लोकं तुम्हाला चिल्लर समजतात कारण… तुम्ही स्वतःला तसंच दाखवता.!

ट्रेंडिंग

मित्रांनो लोक तुम्हाला चिल्लर समजतात कारण लोकांच्या नजरेत तुमची किंमत शून्य आहे तर हा लेख फक्त तुमच्यासाठीच आहे स्वतःची किंमत वाढवायची असेल, चार लोकांनी आपल्याला नोटीस करावं, आपण इतरांमध्ये असामान्य दिसावं असं वाटत असेल तर या काही खास गोष्टी तुमच्यासाठी आहेत.

1. गवाईया सारखं राहणार बंद कर. तुमच्याकडे ज्ञान असलं तरी समोरच्यावर तुमचं पहिलं इम्प्रेशन तुमच्या दिसण्याच पडतं. स्वतःला स्वस्त निरोगी टापटीप आणि नीट ठेवा. नेहमी स्वच्छ रहा. आपल्याला बघता क्षणी समोरच्या व्यक्तीला प्रसन्न वाटायला हवं. कधी कधी लोक आपल्या राहणीमानावरून आपली किंमत ठरवत असतात आणि आजकालच्या दुनियेत तर वरच्या सजावटीला जास्त महत्त्व दिलं जातं. सजावट म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्ही मेकअप करून जावं असं नाही. स्वतःला फक्त टापटीप आणि नीटनेटके ठेवा तेवढेही पुरेसे आहे.

2. कधीही कोणाला घाबरू नका. श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे जर तुम्ही कुठलेच वाईट काम करत नाही, वाईट मार्गाला नाही लागला तर तुम्हाला काही घाबरण्याची गरज नाही कारण कोणीही तुमचं काहीही वाकडे करू शकत नाही. म्हणून जेव्हा तुम्ही सत्य आणि खरं वागतात त्यावेळेस लोकांना हे दाखवून द्या की तुम्हाला कुठल्याही गोष्टीविषयी कसलीच भीती नाही. तुम्ही नेहमीच सत्य आणि न्यायासाठी कायम ठाम उभे आहात. स्वतःला मजबूत दाखवणार तर लोक तुम्हाला मान देणार. म्हणून एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सत्याचा आणि चांगल्या गोष्टींचा मार्ग कधीही सोडायचा नाही आणि सोडला नाही तर कोणाला घाबरून राहण्याची अजिबात गरज नाही.

3. नेहमीच प्रत्येक वेळेस जो म्हणेल त्याच्यासाठी अवेलेबल राहू नका. कोणीही आवाज दिला काही छोटे काम असेल तर लगेच तुम्ही हातातलं काम सोडून समोरच्या कडे धावत पळत जातात आणि मग समोरच्या व्यक्तीला देखील हीच सवय होते की त्याच्या प्रत्येक बोलण्यावर तुम्ही त्याच्याकडे जातात म्हणून समोरच्या व्यक्तीला तुमची काहीही किंमत राहत नाही. आपल्या जवळ असणाऱ्या गोष्टीची आपल्याला कधीच किंमत नसते, तसेच माणसाच्या समोर तुम्ही जितके जास्त अवेलेबल राहणार तेवढा जास्त तुमचा फायदा घेतला जाणार आणि तुमची किंमत कमी होत जाणार. इतरांना मदत नक्की करा पण स्वतःचा मान ठेवून.

4. दिलेला शब्द कधीही मोडू नका. इतरांमध्ये आपली इमेज अशी ठेवा की आपल्या शब्दांना मान असेल आणि आपण जेव्हा एखाद्याला शब्द देतो वचन देतो तेव्हा ते तुम्ही मोडता कामा नये. कारण तुमच्या शब्दांना तेवढा मान असणार. हे कलियुग आहे, असं म्हणतात इथं खऱ्या पेक्षा खोटं जास्त भावतं. फसवणूक करणारे जास्त मिळतात अशा वेळेस आपण इमानदार राहून आपल्या शब्दाला जागणे गरजेच आहे. स्वतःचा शब्द पाळतो तो इतरांच्या नजरेत कायम महत्त्वाचा आणि सन्माननीय असतो.

हे वाचा:   कडधान्याला किड लागू नये यासाठी कधीही न ऐकलेल्या 2 सोप्या ट्रिक्सचा वापर जरूर करा.!

5. वेळेची किंमत करा मग ती वेळ आपली असो किंवा इतरांची असो. इतरांना भेटण्यासाठी आपण ठराविक वेळ दिली आहे आणि आपणच त्या वेळेला तिथे नसू तर याला काहीही अर्थ नाही. वेळेची किंमत न करणाऱ्या माणसांची वेळही किंमत करत नाही आणि इतर लोकही कधी किंमत करत नाहीत. आपल्या वेळेबाबत कायम वक्तशीर रहा. मग ती वेळ इतरांना दिलेली असो किंवा स्वतःच्या कामासाठी दिलेली असो. ज्या त्या वेळेत ते काम पूर्ण करा. वक्तशीर असणारा व्यक्ती प्रत्येकालाच आवडतो आणि त्याचा वेगळा प्रभाव समोरच्यावर पडतो हे कायम लक्षात असू द्या.

6. तुमचं जे काही क्षेत्र असेल, व्यवसाय असेल, नोकरी असेल, त्यात यशस्वी व्यक्ती व्हा. तुम्ही ज्या क्षेत्रात काम करत आहात त्या क्षेत्रात तुमचं सर्वोत्तम देण्याचा प्रयत्न करा. तुमच्या कामाकडे आणि तुमच्याकडे बघून इतर लोकांना काहीतरी शिकण्याची इच्छा व्हायला हवी, इतकं तुम्ही तुमच्या कामात, क्षेत्रात यशस्वी असायला हवं. तुमच्याकडे ज्ञान आहे, कौशल्य आहे पण ते तुम्हाला वापरता येत नसेल, जगासमोर मांडता येत नसेल, त्याचा फायदा स्वतःला यशस्वी होण्यासाठी करून घेता येत नसेल, तर त्याचा काहीही उपयोग नाही. लोक तुमच्याकडे काय आहे हे बघत नाही तर तुम्ही किती सक्सेसफुल आहात, यशस्वी आहात, तुमचं स्टेटस काय आहे हे पाहतात. म्हणून स्वतःच्या करिअर कडे लक्ष द्या. एक यशस्वी व्यक्ती होण्याचा प्रयत्न करा, लोक आपोआप मान देतील.

7. स्पष्ट आणि सडेतोड रहा. तुमच्या बोलण्यात आत्मविश्वास असू द्या. स्वतःमध्ये स्पष्टवक्तेपणा असू द्या. कारण घाबरणार आणि दबून राहणाऱ्या लोकांना समाज किंवा समाजातील इतर लोक आणखी दाबण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपली मतं असू द्या. आपल्याला कोणीही पाहायला किंवा भाकरी द्यायला येत नाही. आपण स्वतःच्या मेहनतीचं खातो म्हणून आपल्या बोलण्यात स्पष्टवक्तेपणा असुद्या. कोणालाही घाबरून किंवा दबून राहण्याची गरज नाही. एक गोष्ट कायम लक्षात ठेवा तुम्ही जेवढे जास्त घाबरून आणि दबून राहणार तेवढा जास्त तुम्हाला दाबण्याचा प्रयत्न होणार. समोरच्या व्यक्तीच्या नजरेला नजर मिळवून बोला. तुमच्या स्पष्टवक्तेपणा मुळे लोक तुमच्या वाट्याला जाणार नाहीत आणि तुम्हाला कमी समजणार नाही.

हे वाचा:   महिलांनो चांदीचा एकही दागिना आता काळा पडणार नाही.! ज्यांना हवे आहेत चांदीचे स्वच्छ दागिने त्यांनी त्याला लावायचे आहे हा एक पदार्थ.!

8. आपल्या कमजोर बाजू किंवा एकंदरीत आपली सगळी सुखदुःख इतरांना सांगत बसू नका. सगळ्यांच्या आयुष्यात दुःख संघर्ष वाईट वेळ असते. आपण माणूस म्हणून जन्माला आलो, संघर्ष हा आपल्या जगण्याचा आणि आपल्या जीवनाचा भाग आहे. आपला संघर्ष, आपला वाईट काळ किंवा आपले दुःख इतरांना सागून ते कमी होत नाही किंवा त्याचा काही उपयोगही होत नाही, उलट लोक आपली खिल्ली उडवतात मजा घेतात. आपल्या बाजू इतरांना सांगून आपण आपल्यावर इतरांना कुरघोडी करण्यासाठी एक आयती संधी उपलब्ध करून देत असतो, म्हणून कितीही दुःख असू देत आपल्याकडे, कितीही कमजोर बाजू असू देत त्या इतरांना सागू नका.

9. सगळ्यांसोबत प्रेमाने राहा. तुम्ही इतरांशी प्रेमाने वागलात समोरचाही तुमच्याशी प्रेमाने वागेल. तुम्ही समोरच्याला मान दिला तर तुम्हालाही मान मिळेल. पण प्रेमाने आपण अशी काही नाती मिळवू शकतो ज्या नात्यांमध्ये आपला कधीच अपमान होणार नाही. प्रेमाने तुम्ही जग जिंकू शकता. इतरांशी प्रेमाने वागणारी आणि सगळ्यांमध्ये मिसळून राहणारी व्यक्ती अशा व्यक्तीचा सगळेजण मान ठेवतात. भांडखोर चिडचिड्या आणि तुसडेपणाने वागणाऱ्या व्यक्तीला लोक कायम नाव ठेवतात.

10. स्वतः मध्ये काहीतरी टॅलेंट कौशल्य असू द्या. आज कालचा जमाना टेक्नॉलॉजीचा आणि फॉरवर्ड झालेला आहे. तुमच्या मध्ये काळानुसार काय नवीन स्किल आहे याकडे लोकांचं पटकन लक्ष जातं. स्वतःमध्ये काहीतरी कौशल्य असू द्या आणि नसतील तर ती शिकून घ्या. रोज स्वतःला अपडेट ठेवा. काही नवीन शिका, जेणेकरून लोकांच तुमच्याकडे लक्ष जाईल आणि तुमची कौशल्य लोकांवर प्रभाव वाढतील. आपल्यामध्ये इतरांपेक्षा काहीतरी वेगळं असल्याशिवाय आपण इतरांमध्ये उठून दिसत नाही, वेगळे दिसत नाही, म्हणून स्वतःमध्ये कौशल्य स्किल डेव्हलप करा.

खरंतर या सगळ्या गोष्टी आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहेत पण आपण त्या विसरतो. मित्रांनो लेख आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि शेअर करायला अजिबात विसरू नका.