वास्तुशास्त्रामध्ये सडा-रांगोळी चे फार मोठे महत्त्व सांगितलेले आहे. आपलं अंगण असते जे आपल्या घरा समोर जी मोकळी जागा असते की या जागेवर ती आपण दररोज साफ सफाई स्वच्छता ठेवायला हवी. सडा घालायला हवा. अशी जर जगावंअसेल तर ही जागा पण स्वच्छ धुऊन काढायला हवी,अशा प्रकारची स्वच्छता झाल्यानंतर आपल्या दरवाजासमोर आपण सुंदर रांगोळी काढायला हवी.
रांगोळी घातल्यामुळे वातावरण स्वच्छ व पवित्र बनते प्रसन्न वातावरण निर्माण होत असते. अशी रांगोळी सूर्यदेवाचे स्वागत करते आणि ज्या ठिकाणी सूर्याचे स्वागत होते त्या घरांमध्ये सकारात्मक उर्जेचा प्रचंड प्रवाह सतत वाहत असतो. त्याच्या घरामध्ये आजारपण येत नाही. त्या घरातली व्यक्ती निरोगी आणि सदैव आनंदी स्वच्छंदी राहते. अंगण असलेल्या आपल्या दारासमोर रंगीत रांगोळी असायलाच हवी.
आपल्या तुळशीवृंदावनात राधाकृष्णाचा, लक्ष्मीचा सहवास राहतो असे मानतात. या तुळशी समोर देखील, या तुळशीपुढे देखील आपण सुंदरशी रांगोळी काढायला हवी. आपल्या सर्वांच्या अंगण समोर एक आणि आपल्या तुळशी समोर एक अशा दोन रांगोळी ह्या आपल्या अंगणामध्ये असायलाच हव्यात. राधाकृष्ण म्हणजे प्रत्यक्ष विष्णू आणि लक्ष्मी यांचे रुप असते.
जेव्हा आपण रांगोळी काढतो,अंगण सुशोभित करतो तेव्हा त्या तुळशी वृंदावनाला एक नवीन शोभा येते त्यावेळी श्री विष्णू आणि लक्ष्मी प्रसन्न होतात आणि लक्ष्मी चा आशीर्वाद आपल्याला मिळतो. आपल्या घरामध्ये पैसा संपत्ती आणि धनाने स्वयंपूर्ण अशा प्रकारचे आपले घर ऐश्वर्यसंपन्न बनते. घरामध्ये नेहमी आनंद असतो ,त्यामध्ये काही अश्या प्रकारची मंगल चिन्हे आपण नक्की काढा.
रांगोळी मध्ये स्वस्तिक, लक्ष्मीची पावले, कमळ,शंख, फुले अशा प्रकारची चिन्हे आपण नक्की काढावीत.हे चिन्ह काढलेले घरातील आणि परिसरातील वातावरण मंगलमय रांगोळी असेल तर माता लक्ष्मी प्रसन्न होते. भगवान विष्णू प्रसन्न होतात आणि त्या घरांमध्ये नेहमी बरकत राहते. रांगोळी काढताना केवळ एकच रंग वापरू नये किंवा अनेक जण फक्त पांढऱ्या रंगाने रांगोळी काढतात.
रांगोळी काढताना त्यामध्ये आपण वेगवेगळे रंग भरावेत. हळदी कुंकू रांगोळीनक्षी रांगोळी काढण्याची प्रथा आहे .घराच्या समोरच्या दरवाजासमोर अष्टलक्ष्मी रांगोळी असते. त्या घरांमध्ये नेहमी पैसा टिकून राहतो. पैशांमध्ये वृद्धी होते, असं शास्त्रांत सांगितले आहे आणि दक्षिण भारतामध्ये काढली जाणारी ही अष्ट लक्ष्मी रांगोळी आपण देखील आपल्या दरवाजासमोर आपल्या अंगणामध्ये नक्की काढा.रांगोळी काढली असेल तर रांगोळी खरोखर भाग्य दायक ठरते असे शास्त्र मानते म्हणून लाल रंगाचा जास्तीत जास्त वापर आपण रांगोळी काढताना अवश्य करा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.