काहीही झाले तरी अशा प्रकारची चपाती अजिबात खाऊ नका ,अशा प्रकारची चपाती जर तुम्ही बघितली आहे किंवा ती खाल्ली तर यामुळे तुम्हाला भविष्यात खूप साऱ्या संकटांना सामोरे जावे लागेल त्याचबरोबर तुमच्या जीवावर सुद्धा यामुळे बेतू शकेल. जेवण करताना कधीच ताटा मध्ये एकत्र तीन चपाती अजिबात खाऊ नये कारण की आपण एक म्हण ऐकली असेल की तीन तिघाडा काम बिघाडा.
एका सोबत जर आपण तीन चपात्या खाल्ल्या तर त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो म्हणूनच जेवण करताना आपल्याला अडीच चपाती खायची आहे आणि त्यानंतर तुम्ही अर्धी चपाती खाऊ शकता. अनेकदा आपल्या घरातील गृहिणी ताटामध्ये एका सोबत 3 चपात्या वाढत असतात तसे पाहायला गेले तर ताटामध्ये एकाच वेळी 3 चपात्या वाढणे अशुभ मानले गेले आहे.
हिंदू धर्मशास्त्रामध्ये तीन या संख्येला अशुभ मानले गेलेले आहे. कोणतेही कार्य करतांना तीन या संख्येचा समावेश केला जात नाही. आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की, कोणतेही धार्मिक कार्य करत असताना त्या कार्यामध्ये तीन वस्तूंचा व तीन संख्या असणाऱ्या गोष्टींचा समावेश केला जात नाही म्हणूनच हाच नियम सगळीकडे गृहीत धरला जातो आणि जेवण करताना सुद्धा तीन चपाती चा ताटामध्ये समावेश केला जात नाही.
असे मानले जाते की जेव्हा एखाद्या व्यक्तीचा मृत्यू होतो तेव्हा त्याच्या तिसऱ्या दिवसाच्या आधी जेव्हा जेवण दिले जाते तेव्हा अशा जेवणामध्ये तीन चपातींचा समावेश केला जातो. मनुष्य एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये 3 चपात्या वाढणे म्हणजे मृत्तक जेवण दिल्या सारखे मानले जाते. त्याचबरोबर 3 चपात्या खाल्ल्याने व्यक्तीच्या मनामध्ये शत्रुत्व भावनासुद्धा निर्माण होत असते.
एखाद्या व्यक्तीच्या संतुलित आहाराबद्दल जेव्हा चर्चा केली जाते तेव्हा त्या व्यक्तीच्या ताटामध्ये काही पदार्थांचा समावेश मोजक्याच पद्धतीने केला जातो परंतु जेव्हा आपण अतिरिक्त अन्न सेवन करत असतो त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होत असतो आणि यामुळे आपण जास्त प्रमाणात जेवण खाल्ल्याने त्याचा ताण आपल्या आरोग्यावर तर होतोच पण त्याचबरोबर आपल्या मनावर सुद्धा होत असतो.असे केल्याने अनेकदा आजारांना निमंत्रण दिल्यासारखे सुद्धा होते.
आपण घरामध्ये जेव्हा चपात्या बनवतो तेव्हा कधी कधी त्या चपात्या उरतात आणि त्या चपात्या आपण दुसऱ्या दिवशीसुद्धा खातो अशा प्रकारच्या बाशी व उरलेल्या चपाती चुकून सुद्धा खाऊ नये. यामागे सुद्धा वैज्ञानिक व धार्मिक कारण सुद्धा सांगण्यात आलेले आहे. नुकत्याच केलेल्या संशोधनानुसार अशी माहिती समोर आली आहे की अनेकदा भाजी चपाती खाल्ल्यामुळे अनेक व्यक्तींचा मृत्यू सुद्धा झालेला आहे.
बहुतेक वेळा आपण कोणतीही खात्री न करता बाशी चपाती खाण्याचा प्रयत्न करतो परंतु या चपातीमध्ये अनेकदा सूक्ष्मजीवांची वाढ झालेली असते आणि या सूक्ष्म जिवांच्या वाढीमुळे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो आणि शरीरामध्ये रासायनिक प्रक्रिया झाल्यामुळे विविध आजार होण्याची दाट शक्यता निर्माण होते यामुळे विष सुद्धा तयार होते. जेव्हा कधी तुम्ही बाशी चपाती खाण्याचा प्रयत्न कराल तेव्हा सुरुवातीला आधी चपाती तोडून पहावी.
चपाती तोडताना तिच्या तारा निघत असेल तर अशा वेळी ही चपाती पूर्णपणे खराब झालेली आहे याची खात्री करून घ्या आणि अशा प्रकारची चपाती अजिबात खाऊ नका. एक गोष्ट लक्षात ठेवा बाशी चपाती कधी खाऊ शकता परंतु कोणतीही काळजी व खात्री न बाळगता जर आपण चपाती खाल्ली तर त्याचा विपरीत परिणाम तुमच्या आरोग्यावर होऊ शकतो म्हणून बाशी चपाती खातानाही योग्य ती काळजी घ्यायला हवी.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.