मित्रांनो, विवाहित जीवन सुखी होण्यासाठी समजूतदार लागतोच पण काही वेळेस काही वास्तू दोष देखील आपल्या जीवनावर विपरीत परिणाम करत असतात. त्यामुळे घरातील असे वास्तुदोष काही आपल्या वैवाहिक जीवनावर इतका परिणाम करत असतात की छोटे छोटे वाद विकोपाला जातात व ते नाते तु-टण्याची शक्यता निर्माण होते.
संवाद न होता विसंवाद, भांडणे अधिक होतात. तसेच पती पत्नी संसार करूच शकत नाही, त्यांच्यातील वादामुळे घरातील शांती नष्ट होते, पण हा दोष तितकाही त्यांचा नसतो पण त्यांच्यामुळे असू शकतो जसे की वास्तुशास्त्रानुसार एखादी नको असलेली वस्तू , फ्रेम बेडरूममध्ये लावली, तर त्याचा परिणाम त्यांच्या नात्यावर नकळत होतो, सुरुवातीला हा परिणाम किंचित असतो पण तो हळूहळू वाढत राहतो.
त्यामुळे आपण या गोष्टींपासून सतर्क राहायला हवे. वास्तुशास्त्रात जसे सांगितले आहे ,की काही वस्तू जर आपल्या वैवाहिक जीवनावर विपरीत परिणाम करत असतील, तर अशा वस्तू लगेच हटवणं हे आपल्यासाठी गरजेचे ठरते. आपल्या बेडरूम मध्ये कोणत्याही प्रकारे पाण्याचा मोठा साठा करू नये.
याशिवाय वास्तुशास्त्रानुसार आपल्या बेडरूममध्ये फिशटॅंक ठेवने, हे अत्यंत हा नी का र क आणि अशुभ मानले जाते, कारण त्यामुळे पती-पत्नीमध्ये वाद इतका विकोपाला येतो की शेवटी घ ट स्फो टा पर्यंत ची परिस्थिती निर्माण होऊ शकते.याशिवाय आपल्या खोलीत आपली पलंगाच्या वरती बिं ब कधीच येऊ नये.
यामध्ये प्रामुख्याने अनेक लोक आपल्या बेडरूममध्ये शोभेच्या वस्तू म्हणून, काटेरी झुडूप आपल्या बेडरूम मध्ये ठेवतात, त्यामुळे त्यांचा थेट प्रभाव पती-पत्नीच्या सुखी जीवनावर पडतो, कारण कोणत्याही स्वरूपात काटेरी झाडे ही आपल्या घरात आपल्या परिसरात आणि विशेष करून बेडरूममध्ये चुकूनही ठेवू नयेत. याला गुलाब मात्र अपवाद आहे.
पतीपत्नींनी आपल्या बेडरूममध्ये केवळ दोघांचा जोडीने प्रसन्न आणि हास्यमुद्रा असणारा एक फोटो लावावा. मात्र हा फोटो त्रिकोणी आकाराचा कधीच करू नये. याशिवाय झोपताना पती-पत्नी दोघांनीही दक्षिणेकडे आपले डोके करून झोपावे, यामुळे घरात वाद निर्माण होत नाहीत. आपल्या बेडरूमचा जो रंग आहे किंवा भिंतींचा रंग भडक रंग नसावा.
कारण त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वादविवाद तसेच घरातील लोकांची चिडचिड होण्याची शक्यता असते. यासह जर आपल्या घराचं मुख्य दार आणि घरातील इतर दारे किंवा पंख्याचा आवाज जर कर्कश येत असल्यास ,ते लगेच व्यवस्थित करावे. घरामध्ये भांड्यांचा ध क्का लागून जर आवाज होत असेल तर आणि वारंवार पडत असतील भांड्यांचे कंप होत असतील तर ,असे कंपनाचे आवाज कमी करा.
तसेच आपल्या घरात किंवा आपल्या बेडरूम मध्ये योग्य प्रकारचा सूर्यप्रकाश येणे ,खूप गरजेचे असते. कारण त्यामुळे घरात सकारात्मक विचार आणि ऊर्जा निर्माण होण्यास मदत होते. विशेषकरून घरात किंवा खोलीत ईशान्य दिशेकडून हवा येत असेल तर, ती अति-उत्तम मानली जाते,कारण त्यामुळेच पती-पत्नीतील प्रेमभाव निर्माण होण्यास सुरुवात होते.
त्याचबरोबर स्वयंपाकगृहामध्ये जी गॅस शेगडी आणि पाण्याचा साठा यांच्यामध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवावे.कारण या दोन गोष्टी परस्पर विरुद्ध कार्य करत असल्याने, हे दोन तत्व जेव्हा एकत्र येतील,तेव्हा घरात विसंवाद तसेच मतभेद तयार होत असतात. त्यामुळे या अग्नी आणि जलामध्ये जास्तीत जास्त अंतर ठेवण्याचा प्रयत्न करावा.
आपल्या खोलीत चित्रविचित्र आकाराच्या वस्तू किंवा धारदार वस्तू ठेवलेल्या असल्यास,यांचासुद्धा थेट प्रभाव तुमच्या व्यक्तिगत आयुष्यावर नक्की पडतो,तसेच तर तुमच्या बेडरूममध्ये एखादी भिंत ओली होत असेल किंवा घरात ओल येत असेल तर त्याने सुद्धा नकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणात निर्माण होते.परिणामी घरात रोगराई निर्माण होते.
अशा प्रकारे तुमचं वैवाहिक जीवन तुम्ही सुखी बनवू शकता जर तुम्ही वरील सर्व नियम पाळले तर. आपल्या जीवनातील अडथळे हे काही वेळेस आपणच निर्माण करत असतो.
माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा. अशाच अनेक माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आमचे फेसबुक पेज नक्की लाइक करा.