स्वयंपाक घरातील या चुका तुम्हाला करतील बरबाद; अशा चुका आयुष्यात कधीही करू नका.!

अध्यात्म

स्वयंपाक घरात ही चूक अजिबात करू नका आणि यामुळे संपूर्ण घर उध्वस्त होऊ शकते,मोठा अनर्थ घडू शकतो. असे मानले जाते की स्वस्थ शरीर सर्वात मोठे धन संपत्ती आहे ,ज्याचे शरीर स्वस्थ आहे त्याच्याकडे जगातील सर्वात मोठी गोष्ट आहे कारण तुम्ही पैसे कमवू शकता पण पैसे देऊन स्वस्थ मिळू शकत नाही त्यामुळे आपल्या शास्त्रांमध्ये सांगितले आहे आरोग्यम् धनसंपदा.आरोग्य हे सर्वात मोठी धन संपदा आहे.

जर आपले आरोग्य चांगले असेल तर आपण जीवनामध्ये अनेकदा धनसंपदा मिळू शकतो पण जर आपले आरोग्य चांगले नसेल तर पैसा हा खूप मोठ्या प्रमाणावर बाहेर जातो म्हणूनच आरोग्याची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे. जर तुमच्या स्वयंपाक घरामध्ये या चुका होत नसतील तर अत्यंत चांगले आहे पण जर तुम्ही स्वयंपाक बनवताना काही चुका करत असेल तर त्याचा विपरीत परिणाम तुमच्या जीवनावर सुद्धा होऊ शकतो आणि परिणामी आरोग्य सुद्धा खराब होऊ शकते.

माता अन्नपूर्णा ही अन्न देवता मानली जाते.जर आपल्यावर माता अन्नपूर्णा ची कृपा दृष्टी असेल तर आपल्या जीवनामध्ये कधीच धान्याची कमतरता भासत नाही.आपल्या जीवनामध्ये नेहमी प्रगती होत असते व आपले स्वयंपाक घर सुद्धा नेहमी आनंदाने भरलेले असते. याउलट जर आपल्या हातातून स्वयंपाक घरामध्ये काही विशिष्ट चुका होत असतील तर माता अन्नपूर्णा आपल्यावर रागवते आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्या जीवनावर होऊ शकतो. गरीबी, निर्धंनता येते.

हे वाचा:   दररोज बेंबीवर लावा फक्त ही १ वस्तू; पैसा चुंबकासारखा घरात खेचला जाईल.!

अन्नधान्याची कमतरता राहते.या चुका नेमक्या कोणत्या आहे ज्यांच्यामुळे माता अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होते. महिलांच्या या चुकीमुळे घरामध्ये आजारपण व गरिबी निर्माण होते. आपल्या स्वयंपाक घरामध्ये अप्रत्यक्षरीत्या किंवा अप्रत्यक्षरीत्या माता अन्नपूर्णा वास करत असते परंतु आपल्या घरातील महिला स्वयंपाक घरामध्ये प्रवेश करण्यापूर्वी आंघोळ करत नाही. सकाळी उठल्यानंतर आंघोळ करणे शुभ असते.

अनेकजण अंघोळ न करता जेवण बनवतात. अनेकदा सकाळी घाई गडबडी मध्ये घरातील अन्य सदस्यांना डब्बे बनवण्यासाठी महिला अंघोळ न करताच स्वयंपाक घरामध्ये प्रवेश करतात आणि स्वयंपाक बनवतात. असे अस्वच्छ रित्या स्वयंपाक बनवल्यामुळे माता अन्नपूर्णा आपल्यावर क्रोधित होते. पण यामुळे घरात खाणारी व्यक्ती देखील जीवनात सफलता मिळवत नाही त्याच्यावर वाईट प्रभाव पडतो त्यामुळे ही चूक करू नये.

नेहमी अंघोळ केल्यानंतरच स्वयंपाक घरात प्रवेश करावा यामुळे माता अन्नपूर्णा आपल्यावर प्रसन्न होते. राहू-केतू यांचा वाईट प्रभाव आपल्यावर पडतो.जर स्वयंपाक घर अस्वच्छ असेल तर तिथे राहू केतू यांचा प्रभाव पडतो. आपले शरीर नष्ट होते आणि याचा सर्वात जास्त वाईट प्रभाव घरातील कमविणाऱ्या व्यक्तीवर होतो. पूर्ण घर हळूहळू निर्धनतेचे शिकार होते त्यामुळे स्वयंपाक घर नेहमी स्वच्छ असावे तसेच रात्री झोपताना देखील घरातील स्वयंपाक घराची स्वच्छता करावी अशी उष्टी भांडी ठेवून झोपू नये अशी खरकटी भांडी ठेवल्याने स्वयंपाक घर अस्वच्छ राहते.

रात्री स्वतःच्या घरामध्ये खरकटी भांडी तसेच उष्टी भांडी ठेवल्यामुळे घरामध्ये झुरळे सुद्धा होतात. जर आपल्या घरामध्ये झुरळे भरपूर प्रमाणात झाले तर आपल्याला त्यांचा त्रास होऊ शकतो आणि हे आरोग्याच्या दृष्टिकोनातून हानिकारक आहे म्हणून आपले स्वयंपाक घर नेहमी स्वच्छ ठेवायला हवे. तिसरी गोष्ट म्हणजे स्वयंपाक घरातील काम करणाऱ्या महिला अनेकदा स्वयंपाक करताना ते चाखून पाहतात.

हे वाचा:   या गोष्टी तुमच्या सोबत होत असतील तर तुमची कुलदेवता तुमच्यावर क्रोधित असु शकते..हे संकेत ओळखा

तिखट मीठ बरोबर आहे का ते येऊन पाहतात. हे अत्यंत चुकीचे आहे. शास्त्रांमध्ये असे करणे योग्य मानले गेले नाही तसेच खरकटे तोडणे म्हणजे तोंडात अन्नाचे कण असताना देखील जेवण बनवू नये. स्वयंपाक करत असताना आपल्या तोंडात अन्नाचा कण नसावा. खरकटे जेवणाने जर आपण जेवण बनवले तर पुढचा जन्म प्राणी योनीचा आहे, आपल्याला पुढील जन्म मांजरीचा मिळतो असे शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे ,असे केल्याने माता अन्नपूर्णा आपल्यावर नाराज होते.

स्वयंपाक घरात चप्पल घालून फिरू नये. आपल्यापैकी अनेक महिला घरामध्ये फिरताना चप्पल घालून फिरतात. स्वयंपाक घरामध्ये सुद्धा चप्पल घालून वावरत असतात असे करणे म्हणजे माता अन्नपूर्णा यांचा अपमान करणे यासारखे आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.