कावळा गाय कुत्रा यांना पोळी खाऊ घातल्याने काय घडते? घरात देव बसण्याआधी जाणून घ्या..सात जन्माची साडेसाती कायमची जावू शकते..

अध्यात्म

आपलं हिंदू धर्मशास्त्र सांगते की मूकप्राण्यांवर दया करावी, त्यांना भोजन द्यावे अशी शिकवण दिली जाते म्हणजे आपल्या हिंदू धर्मात झाडांचे पूजन, नागपंचमीला नागाची पूजा, बैलपोळ्याला महिलां बैलाचे पूजन करतात, पितृपक्षात कावळ्याचे पूजन करून पितरांचे आभार व्यक्त करतो. आपण कासवाला देव मानतो. म्हणजे आपला हिंदू ध र्म आपल्याला सर्व प्राणीमात्रांविषयी दयाभाव शिकवतो. आपल्या प्राचीन ऋषी-मुनी आपल्याला थोर उपदेश करतात, वागणूक इ.

गायीचे महत्त्व तर आपल्या सगळ्यांना माहीत आहेच. गाय आपल्या हिंदू ध’र्मात पूजनीय मानली जाते. गाईमध्ये तेहतीस कोटी देवी देवता असल्याचे मानले जाते. असे मानले जाते हे 84 लाख जन्म घेऊन आत्मा गाईच्या रूपात शेवटचा ज न्म घेऊन पुढील योनी साठी सज्ज होतात. गायीपासून पवित्रता निर्माण होते, सर्व प्रकारच्या सकारात्मक ऊर्जा येत असतात.

जर आपण एखाद्या शुभकार्यासाठी जात असताना रस्त्याने गाय दिसली तर ते काम यशस्वी झालेच म्हणून समजा. गाईने अचानक तिची शेपटी जर आपल्याला मारली तर हे खूप शुभ असते. हिंदू ध’र्मात श्वानाला महत्व आहे, कुत्र्याची सेवा करणे , त्यांना भाकरी खायला देणे,जीवदान देणे ज्यामुळे भैरवनाथ प्रसन्न होतात आणि आकस्मिक येणाऱ्या संकटांपासून ते आपले रक्षण करतात.

अशी मान्यता आहे की जर आपण कुत्र्याला आनंदी ठेवले तर ते आपल्या आसपास वाईट किंवा दुष्ट शक्ती येऊ देत नाही व आपले रक्षण करते. कुत्र्याला भविष्यात घडणाऱ्या घटनांचे संकेत आधीच मिळतात. कुत्र्याला दररोज खायला दिल्याने, कुत्रा पाळल्याने घरात लक्ष्मी येते असेही मानले जाते, तसेच घरात जर कोणी आ’जारी असेल तर त्याचा आजार कुत्रा स्वतःवर घेतो असेही म्हणतात.

हे वाचा:   रोज रात्री झोपण्यापूर्वी करा हा काळया मोहरीचा उपाय; मग पहा घरात कधीच पैशाची कमी पडणार नाही.!

पितृपक्षात कुत्र्याला गोड पोळी खायला देणे खूप शुभ असते. कावळ्याला खायला देणे देखील शुभ असते कारण पुराणानुसार कावळ्याने अमृताची चव चाखली होती म्हणून अशी मान्यता आहे की कावळ्यांची मृत्यू कधीही नैसर्गिक होत नाही, आजारपण, वृद्धापकाळाने होत नाही तर कावळ्याचा मृत्यू आकस्मिक होतो.

कावळ्याला भविष्यात घडणार्‍या घटनांचे संकेत आधीच मिळतात. कावळ्याला आपण पितर मानतो.पितृपक्षात कावळ्याला भोजन देणे म्हणजे आपल्या पितरांना भोजन देणे, कावळ्याला घास टाकल्याने कितीतरी प्रकारचे लाभ होतात. कावळ्यांना भोजन दिल्यास सर्व प्रकारचे पितृदोष कालसर्प दोष निघून जातात. कावळा शनि देवाचे वाहन आहे, म्हणून शनिदेवाची कृपा राहण्यासाठी कावळ्याला भोजन द्यावे. दारात कावळा ओरडणे म्हणजे पाहुणे येतात.

घराच्या उत्तर दिशेला कावळा काव काव करीत असेल तर घरात लक्ष्मीचे आगमन होईल. पूर्व दिशेला कावळा ओरडल्यास शुभ घटना घडते. पश्चिम दिशेला ओरडला तर अशुभ बातमी कानावर येते. आपल्या आसपास कितीतरी मुंग्या असतात परंतु त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो परंतु जर नीट लक्ष दिले तर या मुंग्या खूप मेहनती व एकतेने राहणारे जीवाने या विश्वात मुंग्यांच्या अनेक जाती बघितल्या जातात परंतु आपण शक्यतो लाल मुंग्या व काळ्या मुंग्या याच दोन प्रकारच्या मुंग्यांना ओळखतो.

लाल मुंग्या अशुभ तर काळ्या मुंग्यांना अशुभ मानले जाते. मुंग्या स्वतःच्या वजनाच्या शंभर पट अधिक वजन उचलू शकतात इतकी क्षमता त्यांच्यामध्ये असते परंतु या दोन्ही प्रकारच्या मुंग्यांना पूर्वी पासून पीठ टाकण्याची परंपरा चालत आली आहे. साखर घालून भोजन म्हणून दिल्यास व्यक्ती सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त होतात.

हे वाचा:   या दिवशी काढा नखे..पैसा नेहमी तुमच्या हातात राहील ! फक्त याच दिवशी काढावीत नखे..

हजार मुंग्यांना रोज खायला दिल्याने आपल्याला सहस्त्र भोजन दानाचे पुण्य मिळते व त्या हजारो मुंग्या आपल्याला आशीर्वाद देतात. त्यांच्या आशीर्वादाचा परिणाम म्हणून आपल्या प्रत्येक संकटापासून आपले रक्षण होते. मुंग्यांना दररोज साखर खायला दिल्यास आपली पापापासून मुक्तता होते म्हणून दररोज अंघोळ झाल्यानंतर मुंग्यांना साखर टाकावी. घरातील सर्व प्रकारच्या अडचणी निघून जातात.

चिमण्यांना दाणे आणि मुंग्यांना पीठ खायला घालणे पुण्याचे काम समजले जातात. गाईला हिरवा चारा दिल्यास घरी अडचणी येत नाहीत. पोळीवर साजूक तूप लावून त्यावर थोडीशी चणाडाळ व थोडासा गुळाचा खडा घेऊन खायला दिल्यास देवी लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते. सर्व देवी देवतांचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. प्रत्येक एकादशीला गाईला हिरवा चारा खायला दिल्यास व्यक्ती जन्ममरणाच्या फेऱ्यातून वाचते.

कुत्र्याला भोजन दिल्यास शत्रुपीडा निघून जाते. कावळ्यांना भोजन दिल्यास पितर प्रसन्न होतात. पक्षांना दाणे टाकले की आपल्याला नोकरी व्यवसायात फायदा होतो. मुंग्यांना साखर दिल्यास कर्जापासून मुक्ती मिळते तर माशांना पिठाचे गोळे खायला दिल्यास आपल्याला सुख समृद्धीची प्राप्ती होते.

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.