पितृपक्षामध्ये पितरांना तृप्त करण्यासाठी भोजनात हे पदार्थ अवश्य करा.!

अध्यात्म

हल्ली पितृपक्ष सुरू झालेले आहे आणि पितृपक्षात तिथीनुसार आपल्या सर्वांच्या घरी आपल्याला मृत लोकांच्या तिथीनुसार आपण श्राद्ध करत असतो. परंतु श्राद्ध करताना आपण श्रध्देने, विश्वासाने करायला पाहिजे तरच आपले पितृ आपल्यावर प्रसन्न होत असतात. फक्त जेवण केले आणि त्यांना घास टाकला असे होत नाही. तुम्हाला श्रध्देने श्राद्ध करणे गरजेचे आहे कारण श्राद्ध मध्ये पितृ स्थान, पितरांचे आगमन आणि त्यांना नमस्कार करणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असते.

पितृपक्षात खास करून श्राद्ध करताना आपण जेवण करतो, गोड पदार्थ करतो त्या मध्ये कोणते पदार्थ अतिशय महत्वाचे असतात अन् कोणते पदार्थ दिल्याने पितृ प्रसन्न होतात आणि आपण कोणते पदार्थ आवर्जून करायला पाहिजे या गोष्टी सुद्धा महत्वाचे आहे. ब्राह्मण पूजन, ब्राह्मण भोजन हे श्राद्धांची मुख्य कृती आहेत त्यातही ब्राह्मण भोजन व कुटुंबीय नातेवाईक यांना भजन देणे महत्त्वाचे समजले जाते श्राद्ध पक्ष यांच्या स्वयंपाकही शास्त्राने सांगितल्यानुसार असावा.

त्यात खास करून भात, खीर, लाडू ,भाज्या ,चटण्या ,कोशिंबीर, पुरी ,वडे लाडू ,तूप ,वरण जवस तीळ यांचा समावेश असला पाहिजे. काही ठिकाणी दुधात तांदूळ घालून त्याची खीर करतात तर काही ठिकाणी गव्हाची खीर करतात श्राद्ध पक्षाच्या दिवशी घरच्या देवाचे नैवेद्य देवस्थानचे ब्राह्मण व पितृस्थानी ब्राह्मण यांना जेवायला वाढताना काकडी लिंबू व मीठ हे पदार्थ वाढत नाही त्यामागे हेच कारण आहे की पितरांना भाजलेले, तळलेले पदार्थ आवडतात.पितरांना उकळलेले, आंबट व खारट पदार्थ आवडत नाही असे आपल्याकडे समजले जाते.

हे वाचा:   स्वयंपाक घरात या 3 वस्तू कधीही संपवू नका , नाहीतर गरिबी व दारिद्र्य येते !

त्यामुळे कडी लिंबू व मीठ हे पदार्थ आधी वाढत नाही त्यांच्या बरोबरच पितर स्वयंपाकाचा सुवासाने तृप्त होत असतात. स्वयंपाकात वापरले जाणारे पदार्थ भाजतांना तळताना येणारा सुवास त्यांना आवडतो. फळांमध्ये केळी, आंबा,फणस ,डाळिंब,खजूर, द्राक्ष, नारळ आदी हे फळ पितरांना आवडतात. काकडी,दोडकी, खजूर,चिंच, आले, सुंठ, मुळा, लवंग ,वेलदोडे, पत्री हिंग, ऊस ,साखर, गूळ, सेंधव इत्यादी सारे पदार्थ आपण जेवणात वापरायला पाहिजे असे शास्त्रकारांनी सांगितले आहे.

याबरोबर गायीचे दूध दही तुप तसेच म्हशीचे लोणी आणि न कडलेले ताक तूप वापरावे असे सांगितले जाते. ज्या मृत आत्म्यासाठी आपण श्राद्ध करीत आहोत त्यांचा एखादा आवडीचा पदार्थ जेवनामध्ये असायलाच पाहिजे याशिवाय विविध प्रदेशांमध्ये स्वयंपाकाच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत.

हे वाचा:   श्रीकृष्ण सांगतात या दिशेला जेवण केल्याने व्यक्तीचे आयुष्य कमी होते..तसेच अकाली मृत्यू होण्याचा धो'का वाढतो..जाणून घ्या

परंतु तुम्ही तुमच्या परीने तुमच्या पद्धतीने श्राद्ध करत असाल तर श्राद्धामध्ये दोन गोष्टींचा समावेश अति आवश्यकतेनुसार करावा पहिली गोष्ट म्हणजे पितरांचा आवडता पदार्थ म्हणजे आजी-आजोबा आई-वडील असतील त्यांना काय आवडत होते तो एक पदार्थ ठेवावा आणि दुसरा पदार्थ म्हणजे खव्याची खीर किंवा तांदूळ टाकून बनवलेली खीर आवश्यकतेप्रमाणे करावी म्हणजे दोन पदार्थ त्या जेवनामध्ये असलीच पाहीजे बाकी इतर भाजी वरण भात तुम्ही करू शकतात तर या होत्या काही महत्त्वाच्या गोष्टी ज्या आपण साध्य करते वेळी आवश्यक जपायला हव्यात तसेच लक्षात ठेवायला हव्यात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.