असे हळकुंड वापराल तर आयुष्यात हव्या असलेल्या सर्व गोष्टी होतील पूर्ण.!

अध्यात्म

आज आपण एक साधा सोपा आणि सरळ उपाय जाणून घेणार आहोत. ज्या व्यक्तीच्या कुंडलीमध्ये गुरु ग्रह योग्य स्थानी असतो ,योग्य ठिकाणी असतो त्या व्यक्तीची उत्तरोत्तर प्रगती होत जाते. कोणतेही क्षेत्र असो,त्या क्षेत्रामध्ये ही व्यक्ती यशस्वी होते आणि म्हणूनच गुरू ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी ज्योतिष शास्त्रामध्ये काही अजून उपाय सांगितलेले आहेत त्यातीलच एक साधा सोपा सरळ बिनखर्चाचा उपाय आज आपण आपल्या लेखात जाणून घेणार आहोत.

गुरू ग्रहाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला लागणार आहे फक्त एक हळकुंड आणि पिवळ्या रंगाचा दोरा.हा दोरा शक्यतो सुती वस्त्रांचा घ्यायचा आहे व सुती दोरा घ्या आणि हळकुंड यामध्ये बांधावे आणि गुरुवारचा दिवस आपण या उपायासाठी निवडायचा आहे. गुरुवार हा उपाय करण्यासाठी अतिशय शुभ वार समजला जातो.

या गुरुवारी आपण सूर्योदयापूर्वी उठून नित्यकर्म आवरावेत आणि सूर्योदय झाल्याबरोबर एक तासाच्या आत आपली देव पूजा आटोपून घ्यावी. देव पूजा आटोपल्यानंतर पूर्व दिशेला तोंड करून बसावे आणि हा धागा पुरुषांनी आपल्या उजव्या हातामध्ये बांधावा. जर आपण स्त्री असाल तर हा धागा आपल्या डाव्या दंडावरती बांधायचा आहे. पुरुषांनी उजव्या हाताच्या दंडावर आणि स्त्रियांनी डाव्या हाताच्या दंडावर बांधल्यानंतर आपण जो गुरु ग्रह मंत्र आहे ओम गुरुवे नमः हा 108 वेळा मंत्र उच्चार करायचा आहे.

हे वाचा:   पूजेतील ही वस्तू आहे लाख मोलाची; केसातील कोंडा ,दातदुखी, टाच भेगा झटक्यात घालवते.!

यासाठी आपण एखादी माळ देखील घेऊ शकता. या माळी मध्ये 108 मणी असतात आणि बरोबर 108 वेळा मंत्र आपण उच्चारू शकता. तुम्ही अशा प्रकारे हा उपाय केल्यानंतर आपण आपल्या जवळपास देशी गाय असेल किंवा नसेल तर कोणत्याही साध्या गाईला आपण भिजवलेले चणे आणि गूळ खाऊ घालावेत,त्याने गोमाता आपल्यावर प्रसन्न होते तसेच आपण या दिवशी एखाद्या दत्तक्षेत्री देखील भेट देऊ शकता.

श्री दत्ताचे दर्शन आपण आपल्या गावामध्ये दत्ताचे देऊळ असेल तर त्या ठिकाणी जाऊन आपण श्री दत्तगुरुंचे दर्शन नक्की घ्या.जर औदुंबराचे वृक्ष असेल तर आपण प्रदक्षिणा घालाव्यात ,त्याला मनोभावे पाणी घालावे आणि जर शक्य असेल तर त्या औदुंबराच्या वृक्षाखाली बसून आपण मंत्र ओम गुरुवे नमः या मंत्राचा 108 वेळा उच्चारण करू शकता. आपण मात्र ही क्रिया हेही आपल्याला सूर्योदयानंतर एक तासाच्या आज करायची आहे.

हे वाचा:   कोणत्याही दिवशी चोवीस वेळा बोला हा मंत्र; शत्रू होईल पूर्णपणे बरबाद.!

गुरूवारच्या दिवशी हे मात्र लक्षात ठेवा मित्रांनो हा उपाय केल्याने भाग्यकारक आणि तुमचे भाग्य उजळणार,अशा प्रकारचा उपाय आहे. गुरू ग्रहाला प्रसन्न करणारा हा उपाय आहे. तसे तर गुरु ग्रहाला प्रसन्न करण्याचे अनेक उपाय असतात मात्र हा उपाय साधा सोपा आहे असे केल्यानंतर तुम्हाला दिसेल की काही दिवसातच तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता ते क्षेत्र तुमच्यासाठी संधी म्हणून उभे राहील.

मित्रांमध्ये प्रगती कराल आणि तुमच्या सर्व अडचणी दूर होतील. हे लक्षात ठेवा की हळकुंड घेताना शक्यतो चांगल्या दर्जाचा असावा. तुटलेला, फुटला घेऊ नका, तो घेताना अखंड जर आपण घेतला तर अतिशय उत्तम होईल, असा उपाय नक्की करून पहा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.