घरासमोर ही झाडे असतील..तर घरात पैसा टिकणार नाही ! ही झाडे तत्काळ हटवा..यामुळे घरात विपरीत घटना घडतात

अध्यात्म

आपल्या आजूबाजूच्या घडणाऱ्या गोष्टींचा सखोल परिणाम आपल्या जीवनावर होत असतो. ज्यामुळे आपलं आयुष्य काही काही वेळेस अचानक वेगळंच वळण घेते. वास्तुशास्त्रामध्ये अशा खूप गोष्टी सांगितल्या आहेत, ज्यामुळे घरात नकारात्मकता वाढते व त्याचा परिणाम आपल्या आर्थिक परिस्थितीवर पडतो आणि म्हणून हिंदु धर्माशास्त्रनुसार तुम्ही तुमच्या घरासमोर ही काही झाडे लावणे अशुभ मानले जाते.

कारण काही झाडातील दैवी शक्ती ही आपल्यावरती सकारात्मक परिणाम करत असते, म्हणून काही गोष्टी या शास्त्राला मान्य करून कराव्या लागतात. सर्वांत पहिले म्हणजे घरासमोर काटेरी झाडे लावणे खुप अशुभ मानले जाते. याला 2 अपवाद आहेत .त्यामध्ये प्रामुख्याने गुलाब आणि कोरफड याचा समावेश होतो या झाडांनी घरावरती काही परिणाम होत नाहीत.

पण इतर काटेरी झाडे काही लोक घरात सजावटीसाठी ठेवतात. त्याने घरात कलह निर्माण होतो आणि दुसरे झाड आहे ते पपईचे झाड. हे झाड जरी दिसायला चांगले दिसत असले तरी हे घरासमोर असल्यास घरात धन हानी होते. यानंतर देवाची वनस्पती म्हणून प्रचलित असलेले झाड म्हणजे रुईचे झाड ही घरासमोर असू नये आणि असेल तर ते काढुन टाका.

हे वाचा:   सकाळी दरवाजा उघडताच करा सर्वात आगोदर हे काम; पैसे येण्याचे सर्व मार्ग होतील खुले.!

तसेच पिंपळाचे आणि वडाचे झाड सुध्दा; दोन्ही झाडे वातावरण निर्मितीसाठी जरी आवश्यक किंवा फायदेशीर असली तरी, ही झाडे आपल्या घरासमोर असल्याने घरात खुप अडचणी येतात. पण ही झाडे उपटून टाकण्यापूर्वी 2 नवीन रोपटी आधी लावा मग 2 झाडे काढून टाका. त्यामुले 2 झाडे उपटून टाकल्याचे दुष्परिणाम आपल्या घरावर होत नाहीत. पातक लागत नाही.

कोणत्याही प्रकारचा घराच्या भिंतीवर चढणारा वेल असल्यास तो काढून टाका. त्याने खूप सारे अनिष्ठ परिणाम आपल्या कुटुंबाला होऊ शकतात. तसेच या अशुभ वनस्पती बरोबर काही शुभ वनस्पती पण आहेत की ज्या घरासमोर लावल्यास घरात आर्थिक परिस्थितीत सुधारणा होते.

यामध्ये प्रामुख्याने मनी प्लांट हे सर्वात महत्त्वाचे शुभ झाड किंवा वनस्पती घरासाठी मानली जाते. याला पैशाचे झाड असेही म्हणतात . शमीचे झाड देखील घरासमोर चांगले मानले जाते. तसेच तुळस, कडूलिंब, बेलाचे झाड, नारळ, अशोक आणि चंदन, रक्तचंदन, नागकेशर आणि चाफा ही झाडे किंवा वनस्पती लावल्याने घरात पैशाचा पाऊस पडतो. हे उपाय करून पहा याने तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि उपायानंतर लगेच परिणाम दिसुन येईल.

हे वाचा:   रविवारी रात्री झोपण्यापूर्वी उशाला ठेवा हि एक वस्तू; तुमच्या 7 पिढ्या पैशावर करेल राज्य.!

टीप:- वर दिलेली माहिती व उपाय हे सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा आमचा उद्देश नाही. यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेवू नये.

अशाच उपयोगी धार्मिक माहिती मिळवण्यासाठी आजच आमचे फेसबुक पेज लाइक करा. तसेच अशी उपयोगी माहिती आपल्या प्रियजणांसोबत नक्की शेयर करा.