आपली वास्तू तथास्तु म्हणत असते जर आपण घरातील या वस्तू जागच्या जागी ठेवल्या तर. कारण ठराविक वस्तू ठराविक ठिकाणी ठेवल्याने त्याची कार्यक्षमता वाढत असते नाहीतर कमी होत असते. कारण सर्वत्र सकारात्मक, नकारात्मक ऊर्जा कमी जास्त असते, वास्तूचे नियम अशाच रीतीने बनवलेत ज्यामुळे आपण जास्तीत जास्त सकारात्मक ऊर्जा घरी ठेवू.
जर या वस्तू नकळतपणे चुकीच्या ठिकाणी ठेवल्या तर आपल्याला घर दुःखाने, नकारात्मक ऊर्जेने भरलेले दिसेल. तसेच जीवन खूपच हताश मार्गावर येऊन ठेपते. म्हणून असे होऊ नये यासाठी या काही गोष्टींचे, छोट्या छोट्या गोष्टींचे पालन केले तर आपल्या जीवनात यश, सुख, समृद्धी येते.
बऱ्याचदा घरातील अनेक गोष्टींची दिशा चुकते, जसे की घरातील दिवा लावण्याची दिशा, मूर्ती ठेवण्याची दिशा कोणती असते हे काही जणांना माहिती नसते. घरातील देवाच्या मूर्तींची दिशा ही दक्षिण दिशा सोडून कोणतीही असल्यास चालते कारण दक्षिण ही मृत्यूची दिशा आहे, यम या दिशेला असतो. त्यामुळे शक्यतो आपलं मुख पूर्वेला होईल असग रीतीने ईशान्य दिशेत देवघर बनवावे.
तसेच देवघरात तुम्ही जर 2 शिवलिं-ग ठेवले असतील तरी चालतात, 2 शाळीग्राम चालतात, 2 सूर्यकांत असतील तरी चालतात, लक्ष्मीच्या मूर्ती 3 असाव्यात तसेच गणेशाच्या देखील विषम संख्येत असाव्यात, 1 किंवा 3 चालतील. शंख असतील तर ते 2 चालतील.
घरात, देवघरात जर भग्न झालेल्या मूर्ती असतील तर त्यांचे विधिवत विसर्जन करावे, नंतर त्यांची विधिवत पुन्हा स्थापना करावी. देवतांची पूजा करताना तिलक लावताना आपण करंगळी जवळच्या बोटाचा वापर करावा व स्वतःला तिलक करताना सर्वात मोठं मधलं बोट आपण वापरावं. तसेच घरातील दिवा लावण्याची जागा, देवघरात कुठे व कोणत्या दिशेला दिवा लावावा याचे सुद्धा शास्त्रात वर्णन आहे,
दिवा हा देवघरात उत्तरेकडे ज्योत होईल अशा प्रकारे लावावा ज्यामुळे तुमची प्रगती उत्तरोत्तर होईल. घरातील समई प्रज्वलित करताना त्यातील ज्योती 1,3,5 अशा विषम संख्येत लावाव्यात, त्यामुळे आपली भरभराट होते व आपल्या आयुष्यात प्रकाश येतो. नारळ वाढवताना, श्रीफळ वाहताना या गोष्टी अवश्य ध्यानात घ्या.
श्रीफळ वाढवताना त्याची शेंडी अवश्य राखा व ती देवाकडे करून फो डा म्हणजेच नारळ वाढवा. कारण शास्त्रा प्रमाणे हीच योग्य पध्दत आहे. समईतील ज्योती या फुंकून कधींही विझवू नका, त्यामुळे निराशा पदरी पडते. जरी या ज्योती काही कारणास्तव विझल्या तर वाईट वाटून न घेता, कोणतीही शंका न घेता पुन्हा प्रज्वलित करा.
तसेच ओले कपडे घालून कधीही देवपूजा करी नये असा शास्त्रात उल्लेख आहे. अंधारात मूर्तींना स्पर्श करू नये किंबहुना दिवा लावल्याशिवाय वंदन ही करू नये. देवघरातील जो शंख असतो त्याला कधीही अक्षता वाहू नका. देवाला वंदन, नमस्कार करताना डोक्यावर टोपी घालू नका, कारण पूर्ण श्रद्धेने देवासमोर नतमस्तक व्हावे.
या गोष्टी आपल्याला आपल्या पूर्वजांनी तसेच शास्त्रात सांगितल्या आहेत ज्या आपल्या सुखी जीवनासाठी खूप महत्वाच्या आहेत. या गोष्टींचे पालन जे लोक करतात त्यांना जीवनात यश येते नाहीतर खूप मेहनत करूनही हाती काहीच लागत नाही. त्यामुळे घरातील वस्तू वास्तुशास्त्रानुसार ठेवायच्या आहेत ज्यामुळे तुमची वास्तू सदैव प्रसन्न राहील.
टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.