या भितींवर लावा घड्याळ; नशीब इतके उजळेल कि पैसे मोजायला मशीन घ्यावी लागेल.!

अध्यात्म

आजच्या या लेखामध्ये आपण महत्वाची माहिती जाणून घेणार आहोत की वास्तूमध्ये घड्याळ लावण्याची ही शुभ अशुभ दिशा नेमकी कोणती असते आणि ती आपल्या जीवनावर सकारात्मक व नकारात्मक प्रभाव सुद्धा कश्या पद्धतीने टाकते. आपल्या सगळ्यांच्याच घरात भिंतीवर छोटे किंवा मोठे आकाराचे घड्याळ नक्कीच असते. भिंतीवर हे घड्याळ आपण अशा ठिकाणी लावतो जिथे सहजपणे दिसेल असे लावत असतो परंतु तुम्हाला माहीत आहे का की वास्तूशास्त्रात घड्याळ लावण्याची शुभ अशुभ दिशा असते आणि ती आपल्या जीवनावर सकारात्मक व नकारात्मक प्रभाव टाकते.

असे मानले जाते की, कधीही कोणाला घड्याळ भेट म्हणून देऊ नये. घड्याळाचे काटे आपल्याला वेळेत बांधतात. आपण त्या व्यक्तीला आपल्या बरोबरच वाईट वेळ सुद्धा देत असतो त्या व्यक्तीसाठी काही गोष्टी चांगल्या असतील तर ते घड्याळ आपल्याबद्दल खूप काही सांगून जाते.ऑफिसमध्ये आपण वेगवेगळे घड्याळ वापरतो त्याचा आपल्या जीवनाशी संबंध असतो.

आपल्या घरामध्ये वेगळ्या प्रकारचे घड्याळ आपण लावत असतो त्याच बरोबर ऑफिसमध्ये सुद्धा भिंतीवर टाकलेले घड्याळ, आलार्म साठी वापरण्यात येणारे घड्याळ,इत्यादी घड्याळ या सर्वांचा वापर आपल्या जीवनामध्ये अनेकदा होत असतो आणि या प्रत्येक घड्याळाची महत्त्वाची भूमिका आपल्या जीवनावर प्रभावित करत असते.घड्याळ आपल्या घरामध्ये लावताना कोणत्या दिशेला असले पाहिजे व कोणत्या दिशेला लावू नये याबद्दल सुद्धा वास्तुशास्त्रामध्ये नियम सांगण्यात आले आहेत.

जर आपण या नियमाचे पालन केले तर आपल्या जीवनामध्ये नेहमी सुखशांती लाभते पण जर आपण या नियमाचे पालन केले नाही तर अनेक संकटे भविष्यामध्ये येण्याची शक्यता असते. जर आपण वास्तुशास्त्रानुसार पाहिले तर घराच्या दक्षिण दिशेवरील भिंतीला चुकून सुद्धा घड्याळ लावू नये. दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते आणि म्हणूनच दक्षिण दिशेला घड्याळ लावणे अशुभ मानले जाते.

हे वाचा:   अशा घरात देवी लक्ष्मी कधीच येत नाही; भविष्यात या चुका कधीच करू नका.!

दक्षिण दिशा ही यमाची दिशा मानली जाते कारण दक्षिण दिशा जी आपले जीवन संपवायचे कार्य करत असते आणि म्हणूनच अशा दिशेला जर आपण घड्याळ लावले तर आपली प्रगती सुद्धा होत नाही. प्रगतीची वाट खुंटते आणि म्हणूनच अशा ठिकाणी घड्याळ लावणे अत्यंत चुकीचे आहे. यामुळे आपल्या घरातील सदस्यांच्या करिअरवर वाईट परिणाम सुद्धा पडू शकतो. दक्षिण दिशा ही वास्तुशास्त्रानुसार घरातील मुख्य व्यक्ती ची दिशा मानली जाते जर आपल्याला घरातील दक्षिण दिशेच्या भिंतीवर काही लावायचे असेल तर घरातील मुख्य कमवणाऱ्या व्यक्तीचा फोटो लावावा असे करणे शुभ मानले जाते.

असे केल्याने घरातील प्रमुख व्यक्तीचे आरोग्य सुद्धा चांगले राहते.अनेकदा दक्षिण दिशा ही नकारात्मक ऊर्जेचा स्थान मानले जाते आणि जेव्हा आपण घराच्या दक्षिण दिशेला घड्याळ लावतो तेव्हा वारंवार घड्याळाकडे बघितल्यामुळे सुद्धा नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे प्रभावित होत असते आणि परिणामी आपल्या जीवनामध्ये नकारात्मक गोष्टी घडू लागतात.

घराच्या मुख्य दरवाजावर सुद्धा घड्या लावू नये याबद्दल योग्य दिशा जाणून घेतल्यावरच आपल्याला घड्याळ भिंतीवर लावले पाहिजे. आपल्यापैकी अनेक जण बंद पडलेले घड्याळ, खराब घड्याळ भिंतीवर लावतात परंतु असे घड्याळ सुद्धा अशुभ मानले गेले आहे. जर आपल्या घरामध्ये एखादे घड्याळ बंद असेल तर ते त्वरित चालू करायला हवे अन्यथा आपले जीवन सुद्धा थांबून जाते.

हे वाचा:   ही 5 स्वप्न चुकूनसुद्धा कोणाला सांगू नका अन्यथा होतील त्याचे विपरीत परिणाम.!

आपल्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी घडायच्या थांबून जातात आणि परिणामी या सगळ्या गोष्टींचा आपल्या जीवनावर परिणाम होतो म्हणून जर तुमच्या घरा मध्ये सुद्धा जर बंद पडलेले घड्याळ, खराब झालेले असेल तर ते काढून नव्याने सुरू करा. अनेकदा आपण पाहतो की आपल्यापैकी अनेकांना रात्री झोपताना मनगटी घड्याळ उशी जवळ ठेवण्याची सवय असते.

जर तुम्ही सुद्धा असे करत असाल तर अत्यंत चुकीचे आहे कारण की घड्याळ उशीला असल्याने त्यातील इलेक्ट्रोमॅग्नेटिक आपल्या मेंदूवर प्रभावित करत असतात आणि परिणामी त्याचा वाईट परिणाम आपल्या आरोग्यावर होत असतो तसेच नेहमी घड्याळ योग्य वेळेवर असायला हवे, घड्याळ पुढे किंवा मागे असायला नको.

जर तुमच्या घरी घड्याळ असेल आणि त्यावर धूळ साचसलेली असेल तर ती लगेच स्वच्छ करा त्याचबरोबर घरामध्ये कोणत्याही प्रकारचा कर्कश आवाज निर्माण करणारे असे घड्याळ अजिबात लावू नका.घरामध्ये प्रसन्न आवाज निर्माण करणारे घड्याळ अवश्य लावा यामुळे घरामध्ये मधुर वातावरण व सकारात्मक वातावरण निर्मिती होण्यासाठी नेहमी मदत होत असते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.