दररोज सकाळी घरातील महिलांनी हे 1 काम नक्की करा; घरात येईल कायमची सुख शांती व भरभराट.!

अध्यात्म

आपल्या हिंदू धर्मशास्त्रामध्ये महिलांना खूप मोठे स्थान देण्यात आलेले आहे.महिला यांना साक्षात माता महालक्ष्मी चे स्वरूप मांनण्यात आलेले आहे. ज्या घरामध्ये महिला नेहमी हसतमुख असतात त्या घरामध्ये नेहमी सुख -, वैभव नांदत असते आणि आपल्या घराचे सगळे सुख व घराची भरभराट सुद्धा महिलांच्या हातात असते. जर आपल्या घरामध्ये सुख शांती वैभव नांदावी असे जर वाटत असेल तर तर काही असे छोटे छोटे कार्य आहेत जे महिलांनी सकाळी उठल्यानंतर करायला हवेत. ते कार्य कोणते आहेत.? ते कार्य केल्याने आपल्याला नेमके कोणते फायदे होतात? या सर्वांबद्दल ची सविस्तर माहिती आज आपण या लेखामध्ये जाणून घेणार आहोत.

हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे प्रत्येक महिलांनी जेवण करण्यापूर्वी गाईला घास नेहमी घालायला हवा कारण की गाईला हिंदू धर्मशास्त्रामध्ये माता मानले जाते. जेव्हा आपण आपल्या घरात गाईसाठी नैवेद्य बनवत असतो व पहिली पोळी बनवत असतो ही पोळी गाईला अर्पण केली तर त्याचे आपल्याला पुण्य सुद्धा लाभत असते आणि यामुळे गोमाता प्रसंन्न होतेच पण त्याचबरोबर माता महालक्ष्मी सुद्धा आपल्यावर प्रसन्न होते.

जर तुमच्या घरातील सगळे सदस्य आजारी असतील किंवा एखादी व्यक्ती सतत अंथरुणाला खिळलेली असेल तर अशा वेळी त्या व्यक्तीच्या हाताने गोमातेला पोळी खायला द्या व गोमातेच्या अंगावरून हात फिरवायला सांगा, असे केल्याने त्या व्यक्तीचे आजार पूर्णपणे दूर होऊन जाणार आहे. त्या व्यक्तीच्या तब्येतीमध्ये सुधारणा होऊ लागेल त्यानंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या पितरांसाठी अनेकदा आपण आपल्या पितरांची पूजा अर्चना करत असतो.

पितर म्हणजे जे आपल्या पिढीतील जे काही मृत व्यक्ती असतात त्यांना पितर असे म्हणतात. या पितरांच्या कृपा आशिर्वादाने आपली पिढी नेहमी सुखी राहते. पितरांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आपल्याला आपल्या गॅलरी वर किंवा इमारतीच्या गच्चीवर चपाती चा नैवेद्य दाखवायचा आहे. जर कावळ्याने हा चपाती चा नैवेद्द त्वरित खालला तर याचा अर्थ की आपले पितर आपल्यावर प्रसन्न आहेत जेव्हा आपल्यावर आपले पितर प्रसन्न असतात तेव्हा आपल्यावर कोणत्याही प्रकारची संकटे येत नाही. आपल्या कुळाचा उद्धार होतो.

हे वाचा:   आज रात्रीच करा कापुराचे हे सोप्पे उपाय., मग बघा तुम्ही कसे धनवान व्हाल..!

आपल्याला अनेक संकटातून बाहेर काढण्यासाठी आपले पितर नेहमी मदत करत असतात. जर कावळ्याने तो घास नाही खाल्ला तर याचा अर्थ आपले पितर यातना भोगत आहे आणि पितरांना शांत करण्यासाठी अनेकदा अमावस्येच्या दिवशी वेगवेगळे छोटे-मोठे उपाय सुद्धा केले जातात, जेणेकरून पितरांना शांती मिळावी असा त्यामागील हेतू असतो.

आपले जे घर असते, त्या घराच्या आजूबाजूला अनेक सकारात्मक व नकारात्मक शक्ती वास करत असतात. या शक्तीमुळे आपल्या जीवनावर परिणाम सुद्धा होत असतो. या शक्तींपासून जर आपले संरक्षण करायचा असेल तर आपल्याला एक छोटासा उपाय करायचा आहे, अशा वेळी महिलांनी घरात स्वयंपाक झाल्यानंतर एक पोळीचा तुकडा आपल्या घराच्या आजूबाजूला टाकायचा आहे असे केल्याने ज्या काही वाईट शक्ती आहेत त्या वाईट शक्ती पासून आपले संरक्षण होते. हिंदू धर्म शास्त्रामध्ये अनेक असे काही उपाय सांगण्यात आले आहेत.

या उपायांच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या समस्येवर हमखास मात करू शकतो. जर तुमच्यावर भरपूर कर्ज झाले असेल कर्ज फिटायचे नाव घेत नसेल तर अशावेळी आणि त्याच बरोबर तुमच्या घरा मध्ये भरपूर काळया मुंग्या झाल्या असेल तर अशावेळी सुद्धा तुम्ही एक उपाय अवश्य करू शकतात.

हे वाचा:   मनी प्लांट सोबत जुळलेल्या या 5 गोष्टी बनवतील तुम्हाला धनवान; जाणून घ्या काय आहेत त्या ५ गोष्टी.!

हा उपाय करण्यासाठी आपल्याला कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि त्यामध्ये साखरेचे दाणे टाकायचे आहे आणि ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये काळा मुंग्या जास्त प्रमाणात आहेत अशा ठिकाणी हे कणकेचे गोळे आपल्याला टाकायचा आहे, असे केल्याने आपल्या वरील कर्ज पूर्णपणे फिटून जाते आणि कर्जातून आपली मुक्तता होते आणि मुंग्यांनी हे कणीक व गोड पदार्थ खाल्ल्यामुळे आपल्याला त्यांचा आशीर्वाद सुद्धा प्राप्त होतो.

तुमच्या घराच्या आजूबाजूला पक्षी झाडावर नेहमी बसत असेल तर अशावेळी या पक्ष्यांना खायला दाणे व पिण्यासाठी पाणी आवश्यक ठेवा कारण की यामुळे तुमच्या जीवनावर नेहमी सकारात्मक परिणाम जाणवू लागेल आणि तुमच्या जीवनामध्ये संकटे अजिबात येणार नाही कारण की आपण असे कार्य केल्यामुळे त्यांचा आत्मा आपल्याला नेहमीच शुभ आशीर्वाद देऊ लागेल.ही काही छोटी-मोठी कामे जी आपल्याला जीवनामध्ये करायची आहेत आणि या छोट्या-मोठ्या कामांमुळे आपण आपल्या जीवनातील अनेक संकटे दूर करू शकतो जरी संकटे दूर नाही झाली तरी त्यांची तीव्रता मात्र नक्कीच कमी करू शकतो म्हणून हे उपाय अवश्य करा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.