घराबाहेर लिंबू मिरच्या का टांगतात.? याचं खरं कारण जाणून तुम्हालाही धक्का बसेल.!

अध्यात्म

अलक्ष्मी म्हणजे लक्ष्मी देवी यांची मोठी बहीण म्हणून या देवीला अलक्ष्मी देवी म्हटले जाते.जेव्हा श्री विष्णू यांनी माता महालक्ष्मी यांना लग्नाची मागणी केली तेव्हा महालक्ष्मी यांनी अट केली होती की जेव्हा माझ्या मोठ्या बहिणीचे लग्न होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही त्यावेळी श्री विष्णू यांनी दुस्साहस ऋषींना अलक्ष्मी यांच्याशी लग्न करण्यास तयार केले. व त्यांचा विवाह लावून दिला.

विवाह करून जमिनीतवर दुस्साहस ऋषी आपल्या आश्रमात देवी अलक्ष्मीला घेऊन आले त्यावेळी त्यांच्या आश्रमात पूजन चालू होते. यज्ञ होम हवन मंत्र उच्चार होत असताना चा आवाज कानावर पडताच देवी अलक्ष्मी तेथून दूर पळाली.पिंपळाच्या झाडाखाली जाऊन बसली तेव्हा दुस्साहस ऋषींनी अलक्ष्मी यांना घरी येण्यास सांगितले तेव्हा अलक्ष्मी म्हणाली की सर्वात आधी तुम्ही हे मंत्रजप पूजा-अर्चना बंद करा त्याशिवाय मी घरामध्ये येऊ शकत नाही म्हणजे दारिद्र्य अशा ठिकाणीच वास्तव्य करते जेथे होमहवन पूजा अर्चना काहीच होत नाही.

अशाप्रकारे अलक्ष्मीदेवी पिंपळाच्या झाडाखाली राहू लागली आणि म्हणूनच आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये पिंपळाच्या झाडा खाली अलक्ष्मी राहत असल्याने आपल्या घराच्या आजूबाजूला जवळपास कुठेही पिंपळाचे झाड लावले जात नाही. अलक्ष्मीला आंबट, तिखट पदार्थ खूप आवडतात व लक्ष्मीदेवीला गोड पदार्थ जास्त प्रमाणात आवडत असतात म्हणूनच आपण आपल्या घराच्या उंबरठ्यावर लिंबू मिरची टांगून ठेवतो आणि गोड पदार्थ आपल्या घरामध्ये ठेवतो.

आपल्यापैकी अनेकांना असे वाटते की जर आपण घराच्या उंबरठ्यावर लिंबू मिरची टांगून ठेवली तर आपल्याला नजर लागत नाही असा समज अत्यंत चुकीचा आहे. देवी लक्ष्मी व अलक्ष्मी हे दोघे नेहमी दिवसभर प्रवास करत असतात आणि यांना जेव्हा भूक लागते तेव्हा ते कोणत्याही घरामध्ये प्रवेश करतात. जेव्हा अलक्ष्मी घरावर लावलेले लिंबू-मिरची पाहते तेव्हा ते खाऊन ती घराबाहेर निघून जाते आणि माता महालक्ष्मी यांना गोड पदार्थ आवडत असल्यामुळे येथे घरामध्ये येऊन गोड पदार्थ खाऊन जातात.

हे वाचा:   6 जून रविवार: मोठी अपरा एकादशी गुपचूप ठेवा इथे 1 रुपयाचा सिक्का..पैसा इतका येईल की..सर्व इच्छा होतील पूर्ण

एकदा श्रीहरी विष्णू माता महालक्ष्मी दोघेही अलक्ष्मीदेवीना भेटण्यास शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली आले तेव्हा त्यांनी लक्ष्मीदेवीला एक आशीर्वाद दिला आणि असे म्हणाले की जो कोणी शनिवारच्या दिवशी पिंपळाची पूजा करेल त्या व्यक्तीच्या घरी आम्ही कायमस्वरूपी वास करू. म्हणूनच शनिवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावला जातो तसेच श्री विष्णू यांनी असे सुद्धा सांगितले आहे की जो व्यक्ती पिंपळाच्या झाडाखाली रिकाम्या हाताने जाईल त्याच्या घरी येताना अलक्ष्मी म्हणजे दारिद्रता सुद्धा परत येईल म्हणून पिंपळाच्या झाडाखाली रिकाम्या हाताने कधीच जाऊ नये.

पिंपळाच्या झाडाला अर्पण करण्यासाठी पाणी साखर दूध जे काही पदार्थ आपल्याला शक्य होईल ते घेऊन जावे नाहीतर दारिद्रता आपल्या मागे लागते. हे ऐकल्यानंतर दारिद्र्याचा देवी म्हणाले की हे सगळे तर तुम्ही तुमच्या मनानुसार सांगितले आहे परंतु मला सुद्धा माझ्या मनाप्रमाणे इच्छा आशीर्वाद पाहिजे आहे. तेव्हा त्यांनी विचारले की काय आहे तुझे म्हणणे तेव्हा देवीने सांगितले की मला आठवड्यातील एक दिवस हा माझा हक्काचा असावा.

या दिवशी मी माझ्या पतीसाठी नृत्य करेल आणि या दिवशी जर आमच्या दोघांच्या मध्ये कोणी आले तर मी त्याच्या घरी कायमस्वरूपी राहिल तेव्हा श्री विष्णू यांनी दारिद्रता देवीला सांगितले की आठवड्यातील रविवार हा तुझा स्वतःचा हक्काचा दिवस असेल आणि जर या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली कोणी आले तर तू त्या व्यक्तीच्या घरी कायमस्वरूपी राहशील म्हणूनच रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला हात लावून पिंपळाच्या झाडाखाली बसून पिंपळाच्या झाडाला कोणत्याच प्रकारच्या प्रदक्षणा सुद्धा घालू नये त्याचबरोबर अनेकदा आपण पाहतो की घरामध्ये भिंतीमध्ये पिंपळाचे झाड उगवलेले असते.

हे वाचा:   या राशीच्या मुली बनतात भाग्यशाली पत्नी..विवाहानंतर आपल्या पतीचे नशीब उजळवतात..घरात श्रीमंती येते..बघा त्या कोणत्या राशी आहेत

कितीही आपण ते झाड काढले तरी वारंवार ते भिंतीजवळ उगवत असते म्हणूनच जर आपल्या घरामध्ये अलक्ष्मी शिरली तर ती सहसा लवकर बाहेर होत नाही.पिंपळाचे झाड काढण्यामागे सुद्धा काही शास्त्र असते आणि म्हणून रविवारच्या दिवशी पिंपळाचे झाड काढायला हवे त्याशिवाय हे झाड काढण्याआधी त्याच्यासमोर एक लिंबू व सात मिरच्या ठेवायला हव्यात त्यानंतरच ते झाड काढावे व असे केल्यानंतर लिंबू तेथेच चिरावा व त्याचा अर्धा भाग दारिद्र्याच्या देवी ग्रहण करून तेथून कायमस्वरूपी निघून जाते. त्यानंतर त्या जागेवर पिंपळाचे झाड भविष्यात कधी उगवत नाही. आता तुमच्या सर्वांच्या लक्षात आलेच असेल की दाराबाहेर लिंबू मिरची लटकवली जाते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.