महिलेचा चेहरा वडिलांसारखा असतो आणि पुरुषांचा चेहरा आईसारखा, काय असतो यामागील अर्थ.?

सामान्य ज्ञान

जेव्हा एखाद्या महिलेचा चेहरा त्यांच्या वडिलांसारखा असतो आणि पुरुषांचा चेहरा आई सारखा असतो त्यामागे नेमका काय अर्थ असतो? याबद्दल ची महत्वाची माहिती समुद्र शास्त्रामध्ये सांगण्यात आलेली आहे. समुद्र शास्त्र हे एक प्राचीन शास्त्र आहे. या शास्त्राला ज्योतिषशास्त्राचे एक अंग सुद्धा समजले जाते. समुद्र शास्त्रामध्ये मानवाच्या शरीरावर काही खुणा असतात व लक्षणे असतात त्यावरून व्यक्तीच्या स्वभावाबद्दल वर्तन देण्यात आलेले आहेत, याची माहिती सुद्धा सांगण्यात आलेली आहेत.

या समुद्र शास्त्र मध्ये अशी अनेक लक्षणे सांगण्यात आलेले आहे म्हणजे कपाळ लक्षणे ,मुख्य लक्षण, दंत लक्षण, हस्त लक्षण,कपाळ लक्षण असे विविध लक्षणा बद्दल या शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहेत. अनेक ऋषीमुनी यांनी अभ्यास करून या ग्रंथाची निर्मिती करण्यात आलेली आहे तसेच पुर्वीच्या काळी एखाद्या व्यक्तीचे लग्न करायचे असेल तर समुद्र ग्रंथाचा वापर करून ,अभ्यास करून लग्न ठरवले जात असे.

त्याचबरोबर समुद्र शास्त्र मध्ये व्यक्तीच्या शरीराच्या आकारावरून सुद्धा काही स्वभाववैशिष्ट्ये सांगण्यात आलेले आहेत म्हणूनच आजच्या लेखामध्ये आपण व्यक्तीच्या चेहऱ्याच्या आकारावरून त्याची काही स्वभाववैशिष्ट्ये जाणून घेणार आहोत चला तर मग जाणून घेऊया त्याबद्दल..

समुद्र शास्त्रानुसार अनेकदा काही महिलांचा चेहरा हा आपल्या वडिलांसारखा असतो तर पुरुषांचा चेहरा हा आपल्या आई सारखा असतो असे अनेकदा आपण पाहिले आहे तसेच या शास्त्रामध्ये प्रत्येक अंगाबद्दल विशिष्ट वर्णन करण्यात आलेले आहे. सर्वप्रथम आपण आपल्या डोक्याच्या आकाराबद्दल जाणून घेणार आहोत त्या व्यक्तींचे डोके आकाराने लहान असते व रुंदीला कमी असते असे व्यक्ती खूपच स्वभावाने चांगले असतात त्यांना यश लवकर प्राप्त होते.

हे वाचा:   मुंबईच्या ताज हॉटेलची कमाई आणि तेथे काम करणाऱ्या वेटर चा पगार ऐकून तुम्हीही चकित व्हाल.!

तसेच ज्या व्यक्तींचे डोक्याचा आकार मध्यम स्वरूपाचा असतो अशा व्यक्ती सुद्धा जीवनामध्ये लवकर यश प्राप्त करतात परंतु काही लोकांचा चेहरा व त्यांचा आकार हा इतरांपेक्षा वेगळा असेल तर त्यांना जीवनामध्ये खूप साऱ्या संकटांना सामोरे जावे लागते. जर तुमचा चेहरा अंडाकृती आकाराच्या असतो अशा प्रकारच्या व्यक्ती दिसण्यास अतिशय आकर्षक असतात आणि या आकर्षक चेहरा प्रत्येक जण पसंती देत असतो.

या व्यक्तींचा स्वतःवर नियंत्रण असतो आणि अशा प्रकारच्या व्यक्ती भावनिक स्वभावाच्या असतात ते इतरांशी लवकरच भावनिक दृष्ट्या जोडले जातात. यांना लवकरच राग येतो अन् जरी सहनशील असले तरी राग लवकर येत असल्यामुळे अनेकदा वाईट संबंध एकमेकांसोबत निर्माण होतात. ज्या व्यक्तीला चेहऱ्याचा आकार चौकोनी असतो, अशा व्यक्ती खूपच मनाने चांगले असतात पण रागिष्ट असतात.

चौकोनी आकार असणाऱ्या महिला विशेष करून आपले काम इतरांकडून करण्यास इच्छुक असतात अशा महिला नेहमी नेतृत्व करणाऱ्या स्वभावाचे असतात. त्यानंतर चेहरा आहे तो म्हणजे गोलाकार असणारा चेहरा. ज्या व्यक्तीचा चेहरा गोलाकार असतो अशा प्रकारच्या व्यक्ती अत्यंत भाग्यशाली समजले जातात. अशा प्रकारच्या व्यक्ती दिसण्यास आकर्षक असतात आणि या व्यक्तींना आपले कौतुक ऐकण्यास नेहमी आवडत असते.

या प्रकारच्या व्यक्तींना नेहमी हसी मजाक करायला आवडते व जेवत एकमेकांशी गप्पा मारतात तेव्हा इतरांचा खेचण्याचा मोह सुद्धा त्यांना आवरता येत नाही. जर आपल्या मस्करी मुळे इतर कुणाचे थट्टा झाली असेल किंवा कुणाचे मन दुखावले असेल तर याबद्दल ते क्षमा सुद्धा मागतात. या प्रकारच्या व्यक्ती नवीन व्यक्तींसमोर फारसे काही बोलत नाही पण जेव्हा ओळख होते तेव्हा आपल्या मनातील खूप सारे विचार व्यक्त करत असतात अशा प्रकारच्या व्यक्ती व्यवहारिक असतात. व्यवहार करण्यासाठी नेहमी चांगले असतात. ज्या व्यक्तींचा चेहरा त्रिकोणी आकाराचा असतो अशा प्रकारच्या व्यक्ती खूपच रचनात्मक असतात.

हे वाचा:   रेती पासून काच कशा पद्धतीने बनवले जाते.? काच बनवण्याची पद्धत जाणून तुम्हीही शॉक व्हाल.!

या व्यक्तींना आपले कार्य व्यवस्थित रित्या पार पाडणे आवडत असते. आपल्या कार्यामध्ये कोणी कुचराई केलेले त्यांना अजिबात आवडत नाही तसेच या प्रकारच्या व्यक्ती कलाप्रेमी असतात आणि कला जीवनामध्ये खूप मोठे नाव कमावतात. आता आपण जाणून घेऊयात पुरुषांचा चेहरा आपल्या आई सारखा असतो व मुलीचा चेहरा आपल्या वडील यांच्या सारखा असतो यामागे नेमकं काय अर्थ आहे त्याबद्दल.

समुद्र शास्त्रानुसार ज्या तुमचा चेहरा आपल्या आई सारखा असतो अशा पुरुष त्याला उदंड आयुष्य लागत असते त्यांच्या जीवनामध्ये नेहमी सुख वैभव लाभते अशी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये खूपच प्रगती करते आणि आपले नावलौकिक वाढवते. जर एखाद्या मुलीचा चेहरा आपल्या वडिलांसारखा असेल तर अशावेळी त्या मुलीचे भाग्य अतिशय चांगले मानले जाते.

तसेच ही मुलगी आपल्या जीवनामध्ये खूपच नावलौकिक कमावते व माहेरून सासरी जाताना आपल्या आई वडिलांचे नाव सुद्धा कमवते,अशा प्रकारची व्यक्ती आपल्या जीवनातील अंधकार दूर करून प्रकाश निर्माण करते आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांना नेहमी एकजुटीने राहण्यासाठी मदत करते. या व्यक्ती जीवनामध्ये खूप यश प्राप्त करतात आणि सगळ्यांना सोबत घेऊन जाण्याची क्षमता व नेतृत्व करण्याची क्षमता या व्यक्तीच्या अंगी असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.