दान करतांना बोला हे 2 शब्द मिळेल कधीही न संपणारे धन..परतफेड 100 पटीने होईल ! स्वतः ब्रम्हदेवाने सांगितले आहे

अध्यात्म

दान करतांना हे 2 शब्द उच्चारा म्हणचे आपल्याला आपल्या दानाचे पूर्ण फळ मिळेल असे स्वतः ब्रह्मदेवांनी सांगितले आहे.त्याच बरोबर सुख,समृद्धी ,समाधान मिळते. हिंदू धर्मात दान करण्याचे खूप महत्व संगितले आहे दान करणे हे महान पुण्य केल्या प्रमाणे आहे दान ध र्म केल्यास आपल्या पाप कर्मांचा नाश होतो.

आपण 1 रुपया दान केला तर आपल्याला त्याची परतफेड 100 पटीने मिळते म्हणून दान केल्यास धन संपत्ती व लक्ष्मीची प्राप्ती होते म्हणून मनुष्याने आपल्या सामर्थ्यानुसार दान ध र्म जरूर करावा. असे म्हणतात की देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता घेणाऱ्याने देणाऱ्याचे हात घ्यावे म्हणजे आपण नेहमी घेतच असूने घेता घेता आपल्या हातालाही देण्याची सवय लावून घ्यावी म्हणजे आपले हात ही देणारे हात होतील.

गरुड पुराणात ही दान करण्याचे महत्व सांगितले गेले आहे स्वतः ब्रह्मदेवांनी ही दान कसे करावे व दान करताना कोणता मंत्र म्हणावा दान कोणत्या वस्तूचे करावे आणि दान कोणाला करावे याविषयी संपूर्ण विवेचन केलेले आहे.चला तर जाणून घेऊ ब्रह्मदेवांनी दाना सं-बधी काय संगितले आहे.

सुपात्र व्यक्तीला योग्य व आवश्यक वस्तू देने म्हणजे दान करणे होय असे दान मृत्यू लोकात भोग व परलोकात मोक्षाप्राप्ती करून देणारे असते. मनुष्याने योग्य मार्गाने व प्रामाणिक पणे धन अर्जन करावे व त्या धनातूनच दान धर्म करावा तेव्हाच त्या व्यक्तीला दानाचे फळ मिळते. चो री,लबाडी,कोणाला फसवून मिळवलेले धन या धनाचे दान केल्यास आपल्याला त्याचे कोणतेही फळ प्राप्त होत नाही.

हे वाचा:   वट सावित्री पौर्णिमा २०२२: महीलांनी चुकुनही करु नका ही कामे...सेवेच फळ मिळत नाही...उलटे पतीचे आयुष्य कमी होते

दान करताना फळाची अपेक्षा न करता श्रद्धापूर्वक दान करावे. संतान प्राप्ती,यश प्राप्ती,स्वर्ग प्राप्ती व ऐश्वर्याची प्राप्ती होण्यासाठी केलेले दान हे काम्य दान असते तर भगवंतांला प्रसन्न केल्या जाणाऱ्या दानाला विमलदान म्हंटले जाते तर जाणून घेऊ कोण कोणत्या वस्तूचे दान करणे खूप शुभ असते.

गरुड पुराणानुसार भूमी दान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे जर मनुष्याला धन धान्य व वैभवाची प्राप्ती करायची असेल तर मनुष्याने जमिनीचे दान जरूर करावे. सोने,मध,तूप व तिळाचे दान केल्यास आपल्या सर्व पापांचा नाश होतो. उत्तम व स्रेष्ट संततीची प्राप्ती करण्यासाठी मनुष्याने इंद्र देवांचे पूजन करावे आणि तिळाचे दान करावे यामुळे इच्छित संततीची प्राप्ती होते.

पाण्याचे दान केल्यास व्यक्तीला तृप्ती मिळते तर मनुष्यला सुखाची प्राप्ती करायची असेल तर मनुष्याने अन्नदान जरूर करावे.
जर डोळे बोलके आणि तेजस्वी हवे असतील तर मनुष्याने दीपदान अवश्य करावे,दीर्घ आयुष्याच्या इच्छा असणाऱ्या व्यक्तीने स्वर्ण दान करावे. सुंदर रूप व सुंदर शरीरासाठी चंद्र देवाचे पूजन करावे व चांदीचे दान करावे.

वस्त्राचे दान केल्यास मनुष्याला ऐश्वर्याची प्राप्ती होते तसेच घोड्याचे दान केल्यास आपल्याला उच्च पदाची प्राप्ती होते आजकाल घोड्याचे दान करणे शक्य नाही म्हणून घोड्याची प्रतीमा किंवा मूर्तीचे ही आपण दान करू शकतो. जर मनुष्याला धन,संपत्ती मिळवण्याची इच्छा असेल तर अग्नी देवाचे पूजन करून, जाळणासाठी लाकडाचे दान करावे. व रोगी व्यक्तीने इतरांना औ-षधे व शक्ती देणाऱ्या पदार्थांचे दान करावे यामुळे त्या व्यक्तीला स्वास्थ लाभते.

हे वाचा:   घरातील सर्व दुःख गरिबीचे कारण आहेत “या” दहा वस्तू; यांना त्वरित काढून टाका, अन्यथा होईल गंभीर परिणाम.!

जर आपले आई किंवा वडील आ-जारी असतील तर त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी गोदान करणे उत्तम मानले जाते पांढरी गाय जे दूध देते या गाईचे दान एखाद्या गरीब व्यक्तीला केल्यास आपल्या आई वडिलाना दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. जर आपण दान करतांना या मंत्राचा जप केल्यास आपल्याला आपल्या दानाचे फळ तर लगेच मिळते तर जाणून घेऊया कोणता मंत्र आहे तो.

प्रिय दान धर्म राजेती यथा मनस्विवर्थे हा छोटाचा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे ह्या श्लोकाचा अर्थ आहे की हे धर्म राजा माझ्या मनात दान करताना जो भाव आहे त्या श्रद्धा, भावने प्रमाणे मला फळाची प्राप्ती व्हावी. मनात श्रद्धा घेऊन आपल्या सामर्थ्यानुसार दान करताना या मंत्राचा जर आपण जप केला तर आपल्याला आपल्या दानाचे फळ लगेच मिळते.

एकादशी किंवा सण उत्सवा दिवशी केलेले दान सर्वात श्रेष्ठ दान मानले जाते या शुभ दिवशी दान केल्यास आपल्याला किती तरी अधिक पटीने फळाची प्राप्ती होते. अश्या प्रकारे आपण जर हा मंत्र म्हणून दान धर्म केला तर आपल्या दानाचे आपल्याला फळ प्राप्त होते व मनोवांचीत इच्छा व मनोकामना पूर्ण होतात.