वगैरे असेल तर आपण ईशान्येच्या ऐवजी उत्तर दिशेला सुद्धा आपल्या देवघराची स्थापना करू शकता आणि नंतर उत्तर शुभ आहे आणि उत्तरही दिशेला जर हे करणे शक्य नसेल तर आपण पूर्व दिशेला सुद्धा आपल्या देवघराची स्थापना करू शकता.

आणि जर या तिन्ही दिशा जर नसतील तर शेवटची दिशा आहे आग्नेय दिशा; मात्र आग्नेय दिशेला स्थापित केलेल देवघर म्हणाव तितक शुभ परिणाम आपल्याला प्राप्त करून देत नाही. आपलं देवघर जर लाकडी असेल तर त्याला तर ते भिंतीपासून थोडं अंतर ठेवून आपण ठेवावं. पूजा करताना जेव्हा तुम्ही देव पूजा करायला बसाल तेव्हा तुमचं तोंड हे पूर्व दिशेला असावं, किंवा उत्तर दिशेला असायला हवं. देवघराचा रंग हा काळा नसावा, काळा किंवा गडद नसावा, फिकट रंगाचा किंवा सफेद रंगाच देवघर हे अत्यंत शुभ मानलं जातं.

देवघराच्या आकाराच्या बाबतीत वास्तुशास्त्र सांगते की चौकोनी आकारात किंवा गोल आकाराचा देवघर शुभ परिणाम प्राप्त करून देतात. वास्तुशास्त्रानुसार देवघरची उंची ही देवघराच्या लांबीपेक्षा थोडी जास्त असायला हवी. वास्तुशास्त्रानुसार देवघर उंची आहे ती देवघराच्या लांबी पेक्षा दुप्पट असायला हवी, तसेच देवी देवतांची स्थापना करताना ती उत्तर दिशेला किंवा पूर्व दिशेला करायला हवी म्हणजे जेव्हा मूर्ती आपल्या देवघरात ठेवतो तेव्हा त्या मूर्तीची पाठीमागची बाजू आहे ही बाजू उत्तरेकडील व पूर्वेकडील असावी, देवतांच मुख आहे ते तुम्ही दक्षिणेकडे करू नका.