घरात या ठिकाणी ठेवा झाडू; घरात येईल छप्पर फ़ाड पैसा कि संभाळताही येणार नाही.!

अध्यात्म

आपल्या हिंदू धर्म शास्त्रामध्ये झाडूला माता महालक्ष्मीचे स्वरूप मानण्यात आलेले आहे त्याचबरोबर घराचे अंगण हेच आपले घरातील गोष्टींचे वर्णन करत असते याचा अर्थ म्हणजे की ही म्हण आपल्याकडे खूप जुन्या वर्षांपासून प्रचलित आहे. जर आपले अंगण स्वच्छ असेल तर घर सुद्धा स्वच्छ असते.. आपल्या घरातील लक्ष्मी संपत्तीचे दृश्य कसे असेल हे सांगत असते.माता लक्ष्मी ज्या घरामध्ये नेहमी स्वच्छता असते अशा ठिकाणी माता महालक्ष्मी निवास असते.

जर तुम्हाला सुद्धा वाटत असेल की आपल्या घरामध्ये नेहमी सुख शांती वैभव धन पैसा भरपूर प्रमाणामध्ये असावे तर तुम्हाला तुमचे घर नेहमी स्वच्छ ठेवायला हवे. आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये झाडू बद्दल विशेष असे काही नियम सांगण्यात आलेले आहे. या गोष्टींना वैज्ञानिक कारण नसले तरी शास्त्रांमध्ये व पुराणांमध्ये सांगितलेल्या अनेक गोष्टींचे आज सुद्धा अनेक लोक पालन करत असतात.

झाडू वापरण्याच्या पद्धती बद्दल तसेच झाडू ठेवण्याबद्दल सुद्धा अनेक वेळा वास्तुशास्त्र याबद्दल सांगण्यात आलेले आहे. तसे तर तसे पाहायला गेले तर सकाळी सूर्योदय होण्यापूर्वीच घरामध्ये झाडू मारायला हवा. जेव्हा आपण वारंवार घर बदलत असतो म्हणजे आपण भाड्याने राहत असून एका घरातून दुसऱ्या घरात जात असतो तर अशा वेळी जुन्या घरातील झाडून नव्या घरामध्ये घेऊन जाऊ नये याच बरोबर घरातील झाडू हा कधीच उभा ठेवू नये.

हे वाचा:   स्वयंपाक घरातून या गोष्टी कधीही संपू देऊ नका; परिणाम जाणून तुमच्या पायाखालची जमीनच सरकेल.!

झाडू आडवा करून ठेवावा व झाडू अशा पद्धतीने ठेवावा की त्यावर सहजासहजी कुणाची नजर जाणार नाही. बाहेरची व्यक्ती जर कोणी आपल्या घरामध्ये येत असेल तर त्या व्यक्तींना आपल्या घरातील झाडू सहजासहजी नजरेस पडेल अशा पद्धतीने अजिबात झाडू ठेवू नका. जर आपण घरामधील झाडू उभा ठेवला तर यामुळे आपल्या घरातील सदस्यांमध्ये वाद विवाद होतात.

खूप मोठ्या प्रमाणामध्ये भांडण निर्माण होऊन त्यांच्यामध्ये कटूता निर्माण होते. माता महालक्ष्मीचे प्रतीक स्वरूप म्हणून झाडू कडे पाहिले जाते म्हणून आपल्या घरातील झाडू हा नेहमी चांगला व्यवस्थित असायला हवा. तो कधीच तुटलेला, काड्या निघालेला नसावा. तुमच्या घरा मध्ये सुद्धा झाडू योग्य स्थितीमध्ये नसेल तर आजच बदला आणि आपल्या घरामध्ये व्यवस्थित झाडू आणा.

झाडू ला चुकून सुद्धा लाथ मारू नये कारण की झाडूला आपण माता महालक्ष्मी चे स्वरूप समजत असतो आणि अशा वेळी आपण झाडू ला लाथ मरतो तेव्हा त्या क्षणी माता महालक्ष्मी चा अपमान करणे सारखे होते जर तुम्ही झाडू मारत आहात आणि झाडू मारताना जर इतरांना त्याचा स्पर्श होत असेल तर अशा वेळी सुद्धा त्या व्यक्तीने नमस्कार करायला हवा.

हे वाचा:   व्यापार, दुकान चालण्यासाठी करा हा जबरदस्त उपाय; काही दिवसातच फरक दिसून येईल.!

जर तुमच्या झाडू खराब झाला असेल तर अशा वेळी तो बाहेर काढून नवीन झाडू त्या जागी आणायला हवा परंतु चुकून सुद्धा आपल्या घरातील झाडू इतरांना देऊ नका असे करणे म्हणजे आपल्या घरातील लक्ष्मी इतरांना देण्यासारखे होते. झाडूने कधीच कोणत्याही प्राण्याला किंवा मनुष्याला मारहानी करू नये.

जर तुमच्या घरातील एखादी व्यक्ती महत्त्वाचे काम करण्यास बाहेर जात असेल तर अशा वेळी तो गेल्यानंतर लगेच झाडू मारू नये, असे केल्याने त्या व्यक्तीच्या कार्यामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. लगेच झाडू मारल्याने कार्य अपूर्ण राहण्याची शक्यता असते आणि म्हणूनच व्यक्ती बाहेर गेल्यावर घरात झाडू मारु नये व त्याचबरोबर जेव्हा मुलगी माहेरून सासरी जात असते तेव्हा अशा वेळीसुद्धा घरात झाडू मारू नये काही काळ जाऊ द्यावा आणि त्यानंतर तुम्ही झाडू मारू शकता.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.