वास्तु शास्त्रानुसार दुकान चालण्यासाठी दुकानात लावा हा एक फोटो आणि म्हणा हा मंत्र.!

अध्यात्म

अनेकदा आपले दुकान असते परंतु दुकान फारसे चालत नाही. दुकान चालण्यासाठी अनेक अडचणी येऊ लागतात व्यवसाय मध्ये तेजी येत नाही आणि काही ना काही कारणाने संकटे येत असतात आणि त्यामुळे उद्योगधंदे ,व्यवसाय डबघाईला येऊन जातात यामुळे व्याजाने घेतलेले कर्ज दिवसेंदिवस वाढत जाते ,अशा वेळी ज्या ठिकाणी आपले दुकान असते त्या ठिकाणचा वास्तुदोष याचा परिणाम सुद्धा आपल्यावर होत असतो.

या दोषावर योग्य वेळी योग्य उपाय करणे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे त्याच वेळी अनेकदा आपल्या कुंडलीतील काही ग्रह स्थान कमजोर असेल तरी या सर्वांचा परिणाम आपल्या जीवनावर होत असतो म्हणून अनेकदा आपल्या व्यवसायात ,जीवनामध्ये दुकानांमध्ये अनेक अडचणी निर्माण होऊ लागतात. उद्योग धंदा व्यवसाय अजिबात चालत नाही.

दुकान बंद करण्याच्या दिशेने आपली वाटचाल होऊ लागते तर तुमच्या बाबतीत सुद्धा या सगळ्या घटना घडत असतील तर आज आम्ही तुम्हाला या लेखामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती सांगून सांगणार आहोत. या माहितीच्या साहाय्याने तुमच्या उद्योग धंदा व्यवसाय दुकान जोरात चालू लागणार आहे, चला तर मग जाणून घेऊया याबद्दल..

जर तुमच्या दुकानावर वारंवार अडचण येत असेल आणि या अडचणीला जर तुम्ही वैतागलेला असाल तर त्यासाठी आपल्याला आपल्या दुकानांमध्ये असा एक फोटो लावायचा आहे त्या फोटोच्या माध्यमातून तुमच्यावर ची संपूर्ण पिडा काही दिवसातच नष्ट होऊन जाणार आहे म्हणूनच आपल्याला आपल्या दुकानांमध्ये माता महालक्ष्मी चा असा फोटो लावायचा आहे ,या फोटोमध्ये माता महालक्ष्मी च्या आजूबाजूला हत्तीने सोंड वर केलेली आहे आणि माता महालक्ष्मी कमळावर बसलेली आहे.

हे वाचा:   नवरात्रीचे 9 दिवस घरात करा अशाप्रकारे कलश स्थापना; महालक्ष्मी घरात येईल, पैसा सुख मिळेल.!

अशा प्रकारच्या माता महालक्ष्मीच्या रूपाला गजांत लक्ष्मी असे म्हणतात परंतु अशाप्रकारच्या माता महालक्ष्मी चा फोटो दुकानांमध्ये लावताना आपल्याला काही काळजी घेणे सुद्धा गरजेचे आहे. आपल्याला या फोटोला नेहमी अगरबत्ती धूप बत्ती दाखवणे गरजेचे आहे त्याचबरोबर मंगळवारी शुक्रवारी मिष्टान्न जेवण म्हणजे गोड जेवणाचा नैवेद्य सुद्धा आपल्याला दाखवायला हवा.

जेव्हा आपण माता महालक्ष्मीची पूजा अर्चना करत असतो अशावेळी आपल्या दुकानांमध्ये नेहमी स्वच्छता असणे गरजेचे आहे. दुकानांमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तर ती साफ करणे महत्वाचे आहे कारण की ज्या ठिकाणी स्वच्छता असते अशा ठिकाणीच माता महालक्ष्मी वास्तव्य करत असते. आपल्या घराचे मुख्य प्रवेशद्वार आहे व दुकानाचे मुख्य प्रवेशद्वार आहेत या प्रवेशद्वारावर आपल्याला दोन्ही ठिकाणी स्वास्तिक लावणं अत्यंत गरजेचं आहे. स्वास्तिक मध्ये सर्व देवी देवता यांचे वास्तव्य असते आणि अशा स्वस्तिकच्या बाजूला दोन उभ्या रेषा काढायला विसरू नका.

या दोन उभ्या रेषा आखल्याने आपल्या घरामध्ये व दुकानांमध्ये लक्ष्मी स्थिर राहते. जर आपल्याला आपल्या दुकानातील वास्तुदोष दूर करायचा असेल तर अशा वेळी बाजारामध्ये चिनी मातीचे भांडे मिळते अशा चिनी मातीच्या भांड्यामधे आपल्याला तुरटीचे चार ते पाच खडे टाकायचे आहेत आणि हे भांडे आपल्याला आपल्या दुकानाच्या कोणताही कोपऱ्यामध्ये ठेवायचे आहे परंतु ही भांडी धुताना या भांड्याला कोणाचा स्पर्श होणार नाही याची काळजी सुद्धा घ्यायची आहे ,असे केल्याने आपल्या दुकानात जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती शोषून जाईल आणि आपल्या घरामध्ये व दुकानांमध्ये सकारात्मक ऊर्जा नेहमी प्रवाहित होत राहील.

हे वाचा:   घरात चिंचुद्री येण्याचे काय असतात संकेत..शुभ की अशुभ घडणार ! बघा यामुळे घरात काय होवू शकते..

या सकारात्मक ऊर्जा मुळेच आपले दुकान नेहमीच सक्रिय राहील. दुकानांमध्ये ग्राहकांची वर्दळ निर्माण होईल आणि परिणामी माता महालक्ष्मी आपल्यावर नेहमी प्रसन्न होईल असे वेगवेगळे मार्ग खुले होऊ लागतील यामुळेच आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारचे सुख शांती वैभव नांदू लागेल. हा फोटो लावल्या नंतर आपल्याला लक्ष्मी मंत्र तर म्हणायचा आहे पण त्याचबरोबर श्रीविष्णू यांचा “ओम नमो भगवते वासुदेवाय” हा मंत्र सुद्धा म्हणायचे आहे कारण की ज्या ठिकाणी श्री विष्णू असतात त्या ठिकाणी माता महालक्ष्मी नेहमी वास्तव्य करते आणि या मंत्रामुळे तुमच्या जीवनामध्ये धनाचे योग जुळून येतील व माता महालक्ष्मी तुमच्या जीवनामध्ये नेहमी वास्तव्य करेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा.

टीप : वर दिलेली माहिती सामाजिक आणि धार्मिक मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे. यामागे कोणतीही अंध श्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश्य नाही. त्यामुळे कोणीही तसा गैरसमज करून घेऊ नये.