आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये ज्योतिष शास्त्रला खूप महत्त्व देण्यात आलेले आहे.ज्योतिष शास्त्रानुसार आपण व्यक्तीच्या जीवनाबद्दल अनेक माहिती प्राप्त करू शकतो. व्यक्तीची राहणीमान ,व्यक्तीच्या सवयी, व्यक्तीच्या शरीरावरील अवयवांबद्दल ची माहिती सुद्धा या ज्योतिष शास्त्रानुसार आपल्याला प्राप्त करता येते. या शास्त्रामध्ये आपल्या शरीरावरील विविध अवयव म्हणजे नाक, डोळे, कान, हात, बोट यांचा अभ्यास करून काही तर्क सांगितले जातात.
हस्त रेषांचे ज्योतिष शास्त्रात विशेष महत्त्व सांगितलेले आहे.एखाद्या व्यक्तीच्या हाताचा त्यावरील रेषांचा आणि बोटांचा अभ्यास करून त्या व्यक्तीचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ जाणून घेता येऊ शकते.मनुष्याच्या संपूर्ण जीवनाचा अर्थ काढू शकतो, यामध्ये संपूर्ण जीवनात आपण सहज सगळ्या गोष्टी जाणून घेऊ शकतो. काही व्यक्तींची बोटे ही लहान तर काही व्यक्तींचे बोटे मोठे असतात.
काही व्यक्तींचे बोटे चा जाड तर काही व्यक्तींची बोटे पातळ असतात. अशा या बोटांच्या प्रकारावरून आपण वेगवेगळ्या बाबी जाणून घेऊ शकतो. आपल्या बोटाला तीन भागांमध्ये विभाजित केलेले असते त्याला पेरू म्हणतात म्हणजे प्रत्येक गोष्टी पेरू मध्ये विभागलेली असते आणि करंगळी बोटावर बुध ग्रहाचा प्रभाव जाणवतो. ज्या व्यक्तींच्या पहिल्या बोटांचा भाग शारप असेल अशा प्रकारच्या व्यक्ती कलाप्रेमी असतात.
त्यांचे विचार धार्मिकतेने परिपूर्ण असतात परंतु अशा प्रकारच्या व्यक्ती मध्ये काम करण्याची क्षमता खूपच कमी असते. सांसारिक जीवनात या व्यक्ती खूपच कमकुवत असतात. ज्या व्यक्ती चार बोटांचा आकार लांबसडक असतो अशा प्रकारच्या व्यक्ती इतरांच्या जीवनामध्ये , कार्यामध्ये खूपच हस्तगत करत असतात. त्यांना इतरांच्या कामांमध्ये लुडबुड करायला जास्त आवडते.
स्वतःचे काम सोडून ते इतरांचे कामा कडे जास्त लक्ष देत असतात. ज्या व्यक्तींचे बोटे लांब आणि पातळ असतात अशा प्रकारच्या व्यक्ती चतुर आणि राजकारणी असतात. ते प्रत्येक कार्यामध्ये राजकारण करत असतात आणि आपला स्वार्थ साधत असतात. ज्या व्यक्तींचे बोट मध्यम आकाराचे असतात अशा प्रकारच्या व्यक्ती इतरांपेक्षा अधिक समजूतदार असतात. प्रत्येक कार्य समजुतीने करण्याकडे त्यांचा कल असतो.
ज्या व्यक्तींचे बोटे खूपच लहान असतात अशा प्रकारच्या व्यक्ती आळशी आणि कोणतेही काम न करण्याची प्रवृत्तीचे असतात. अशा प्रकारच्या व्यक्ती स्वार्थी असतात. अशा प्रकारचे व्यक्ती नेहमी स्वतःचा विचार करतात, दुसऱ्यांचा विचार अजिबात करत नाही.
अशा प्रकारच्या व्यक्ती स्वभावाने दुष्ट असतात. ज्या व्यक्तींचे अंगठा शेजारी बोट म्हणजेच तर्जनी मोठ्या आकाराचे असते अशा प्रकारच्या व्यक्ती हुकूमशाही स्वभावाची असतात. ते नेहमी प्रभुत्व गाजवत असतात. अशा प्रकारच्या व्यक्ती इतरांवर आपले मत लादून आपला उदो उदो करत असतात. सर्व बोटे जुळवली आणि मध्यमा आणि तर्जनि यामध्ये जर छिद्र असेल त्यांना भविष्यामध्ये धनाचे योग असतात.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.