हा पक्षी घरात आल्यावर तुम्ही व्हाल करोडपती; जाणून घ्या यामागील खरं सत्य.!

अध्यात्म

आपल्या आजूबाजूला अश्या अनेक घटना घडत असतात या घटना बद्दल जाणून घेण्याची ही अनेकांची इच्छा असते. पक्षी हे आपले निसर्गातील अविभाज्य घटक आहेत. हे पक्षी कधी आपले गॅलरीत येऊन बसतात तर कधीकधी आपल्या घरात सुद्धा प्रवेश करतात. हे शुभ आहे की अशुभ आहे हे आज आपण लेखामध्ये जाणून घेणार आहोत. काही पक्षी असे आहेत जे घरात येणे किंवा त्यांचे दर्शन आपल्याला झाले तर आपल्याला धनप्राप्ती लक्ष्मी प्राप्त होऊ शकते व काही पक्षी असे आहेत जे आपल्या घरात आले तर आपण भिकारी सुद्धा होऊ शकतो.

एवढेच नाही तर घरातील गरोदर स्त्रीवर देखील याचा विपरीत परिणाम देखील होऊ शकतो. काही पक्षी आपल्या घरात येणे अतिशय अशुभ मानले जाते त्यामुळे घरात अडचणी, संकटे निर्माण होतात. प्राचीन काळापासून आपण हे मानत आलो आहोत आणि आजही मानतो,चला तर मग जाणून घेऊया हे पक्षी कोण कोणते आहे त्याबद्दल..

त्यातील पहिले पक्षी आहे वटवाघुळ. वट वाघुळ जर आपल्या घरातील एखाद्या कोपर्‍यात तिने घर केले असेल व ते तिथेच राहू लागले तर समजुनजा की आपल्यावर वाईट काळ आला आहे. ज्या घरात वटवाघुळ असते त्या घरात आजारपण मृत्यू संकटे येतच राहतात. असे म्हणतात की, घरामध्ये वटवाघुळ आल्याने घरामध्ये सुख शांती भंग पावते व घरातील व्यक्ती आजारी पडतात.

नातेवाईक आजारी पडतात.काहीतरी अडचणी नेहमी निर्माण होत असतात. अशा घरात नेहमी अपशकुन घडतच राहतात. पुढील पक्षी आहे कावळा. कावळ्याने घरात घरटे बनवून राहणे सुद्धा खूप अशुभ मानले जाते यामुळे ही आपल्यावर अनेक संकटे येतात. स्वप्नातही कावळा येणे, कावळा काव काव करत येणे किंवा घरात येऊन बसलेला दिसणे याचा अर्थ अशुभ समाचार आपल्याला मिळणार आहे. आपल्या जवळच्या प्रिय व्यक्तीचा मृत्यु होणार आहे, याचा हा संकेत आहे. तिसरा पक्षी आहे घुबड. आपल्या घरात सारखी सारखी घुबड येणे व एकाच दिशेला तोंड करून सारखे ओरडणे हे खूप अशुभ समजले जाते.

हे वाचा:   घरामध्ये या गोष्टी घडू लागल्यास समजून जा लवकरच पालटणार आहे नशीब..घरात पैसा येवू लागतो..

असे मानले जाते कि एकदा किंवा दोनदा घुबड घरात आल्याने देवी लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते. घरात आनंद व सुख समृद्धी येते पण नेहमी नेहमी घुबड घरात आल्यास आपण विनाशाकडे खेचले जातो व नेहमी संकटे व अडचणी येत राहतात. हे पक्षी घरात येणे अशुभ मानले जाते परंतु काही पक्षी घरात येणे शुभ मानले जाते. काही पक्षांचे आपल्या घरामध्ये येणे शुभ मानले जाते तसे की चिमणी.

अनेकदा आपण आजूबाजूला चिमणी पक्षी पाहत असतो. चिमणी आपल्या घरामध्ये येत असेल, तिच्या आवाजामुळे चिऊ चिऊपणा घरामध्ये येत असेल तसेच चिमणी जर आपल्या घरामध्ये घरटी बांधत असेल तर अशा वेळी हे लक्षण शुभ मानले जाते.असे म्हंटले जाते की त्या घरात देवी लक्ष्मी स्थायी रूपाने वास करते. घरात कोणत्याही अडचणी येत नाहीत.घर नेहमी प्रसन्न व आनंदी राहते.

घरात नेहमी सकारात्मक वातावरण त्या घरात राहते त्याचप्रमाणे कबूतर ही सारखी घरात येत असेल तर हे सुद्धा शुभ मानले जाते यामुळे शुभ समाचार आपल्या कानावर पडतात पण याउलट रात्रीच्या वेळी कबुतरांचा आवाज येऊ लागला तर आपल्या सहकाऱ्यांबरोबर आपलं भांडण होत राहते, घरात कलह निर्माण होतात. सकाळी सकाळी तुम्हाला कबूतर चे दर्शन झाले तर अत्यंत शुभ समाचार तुम्हाला मिळणार आहे किंवा एखादं मोठं धन लाभ तुम्हाला होणार आहे याचा हा संकेत आहे त्याच प्रमाणे सकाळच्या वेळी जर तुमच्या घरात साप निघाला तर यामुळे धनप्राप्तीचे योग जुळून येतात.

हे वाचा:   कल्की अवतार कधी होणार? वेळ जवळ आली आहे का..जाणून घ्या विष्णूच्या कल्की अवाताराचे रहस्य..

लक्ष्मीची प्राप्ती होऊ शकते. तुमच्या जीवनात एखादी चांगली घटना घडणार आहे. एक अत्यंत दुर्मिळ पक्षी म्हणजे हंस. जर आपल्या घराच्या आजूबाजूला हंसाचे दर्शन आपल्याला झाले तर हा खूप शुभ संकेत मानला जातो. यामुळे तुमच्या जीवनामध्ये शुभ गोष्टी घडण्याची शक्यता असते. धनप्राप्तीचे वेगवेगळ्या मार्गाने योग जुळून येतात. आपल्या घरामध्ये माता महालक्ष्मीचे आगमन होणार आहे याचा शुभ संकेत मानला जातो .ग्रामीण भागात तर पशू पक्षी बघायला मिळतात पण शहरी भागात पक्षी खूप कमी प्रमाणात दिसतात परंतु कधीकधी दैवी संकेत म्हणून अचानक अशा काही घटना घडतात व आपल्याला येणारे शुभ-अशुभ गोष्टींची जाणीव करून देतात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.