घरामध्ये दारिद्र येण्याची हे आहेत सात मुख्य लक्षणे; यांना कधीच दुर्लक्ष करू नका.!

अध्यात्म

भारतीय संस्कृती आणि सभ्यता यामध्ये वास्तुशास्त्राचे अनन्य महत्व आहे. जेव्हा आपण एखादी नवीन घर किंवा वास्तू बनतो तेव्हा ती वास्तू वास्तुशास्त्रानुसार बांधण्याचा प्रयत्न करतो. सध्याच्या शहरीकरणामुळे व आपण शहरांमध्ये राहत असल्यामुळे अनेकदा वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक घर बांधणे कधी कधी शक्य होत नाही परंतु आज सुद्धा अनेक ठिकाणी घर बांधताना वास्तुशास्त्राचा अभ्यास करून घर बांधण्यात येते म्हणूनच वास्तुशास्त्राला भारतीय शास्त्रांमध्ये महत्त्व देण्यात आलेले आहे.

या सर्वांच्या गोष्टींचा विचार करूनच अनेकदा वास्तुशास्त्र मध्ये आपल्या घरामध्ये सुख शांती निर्माण होण्याचे काही लक्षणे सुद्धा असतात व आपल्या घरामध्ये एकत्र येण्याची सुद्धा काही लक्षणे सांगण्यात आलेली आहे म्हणूनच आज आपण आपल्या लेखामध्ये जर आपल्या घरामध्ये दारिद्रयाची नसेल तर या सात लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष करायचे नाही आहे, अन्यथा गरिबी कंगाली तुमच्या जीवनामध्ये अवश्य प्रवेश करेल चला तर मग जाणून घेऊया की नेमकी लक्षणे कोणती आहेत त्याबद्दल..

आपल्या घरामध्ये दारिद्रता गरीबी येऊ लागते तेव्हा आपल्या घरातील वस्तू आपल्याला वेगवेगळ्या माध्यमातून संकेत देत असतात त्याचबरोबर आपले वास्तुशास्त्र सुद्धा अशी काही लक्षणे आपल्या देत असतात त्यावरून आपल्याला कळते की भविष्य आपल्या जीवनामध्ये काही अडचणी व संकट येणार आहे. जेव्हा आपल्या घरामध्ये खूप मोठी अडचण येणार असेल तेव्हा त्याचा थेट परिणाम आपल्या घरातील तुळशीच्या रोपावर होत असतो. अनेकदा यामुळे अस्तित्व संपून जाण्याची शक्यता असते म्हणूनच फक्त तुळशीच नाही तर आपल्या आजूबाजूला जे झाड दिसत आहेत ,रोप आहेत ते सुद्धा हिरवेगार असणे गरजेचे आहे.

जर तुमच्यावर खूप मोठे कर्ज असेल तर ते कर्ज फेटण्याची शक्यता नसेल तर अशा वेळी आपल्या घरातील झाडे पिवळी होण्याची शक्यता असते आणि जर घरात लावलेले रोप पिवळे होत असेल तर अशा वेळी तुरंत पिवळे पान कापायला हवे. स्वयंपाक घरामध्ये रात्री कधी जेवलेले गोष्टी भांडे सोडू नये, असे केल्याने आपल्या घरामध्ये गरिबी येते याबद्दल वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे.

हे वाचा:   स्वप्नात साप पाहण्याचा नेमका काय अर्थ आहे.? नेमके काय असतात यामागील संकेत.!

शास्त्रांमध्ये सांगितले आहे की जी व्यक्ती आपले खाल्लेले भांडे स्वच्छ करत नाही त्याच्या जीवनामध्ये अनेक संकटे व गरिबी येत असते आणि म्हणूनच रात्री झोपताना आपल्या स्वयंपाक घरातील सर्व भांडी स्वच्छ करूनच झोपायला हवे त्याचबरोबर बेडरूम मध्ये पलंगा समोर आरसा लावू नये त्यामुळे नकारात्मक ऊर्जा आपल्यावर थेट परिणाम करत असतात आणि सकाळी उठल्यावर जेव्हा आपण आरशामध्ये पाहतो तेव्हा आरशामध्ये असलेल्या नकारात्मक ऊर्जेचा परिणाम आपल्या शरीरावर होत असतो आणि यामुळे सुद्धा तुमच्या घरात नकारात्मक ऊर्जा मात करण्याची शक्यता असते.

आपल्या घरातील झाडू हा माता महालक्ष्मीचे रूप मानले जातो आणि म्हणूनच कधी झाडूला लाथ मारू नये. संध्याकाळ झाल्यावर आपल्या घरामध्ये झाडू काढून ही केरकचरा काढू नये, असे केल्याने माता महालक्ष्मी आपल्या घरातून निघून जाते आणि त्यामुळे आपल्या जीवनामध्ये अनेक संकटे निर्माण होतात. आपल्या घरातील वैभव पैसा हळू कमी होत जातो. जर आपल्या जीवनामध्ये सुख शांती वैभव नांदवायची असेल तर अशा वेळी सकाळी उठल्यानंतर नाश्ता करण्याच्या आधी घरातील केरकचरा अवश्य काढायला हवा. झाडू ला कधी उभा ठेवू नये ,नेहमी आडवा करून ठेवावे.

जर आपण झाडूला उभा करून ठेवले असल्यामुळे घरामध्ये भांडण तंटे वाद वाढण्याची शक्यता असते. आणि आपल्या स्वयंपाक घरामध्ये ठेवलेले दूध उकळून वर येऊ लागते जर आपल्या घरामध्ये वारंवार दूध उकळून वर येत असेल तर हे आपल्या घरामध्ये येणाऱ्या मोठ्या संकटाचे लक्षण असते त्याचबरोबर आपल्या घरामध्ये सदस्य आजारी पडणार आहे याचे सुद्धा सूचक असते म्हणून घरामध्ये दूध उकळू जाऊ द्यायचे नाही आहे.

हे वाचा:   चिमणी घरात येणे शुभ असते की अशुभ..चिमणी घरात आल्यास काय घडते ते जाणून घ्या !

आपल्यापैकी अनेकांना बाथरूमचा दरवाजा उघडा ठेवण्याची सवय असते परंतु असे करणे चुकीचे मानले जाते. जर तुम्हीसुद्धा तुमच्या घरातील बाथरूमच्या दरवाजा उघडा ठेवत असाल तर आत्ताच बंद करायला हवा कारण की तो दरवाजा उघड ठेवल्याने त्यातील नकारात्मक ऊर्जा आपल्या घरामध्ये प्रवेश करते आणि या नकारात्मक उर्जेचा प्रभाव आपल्या घरातील सदस्यांवर होतो आणि त्यामुळे त्यांच्या प्रत्येक कामामध्ये यश प्राप्त होत नाही.

जर आपण एखादे काम करण्यासाठी बाहेर जात आहोत आणि बाहेरून जर आपण घरी आल्यावर आपल्याला पाली चे दर्शन झाले तर ते आपल्यासाठी शुभ मानले जात नाही. एखादी नवीन घर घेतलेले असेल आणि त्या घरांमध्ये जर मेलेली पाल तुम्हाला सापडली तर अशा वेळी त्या घरामध्ये वास्तुशांती वास्तु प्रवेश करण्याआधी पूजा-अर्चना करायला हवी,असे केले नाही तर त्या घरांमध्ये राहणाऱ्या व्यक्तींना यश प्राप्त होत नाही. प्रत्येक कामामध्ये अडथळा निर्माण होत असतात.

चुकून सुद्धा आपल्या घरामध्ये मृत व्यक्तींचे फोटो आणि माता महालक्ष्मी चे फोटो म्हणजे देवी-देवता यांचे फोटो एकमेकांच्या समोर लावू नये यामुळे सुद्धा वास्तुदोष होण्याची शक्यता असते आणि जर तुमच्या घरा मध्ये सुद्धा अशा प्रकारच्या वास्तू दोष असतील तर ते लवकरच निवडण्याचा तसेच दूर प्रयत्न करा अन्यथा तुमच्यावर भविष्यात संकट येण्याची शक्यता आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.