आपल्या हिंदू संस्कृतीत देवघराला फार महत्व आहे घर लहान असो की मोठे परंतु प्रत्येकाच्या घरात देवघर हे असते. आणि संपूर्ण घरातील ही एक अशी जागा असते जे सकारात्मक ऊर्जेने परिपूर्ण असते. काही व्यक्ती देवघर बनवताना काही चूका करतात किंवा देवघरात काही चुकीच्या वस्तू ठेवून देतात यामुळे आपल्या संपूर्ण जीवनावर नकारात्मक प्रभाव जानवतो.
देवघर बनवताना नेहमी वास्तू शास्त्रा प्रमाणे बनवावे देवघर बनवताना जर आपण या सर्व गोष्टीकडे लक्ष दिले तर आपण नक्कीच सुखी व संपन्न बनू शकतो. तर जाणून घेऊया की देवघरामध्ये काय असावे व देवघर कसे असावे आणि देवघरात कोणत्या चूका करू नये.
देवघर हे नेहमी उत्तर-पूर्व कोनात म्हणजे ईशान्य दिशेला असावे देवघरात एका देवाची एकच मूर्ती किंवा फोटो असावा. वास्तू शास्त्रानुसार आपल्या देवघरात फक्त देवी देवतांचेच मूर्ती किंवा फोटो असावेत देवी देवतांबरोबर आपले गुरू पूर्वज यांचे फोटो किंवा मूर्ती ठेऊ नये यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा पसरते.
देवघर कधीही जिन्याच्या खाली असू नये ज्याचे देवघर जिन्याच्या खाली असते त्या घरात दारिद्रय प्रवेश करते आशा घरात नेहमी भांडण तंटे व वादविवाद होत राहतात तसेच देवी देवताही अश्या घरात कधीच वास्तव्य करत नाहीत. देवघर कधीही दक्षिण दिशेला असू नये कारण दक्षिण दिशेमध्ये नकारात्मक ऊर्जेचे वास्तव्य अधिक असते आणि जर आपण या दिशेला देवघर ठेवले तर आपल्या संपूर्ण घरात नकारात्मक ऊर्जा पसरते.
आपल्या पूर्वज्यांचे फोटो हे दक्षिण दिशेला लावावेत कारण ही दिशा पितरांची व यमदेवाची दिशा आहे जे पूर्वजांची फोटो लावण्यासाठी अगदी योग्य आहे. जर आपण इतर कोणत्या दिशेला आपल्या पिरांचे फोटो लावले तर आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरते. कोणत्याही देवी देवतांचे फोटो भिंतीला टेकून लावू नये यामुळे ही आपल्या घरात नकारात्मक ऊर्जा पसरते देवामध्ये व भिंतीमध्ये थोडीशी जागा असावी.
बहुतेक व्यक्तींना देवघरावर काहीही सामान, पुस्तके, पूजेचे समान, अगरबत्ती, कापूर, दिवे असे ठेवण्याची सवय असते. परंतु ज्यांच्या देवांच्या डोक्यावर भार असतो त्या घरातल्या व्यक्तींवर नेहमी कर्जाचा डोंगर असतो अश्या व्यक्तींवर देवी लक्ष्मी नाराज होते आणि घरातून निगुण जाते तसेच अशी व्यक्ती नेहमी कर्ज बाजरी राहते.
म्हणून जर तुमच्या ही देवघरावर काही साहित्य असेल तर ते लगेच तेथून हटवा अगदी साधी काडी पेटी ही देवघरावर ठेऊ नये. देवघर कधीही बेडरूम मध्ये असू नये जागा नसेल तर आपण आपले देवघर स्वयंपाक घरात किंवा इतर कुठेही ठेऊ शकतो यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर नाराज होते ज्यांच्या बेडरूम मध्ये देवघर असते अश्या व्यक्तींची आर्थिक स्थितीत प्रगती कधीच होत नाही ते दरिद्रीच राहतात.
आपले देवघर जर आपण बाजूला काढले असेल तर त्या देवघरच्या खोलीचा रंग काळा, निळा, पांढरा असू नये शक्य तो देवघराला लाल, पिवळा, ऑरेंज हे रंग द्यावेत. देवघरात कधीही निर्माल्य जमा करून ठेऊ नये ते लगेच्या लगेच बाहेर काढावे काही व्यक्तींच्या घरी निर्माल्यासाठी पिशवी ठेवलेली असते त्यातच वाळलेली फुले, पाने, धूप, अगरबत्ती, रिकाम्या काड्या पेट्या, संपलेल्या कापूर डब्या,तुपाचे रिकामे डब्बे असे सर्व काढून देवघराजवळ पिशवीत ठेवले जातात.
परंतु अश्या निर्माल्यामुळे आपल्या संपूर्ण घरात नकारात्मकता पसरते व देवी देवतांच्या पूजनाचे संपूर्ण फळ आपल्याला प्राप्त होत नाही म्हणून अश्या कोणत्याही निरुपयोगी वस्तू देवघराजवळ किंवा घरात कुठेही जमा करून ठेऊ नयेत. अश्या प्रकारे व्यवस्थित पणे देवघराची काळजी घेऊन आपण आपल्या घरात सकारात्मक ऊर्जेची निर्मिती करू शकतो आणि सर्व देवी देवतांची कृपा आशीर्वाद मिळवू शकतो.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.