रुद्राक्ष खरा आहे की खोटा आहे हे कसे ओळखावे? याबद्दल आपल्याला फारसे ज्ञान नसते. त्याचे वैशिष्ट्य काय आहे ? त्याचे वेगवेगळे उपयोग आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीने केले जातात,? कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणता रुद्राक्ष परिधान करायला हवा या संपूर्ण माहिती आज आपण आपल्या लेखामध्ये जाणून घेणार आहोत. जेव्हा आपण एखादा रूद्राक्ष पाण्यामध्ये टाकतो तेव्हा तो रुद्राक्ष जर पाण्यामध्ये बुडत असेल तर याचा अर्थ तो रुद्राक्ष अस्सल आहे .जर रुद्राक्ष पाण्यामध्ये टाकताच तो बुडाला नाही वर पाण्यावर तरंगत असेल तर याचा अर्थ की तो नकली आहे.
जर आपण रुद्राक्ष हातामध्ये घट्ट पकडून ठेवले आणि त्यानंतर जर हलवले तर त्यातून मंजुळ ध्वनी आपल्याला ऐकू येतो. जर आपण तांब्याच्या भांड्यामध्ये रुद्राक्ष ठेवला तर अस्सल रुद्राक्ष त्वरित हालचाल दर्शविते. जर आपण उकळत्या पाण्यामध्ये रुद्राक्ष टाकला तरी सहा ते आठ तासांपेक्षा जास्त ठेवला असेल तरी त्याचे विघटन होत नाही. रुद्राक्ष ही कोणत्याच बाजूने वाकत किंवा तुटत सुद्धा नाही. रुद्राक्ष बर्याच काळ दुधामध्ये ठेवल्यास ते दूध नासत नाही.
रुद्राक्ष हे एका झाडाचे फळ आहे त्याचा आकार गोल असून आजूबाजूला काटेरी आवरण असते परंतु हे काटेरी आवरण जरी असले तरी आपल्या हाताला ते टोचत नाही. रुद्राक्ष झाड आकाराने मोठी असते. हे झाड प्रामुख्याने केदारनाथ, नेपाळ, भूतान अशा भागांमध्ये सहजरीत्या उपलब्ध होऊन जाते. या झाडाचे फळ म्हणजेच रुद्राक्ष होय. रुद्राक्ष हे दिसायला अतिशय सुंदर असते.
रुद्राक्षाच्या वरील जे आवरण काळया रंगाचे असते पण ते नीट साफ करून घ्यावे लागते वगैरे काढाव्या लागतात किंवा तीन मीटर खोल समुद्रात सापडतो. रुद्राक्षाचे झाड भारतात वाढत नाही. पूजा अर्चना करताना रुद्राक्षाचे अत्यंत महत्त्व वेगळे शास्त्रांमध्ये सांगितले आहे. जर आपण एखादी पूजा करत असताना रुद्राक्षाची माळ जपली तर आपल्याला त्या पूजेचे फळ त्वरित मिळते असे शास्त्रामध्ये सांगण्यात आलेले आहे. आयुर्वेदिक शास्त्रानुसार सुद्धा रुद्राक्षाचे अनेक महत्व सांगण्यात आले आहेत. रुद्राक्ष हे कफनाशक, वातनाशक, पित्तनाशक आहे आणि म्हणून आपल्या शरीरातील वेगवेगळ्या व्याधी दूर करण्यासाठी रुद्राक्षाचा वापर केला जातो.
रुद्राक्ष हे प्रामुख्याने तांबड्या किंवा काळया रंगाचा आपल्याला पाहायला मिळतात. रुद्राक्ष परिधान करण्याचे काही नियम सुद्धा आहेत. शुक्ल पक्षातील रविवारी शनिवारी व सोमवारी या दिवशी रुद्राक्ष परिधान करणे अत्यंत शुभ मानले जाते. सप्तमी, अष्टमी, पौर्णिमा या तिथी ला सुद्धा रुद्राक्ष परिधान करणे शुभ मानले जातात व त्याचबरोबर ज्या काही वेगवेगळ्या ग्रह नक्षत्र आहेत त्या नक्षत्र ग्रह तिलासुद्धा रुद्राक्ष परिधान करणे अत्यंत महत्त्वाचे व लाभदायक मानले जाते.
कोणत्या राशीच्या व्यक्तीने कोणत्या प्रकारचे रुद्राक्ष परिधान करावी हे जाणून घेणे सुद्धा अत्यंत महत्त्वाचे असते म्हणून मेष राशीच्या व्यक्तीने त्रिमुखी असणारे रुद्राक्ष परिधान करावे. वृषभ राशी असणाऱ्या व्यक्तीने दोन मुखी आणि मिथुन राशी असणाऱ्या व्यक्तीने चार मुखी ,कर्क राशी असणाऱ्या व्यक्तीने दोन मुखी असणाऱ्या व्यक्तीने एक मुखी किंवा बारा मुखी व कन्या राशीच्या व्यक्तीने चार मुखी असलेल्या रुद्राक्ष परिधान करायला हवे.
तूळ राशीच्या व्यक्तीने षण्मुखी व वृश्चिक राशीच्या व्यक्तीने त्रिमुखी धनु राशीच्या व्यक्तीने पाच मुखी मकर राशीच्या व्यक्तीने सात मुखी अशाप्रकारे रुद्राक्ष परिधान करायला हवे. एक मुखी असलेले रुद्राक्ष अत्यंत दुर्मिळ मानली जाते. जी व्यक्ती एक मुखी रुद्राक्ष परिधान करते ती अत्यंत शुभदायक मानली जाते व ती आपल्या सर्व वासना वर ईच्छांवर विजय मिळते असे सुद्धा म्हटले आहे. जर तुम्हाला सुद्धा अशा प्रकारचा एक मुखी रुद्राक्ष मिळाला तर तो आवश्यक परिधान करा आणि आपल्या जीवनातील सर्व संकट दुःख समस्या यांचा नायनाट करा.
जे लोक शिवशंकर यांची आराधना उपासना करतात ते लोक प्रामुख्याने रुद्राक्ष माळ परिधान करत असतात. रुद्राक्ष माळ हे श्री महादेव यांच्या अश्रू पासून बनलेले आहे अशी पुराणकथांमध्ये प्रचिती सुद्धा सांगण्यात आलेली आहे म्हणून रुद्राक्ष आणि महादेव यांचा संबंध अगदी जवळचा आहे. जर आपल्याला महादेवाला प्रसन्न करायचा असेल तर अशा वेळी रुद्राक्षाचा जप आपल्याला आवश्यक करायचा आहे आणि महादेवाची कृपादृष्टी आपल्यावर प्राप्त करून घ्यायचे आहे अशा प्रकारे रुद्राक्षाचे वेगवेगळे लाभ वेगवेगळ्या शास्त्रांमध्ये सुद्धा सांगण्यात आलेले आहे त्याचा अवश्य लाभ घ्यावा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.
टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.