रात्री झाडू मारावी कि नाही.? रात्री झाडू मारल्यावर नेमकं काय होते.? जाणून घ्या यामागील सत्य.!

अध्यात्म

जेथे स्वच्छता तेथे तेथेच देवी लक्ष्मी वास्तव्य करते. घर साफ स्वच्छ ठेवणे सर्वांनाच आवडते. अनेकजण हातात झाडू पोछा घेऊन तत्पर राहतात परंतु कधी कधी आपण काही चांगले करायला जातो व त्यातून काहीतरी वाईट किंवा आपल्याला चुकीचे फळ मिळते.

घर स्वच्छ राहावे यासाठी हातात झाडू घेऊन घर झाडायला सुरुवात करतो परंतु शास्त्रांमध्ये असे सांगितले आहे की कोणत्याही वेळी घरात झाडू मारणे हे अशुभ आहे खरंच झाडू मारला नाही तर घर अस्वच्छ होते पण चुकीच्या वेळी घरामध्ये झाडू मारल्याने माता महालक्ष्मी आपल्यावर नाराज होते आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो.

शास्त्रांमध्ये झाडू मारण्याबद्दल काही विशिष्ट नियम सांगण्यात आलेले आहे त्याचबरोबर असे म्हटले जाते की सकाळी उठल्यानंतर लगेचच घर झाडायला हवे त्याचबरोबर असे केल्याने आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर निघून जाते. सूर्यास्तानंतर संध्याकाळी कधीही झाडू मारू नये.

झाडू मारताना घरातील स्त्रियांनी काही गोष्टींचे विशिष्ट पद्धतीने पालन केले तर भविष्यात आपल्याला कोणत्या अडचणींना सामोरे जावे लागणार नाही. तसे पाहायला गेले तर शास्त्रांमध्ये झाडू मारण्याचा योग्य मुहूर्त सकाळी पाच वाजता सांगण्यात आलेला आहे.यावेळेला ब्रह्म मुहूर्ताची वेळ सुद्धा मांडण्यात आलेली आहे.

हे वाचा:   कमाईचा किती भाग दान केला पाहिजे.? शास्त्रानुसार जाणून घ्या दान करण्याचे प्रकार व महत्व.!

या वेळेला आपल्या आजूबाजूला सकारात्मक ऊर्जा खूप मोठ्या प्रमाणामध्ये पसरलेली असते, अशावेळी जर आपण घरामध्ये झाडू मारला तर घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते आणि बाहेरची सकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करते यामुळे आपल्या घरातील वातावरण सकारात्मक आणि मंगलमय होते. त्याशिवाय झाडू मारल्याने चिंता काळजी मिटते आणि घरातील सर्व अडचणीही निघून जातात.

पहाटे चार ते पाच च्या वेळेला शुभ वेळ म्हटले जाते यावेळेस लक्ष्मीचे आगमन आपल्या घरात होते म्हणून तुमचे घर स्वच्छ केलेले असेल तर लक्ष्मी देवी प्रसन्न मनाने आपल्या घरात प्रवेश करते. या वेळेला जे स्त्री व पुरुष झाडू मारतात अशा व्यक्तींवर माता महालक्ष्मी नेहमी प्रसन्न होते आणि त्यांच्यावर नेहमी कृपा वर्षाव करत असते म्हणून ब्रह्मा मुहूर्ता ला झाडू मारणे खूप शुभ असते.

हे वाचा:   नोटांमध्ये गुपचूप ठेवा फक्त हि १ वस्तू; पैशांचा इतका पाऊस पडेल कि संभाळताही येणार नाही.!

ब्रम्हमुहूर्त ला झाडू मारणे शक्य नसेल तर कमीत कमी सूर्योदयापूर्वी तरी घरात झाडू अवश्य मारावे परंतु कधीही चुकूनही घरात सूर्यास्तानंतर झाडझुड करू नये कारण संध्याकाळची वेळ माता लक्ष्मीची असते आणि अश्या वेळी जर आपण झाडू मारला तर माता लक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते यामुळे आपल्या जीवनात दुःख अडचणी संकटे यांचे आगमन होते म्हणून जर आपल्या जीवनामध्ये नेहमी सुख शांती वैभव नांदावी असे वाटत असेल तर संध्याकाळच्या वेळेला चुकूनसुद्धा झाडू मारू नये.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.